ऊब
ऊब
दिवस तसे थंडीचे होते मात्र हवामानात झालेल्या बदलामुळे थोड पावसाळी वातावरण संध्याकाळची वेळ वातावरणात सर्द गारवा होता,गाडी चालवत असल्याने अंगात श्वेटर असुनही थंडी वाजत होती आणि अचानक पाऊस पडायला सुरुवात झाली,थंडी आणि पडणारा पाऊस पावसात भिजायला नको म्हणून जवळच असलेल्या बस स्टॉप शेड जवळच गाडी लावली आणि अंगातील श्वेटर काढून डिकीतून रेनकोट काढून बस स्टॉप च्या शेड मधे रेनकोट घालण्या साठी जाव असा विचार करत असतानाच शेड मधे थंडी पावसाने कुडकुडणार्या वृध्द भिकार्या कडे लक्ष गेल, गारठ्याने काकडला होता, हात पाय अगदी शरीरा जवळ दुमडून बसला होता दया आली,एक आपण आहोत आपल्या जवळ थंडी पावसा पासून वाचण्या साठी रेनकोट श्वेटर दोन्ही आहे क्षणाचा विचार न करता माझ्या कडचा श्वेटर त्या वृध्द भिकारी बाबाला दिला, त्याला अतिशय आनंद झाला त्याने तो श्वेटर लगेच अंगात चढवला आणि त्या वृध्दाने श्वेटर वर दोन्ही हात फिरवत ते हात त्याच्या चेहर्यावर फिरवले त्या वृध्दाच्या अंगात आता ऊब आली तो हसला आणि म्हणाला परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो.थंडी पाऊस असतानाही त्याच्या आशिर्वादाने माझ्या शरीरातली थंडी केव्हाच निघून गेली होती. मित्रांनो आपल्या घरातील जुने वापरणात नसणारे श्वेटर ब्लँकेट्स अशा लोकांना जरूर द्या.
