STORYMIRROR

भरत टोणपे

Others

2  

भरत टोणपे

Others

नरकासुर

नरकासुर

2 mins
72

नरकचतुर्दशी

दिवाळी सणात आश्विन कृष्ण चतुर्दशी अर्थात नरक चतुर्दशीचे फार महत्त्व आहे. श्रीमद्भागवत पुराणात सांगितल्या प्रमाणे श्रीकृष्णाच्या काळात प्राग्यज्योतिषपूर येथे नरकासुर नावाचा राक्षस राज्य करीत होता.त्याने तपश्चर्या करून ब्रम्ह देवाला प्रसन्न करून घेतले होते व कुणाकडूनही न मारला जाण्याचा वर प्राप्त करून घेतला होता,तो त्याच्या या वराच्या सामर्थ्याचा दुरूपयोग करू लागला तो मानवांना त्रास देवू लागला त्याने प्रचंड सपंत्ती धन धान्याची लूट सुरू केली, तो देवांना सुध्दा त्रास देवू लागला तो ज्या ज्या ठिकाणी लूट करायचा त्या वेळेस तो धनसंपत्ती बरोबरच तेथील सुंदर मुली महिलांच सुध्दा अपहरण करून पळवून न्यायचा, अशा सोळाहजार शंभर स्रिया पळवून नेल्या त्याच्या या त्रासाला कंटाळून देवांनी त्याचा बंदोबस्त करण्याची विनंती श्रीकृष्णाला केली त्या वेळेस श्रीकृष्णाने नरकासुर च्या राज्यावर आक्रमण करण्याचे ठरवले परंतू नरकासुराचे राज्य अतिशय सुरक्षित होते ते पाणी आणि अग्नि या मधे सुरक्षित होते त्या वेळेस भगवान श्रीकृष्णाने पत्नी सत्यभामेसह गरूडावर बसून नरकासुराच्या राज्यावर आक्रमण केले आणि नरकासुरा बरोबर युध्द करून त्याच्या देहाचे दोन तुकडे केले व अपहरण केलेल्या सोळाहजार शंभर स्रियांना श्रीकृष्णाने मुक्त केले पण अशा परपुरषाने अपहरण केलेले या मुलींना समाज स्वीकारणार नाही त्यांचे हाल व अवहेलना होईल हे लक्षात घेऊन श्रीकृष्णाने या सोळा हजार शंभर कन्यां बरोबरच 

 विवाह केला त्या मुळे या कन्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळाली,सोळाहजार शंभर महिला नरकयातनेतून मुक्त झाल्या,या वेळेस नरकासुराने श्रीकृष्णाकडून एक वर मागितला आजच्या दिवशी जो सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करील त्याला नरक यातना होणार नाहीत त्यांचे आरोग्य चागंले राहील व त्याच्या घरी धन संपत्ती नांदेल या वराला श्रीकृष्णाने तथास्तू म्हणत नरकासुराचे म्हणने मान्य केले, श्रीकृष्णाने हा पराक्रम केला म्हणून श्री कृष्ण चे दीपोत्सव करून स्वागत केले सोळाहजार शंभर कन्यांनी दीपोत्सव केला तो दिवस होता आश्विन कृष्ण चतुर्दशी तेव्हापासून या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात या दिवशी दिवे लावून दीपोत्सव आनंदोत्सव साजरा करतात पहाटे अभ्यंग स्नान करतात गोडधोड पदार्थ करतात व नवीन कपडे घालून विजयोत्सव साजरा केला जातो.


Rate this content
Log in