STORYMIRROR

Ravi Dabhade

Romance

3  

Ravi Dabhade

Romance

प्रीत...

प्रीत...

1 min
116

तुझ्या गालावरची खळी मी

माझ्या कवितेच्या ओळी तू...


तुझ्या ओठावरचं हास्य मी

माझ्या प्रेमाचं रहस्य तू...


तुझ्या केसातलं फुल मी

माझ्या फुलातली कळी तू...


तुझ्या नजरेतलं प्रेम मी

माझ्या काळजातली फ्रेम तू...


तुझ्या नाकातली मोरणी मी

माझ्या अंगठीतला मोती तू...


तुझ्या कानातले झूमके मी

माझ्या प्रितीचे पंख तू...


तुझ्या पैंजनातले घुंगरू मी

माझ्या नजरेतली अब्रू तू...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance