STORYMIRROR

Dinesh Kawade

Tragedy

3  

Dinesh Kawade

Tragedy

आकांत

आकांत

1 min
27.6K


किती खेळ चालवला नियतीने??

पोटचा गोळा झालाय आई बापाला पारखा..!

येईल का कधी फिरून तो,

मदत करण्या त्यांना वळीवासारखा.. !


नातवंडांसोबत खेळायच्या वयात,

ओढावी लागतेय वैरणीची बैलगाडी.... !

काळजात दाबून वेदना तो,

आपल्या दुःखांना तो हाणून पाडी...!


दुःखाच्या वेदनांना बाजूला सारून,

तो आता कठोर बनलाय....!

नसली बैलं गाडीला म्हणून काय झालं,

गाडीला तो बैल म्हणून जुंपलाय....!


पोटच्या गोळ्यावाणी ती, सर्जा राजाला,

रोज कणीक खाऊ घालायची....!

आता परिस्थिती बदलली,

जगण्यासाठी रोज बैलगाडी ओढायची....!


बैलजोडी विकली म्हणून बापावर,

दुःखाचा मोठा डोंगर कोसळला...!

वाटलं करावी आत्महत्या पण,

बायकोसमोर रडताना तो पुरता ढासळला... !


आता तो आपल्या बायकोसमवेत,

संसाराची बैलगाडी ओढतोय...!

सर्जा राजाच्या आकांतात,

रोजच मोठा हंबरडा फोडतोय... !



साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Dinesh Kawade

Similar marathi poem from Tragedy