आज। वाटले
आज। वाटले
आज वाटले भल्या पहाटे
दूर दूर जावे
सोबतीस चांदणे अन्
हातात हात असावे
निद्रिस्त प्राजक्ताने अवेळी
फुलून यावे
मृदूमंद रातराणीने
पुन्हा सुगंधीत व्हावे
सळसळता खट्याळ वारा
छेडीतो स्वरांनी गाणे
मुक्या अबोलीने शब्दात व्यक्त व्हावे
संन्यस्त शुभ्र जाई
बहरुन पुन्हा यावी
नजरेची अवखळ भाषा
नजरेस सांगते काही
मावळतीस चंद्र बुडतांना
ते निरोप हसूनी घ्यावे
ही वेडी आस मनीची
कधी का पूर्ण होई?
मिटल्या त्या पापण्यांना
भास उगाचच होती
सत्याला सामोरे जाणे
मग किती ते अवघड बनते ?

