हॅप्पी होली !
हॅप्पी होली !
माझी काड्यापेटी
पावसात भिजली!
एक बी काडी नाही पेटली
दुसरी कुठं न्हाई भेटली
मंग होळी पेटवु कशी ?
बोंब मारु कशी ?
तिकडुन आला गण्या !
बोला ए शहाण्या !
हा घे लायटर !
आन एक काम कर!
एक फडका घे
त्याले पीळ दे
कडकडीत काकडाच कर!
वर ओत घासलेट
आन धर लायटर
होळी पेटव
आन् मज्जा कर !
पण मेल्यानं
केलान घोटाला!
आँख मारके मुझे बोला !<
/p>
भाऊ.....
आज होली है होली!
हॅप्पी होली!
मार सबको गोली !
अपना भी कुछ सोचा कर!
आज होली का
कुछ तो खयाल कर...!
चल घोटा लगा!
घोटा बी लावला ! खंबा बी घेतला !
आन आख्ख्या चाळीत
त्यानं धिंगाणा घातला !
रंग बरसे जमके बरसे
गण्या दारु के लिये तरसे!
आता ....
याले आवरु कसा ?
याले सावरु कसा ?
वर म्हणतो कसा ?
अबे प्यारे
सब खतम हुआ क्या रे?
कुछ और मंगा तो सही !