क्रांतिकारक बाबुगेनू सैद
क्रांतिकारक बाबुगेनू सैद
भारतीय स्वतंत्रता लढ्यातील क्रांतिकारक हुतात्मा बाबू गेनू सैद हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील म्हांळूगे पडवळ या गावचे लहानपणी च वडिलांचा मृत्यू झाल्याचे कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि रोजगार मिळवण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली, मात्र ब्रिटीशांचा जूलमी कारभार पाहुन त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली,ब्रीटीशांना भारतातून हाकलायचे तर त्यांच्या मालावर बहिष्कार घातला पाहिजे हे त्यांना कळले या लढ्यात एकदा त्यांना तुरूंगवास भोगावा लागला, तेथून सुटका झाल्यावर पुन्हा ते स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले, परदेशी मालाला विरोध करण्यासाठी त्यांनी ब्रिटिशांच्या मालवाहतूक करणाऱ्या ट्रक ला अडवले व ट्रक पुढे जाऊ नये म्हणून ते ट्रक समोर आडवे झाले, ब्रिटिश शिपायाने ट्रक ड्रायव्हरला त्यांच्या अंगावरुन ट्रक नेण्यास सांगितले, ट्रक ड्रायव्हरने बाबू गेनू सैद यांच्या अंगावर ट्रक घातला व पुढे नेला यात बाबू गेनू सैद गंभीर जखमी झाले व यातच त्यांचे प्राण गेले स्वदेशी चळवळ व देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते अमर हुतात्मा झाले तो दिवस होता 12 डिसेंबर 1930 ज्या रस्त्यावर बाबू गेनू सैद हुतात्मा झाले त्या मुंबईतील रस्याला हुतात्मा बाबू गेनू सैद असे नाव देण्यात आले आहे तसेच आंबेगाव तालुक्यातील म्हांळूगे पडवळ या गावात त्याचे स्मारक पुतळा उभारण्यात आला आहे.हुतात्मा बाबू गेनू सैद यांचे कार्य प्रेरणादायी आहे,त्याच्या बलिदानाला स्मरण व वंदन करून आपण हि परदेशी ब्रॅण्ड वस्तू वापरण्यापेक्षा भारतीय बनावटिच्या वस्तू वापरल्या पाहिजे तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल , त्यांच्या स्मृती ला विनम्र अभिवादन
