आले आभाळ भरून
आले आभाळ भरून
आले आभळ भरून
सर धावून आली
चिंब चिंब भिजवून
ती दूर पळून गेली
आले आभाळ भरून
ती लाजत आली
थेंब ओघळून गालावर
खळी गुलाबी झाली
आले आभाळ भरून
वारा हळुच आला
तिला कवेत घेवून
पाऊस रूसून गेला
आले आभाळ भरून
पाऊस सैराट झाला
तिला भिजलेली पाहून
वादळ सुसाट आला
आले आभाळ भरून
ढग काळभोर झाले
त्याच्या लडिवाळा पाहून
ती पावसात रमून गेले
आले आभाळ भरून
पाऊस वेडावून गेला
तिच लावण्याच रूप पाहून
मुसळधार आला

