STORYMIRROR

Ravi Dabhade

Romance

3  

Ravi Dabhade

Romance

अबोल तुझं मन...

अबोल तुझं मन...

1 min
235

अबोल राहून तू काळजात

खोल वार करू नकोस...

नि:शब्द बोलाचे वार

काळजात घालू नकोस...


उसळत्या लाटासारखा राग

तू व्यक्त करू नकोस...

आपल्या प्रेमाचा धागा तू 

अशक्त करू नकोस...


तुझ्या हृदयापासून असं

दूर तू करू नकोस...

अबोल राहून तू असं

काळजात घाव घालू नकोस...


माझ्यावरचं निस्सीम प्रेम 

तू कमी करू नकोस...

दुःखाचं ढग असं मनात

तू साठवू नकोस...


प्रेमाच्या वाटेत साथ माझी

तू सोडून नकोस... 

तुझ्या काळजावरचं माझं नाव

तू खोडू नकोस...


अबोल राहून तू काळजात

खोल वार करू नकोस...

नि:शब्द बोलाचे वार

काळजात घालू नकोस...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance