आई
आई
माहेरची आठवण सरता सरे ना,
आईचा चेहरा डोळ्यासमोरून हलेना,
वात्सल्य मूर्ती ती, कारुण्याचा झरा,
निरागस हास्य जसा फुललेला मळा,
झुरत होती माझ्यासाठी ती दिन रात,
थकत नव्हती ती सकाळ संध्याकाळ,
चव होती हाताला जशी काही सुगरण,
घरादारासाठी ती करीत होती जागरण,
वेड्या मनाची कोणी समजूत काढा,
डोक्यावरून हात फिरवायला,
कुतूनतरी मला माझीआई आणा,
आईशिवाय मला आता करमत नाही,
कशाकशात मन माझे रमत नाही,
वाटते आता मला स्वर्गात जावे,
वर जाऊन बिलगून तिला,
खूप खूप मनसोक्त रडावे,
मला मागे ठेवून का अशी निघून गेली?
काय घडलं गुन्हा,ज्याची शिक्षा अशी दिली?
डोळ्यांमधून वाहू लागला अश्रूंचा पूर,
सोडून तू गेली मला आई खूप दूर
भेटशील का आई मला माझ्या पुढच्या जन्मी?
कुशीत तुझ्या शिरून बसेन मी बिलगुनी!!
