आई
आई
आई तुझी आठवण येते
बाजारातील भरगच्च मोगऱ्याचे गजरे बघून आई तूझी आठवण येते.
मोगरा ही तोच गजरे ही तेच पण ते गजरे
आपल्या लांब सडक केसात माळणारी तू मात्र नाहीस.
आई तुझी आठवण येते.
गौरीच्या सणाला पुरण पोळी खाताना
अजूनही पुरणाचा घाट घालताना केलेली तुझी धावपळ दिसते.
आई तुझी आठवण येते.
जीवनाच्या वाटेवर संकटाशी लढताना
थकल्या जीवाला विसावा देणारी तूझी मांडी आठवते .
आई तूझी आठवण येते.
भरकटलेल्या आयुष्याला जेव्हा दिपस्तंभाची गरज वाटते .
तेव्हा आई तुझी आठवण येते.
आयुष्यातील यश ,आनंद वाटण्यासाठी
मनाचे हितगुज करण्यासाठी जेव्हा मैत्रीण हवीशी वाटते.
तेव्हा आई तुझी आठवण येते.
