STORYMIRROR

Vinay Dandale

Inspirational

4  

Vinay Dandale

Inspirational

कुंडी

कुंडी

1 min
346

तेव्हा आजोबा नेहमी बजावून सांगायचे

    पाणीटंचाई कितीही असली तरी, 

    अंगणातील भिंतीवर टांगलेल्या कुंडीमध्ये 

    नियमित पाणी घालावे

    तृषार्त चिमण्या पाखरांसाठी..! 

    

खरंच , 

    किती गर्भितार्थ होता 

    त्यांच्या त्या सांगण्यात, 

    हे आता आलंय माझ्या लक्षात, 

    

चातक पक्ष्याला 

    पहिल्या पावसाच्या सरींमधून 

    पाण्याचा एक थेंब

    टिपून तहान भागवताना 

    जेव्हा मी बघितलं 

    अन् 

    पाण्याच्या कुंडीचं महत्त्व 

    मला कळलं !!! 


Rate this content
Log in

More hindi poem from Vinay Dandale

Similar hindi poem from Inspirational