आयुष्य
आयुष्य
आयुष्य कितीतरी गोड,
भावनांचे,अनाणुबंध निराळे.
आयुष्याच्या निर्मळ हिंदोळ्यावर,
प्रेमरूपी मायेचा
अवचित ओलावा तो वेगळाच.
ऋणानुबंधाच्या गाठी
प्रेमभाव, ममत्व
एकमेका आदर निर्मिती,
ती वेगळीच.
आयुष्य कितीतरी गोड
आयुष्य भावनांचे
खाचखळगे
गोड गोड आठवणी
प्रेमरूपी सुंदर पण तितकीच
सूरबद्ध तारांची
लयबद्ध जाणीव.
आयुष्य कितीतरी गोड...!!!

