वरवरचं प्रेम
वरवरचं प्रेम
1 min
362
वरवरचं प्रेम काय आपल्या कामाचं
चल एक तरी झाड लावू आपल्या प्रेमाचं...
वरवरचं प्रेम काय आपल्या कामाचं
चल काहीतरी भलं करू आपल्या गावाचं...
वरवरचं प्रेम काय आपल्या कामाचं
चल मदत करू आपण एखाद्या गरीबाचं...
वरवरचं प्रेम काय आपल्या कामाचं
चल नाव रोशन करू आपल्या गावाचं...
वरवरचं प्रेम काय आपल्या कामाचं
चल पोट भरवू आपण एखाद्या भुकेल्याचं...
वरवरचं प्रेम काय आपल्या कामाचं
चल रक्षण करू आपल्या आया बहिणींचं...
वरवरचं प्रेम काय आपल्या कामाचं
चल शेतात अडवू पाणी आपल्या पावसाचं...
वरवरचं प्रेम काय आपल्या कामाचं
चल नातं जपू आपल्या जीव भावाचं...
