STORYMIRROR

Ajay Ingle

Tragedy

4  

Ajay Ingle

Tragedy

आठवण

आठवण

1 min
6

तुझी आठवण येते मजला, 

प्रत्येक क्षणा-क्षणाला...

तू आता माझी नाहीयेस, 

कसे समजावू माझ्या मनाला


तू आसपास नसलीस तरी, 

तू जवळ असल्याचा भास 

होत राहतो...

तुझ्या सहवासाचा सुगंध नित्य, 

मनी दरवळत राहतो...


सहवास तुझा आता राहिला नाही 

कसे सांगू मी या सुगंधाला... 

तू आता माझी नाहीयेस,  

कसे समजावू माझ्या मनाला..! 


आयुष्याच्या सुंदर वळणावरती, 

साथ तुझी लाभली होती...

दिवसा-ढवळ्या-जागेपणातच, 

स्वप्ने तू दाखवली होती...


निज मला लागता, 

स्वप्ने सारी उडून गेली...  

का...? कधी...? कळले नाही, 

तू का मजला सोडून गेली...?


मी आता कधी निजतच नाही, 

कसे सांगू मी माझ्या स्वप्नाला...

तू आता माझी नाहीयेस, 

कसे समजावू माझ्या मनाला..! 


विरहाने जेव्हा तुझ्या मी, 

काढीत होतो तुझ्या आठवणी, 

मन होत होते सुन्न...

नयनात होते पाणी...


सर्व मिळाले मजला,  

तू मिळाली नाही....  

काय गुन्हा घडला, 

सांग मी विचारू कुणा-कुणाला


तू आता माझी नाहीयेस, 

कसे समजावू माझ्या मनाला..!

कसे समजावू माझ्या मनाला..!


Rate this content
Log in

More marathi poem from Ajay Ingle

Similar marathi poem from Tragedy