दीपोत्सव
दीपोत्सव
तारकासुराचा वध कार्तिक स्वामी नी केला ,या तारकासुराला तीन मुले होती,या एकाचे नाव तारकाक्ष,दुसरा विद्युन्मालि,तीसरा कमलाक्ष या तीनही दैत्यांनी ब्रम्हदेवाची तपश्चर्या केली आणि ब्रम्हदेवाला प्रसन्न करुन घेतले व त्यांनी ब्रम्हदेवा कडून तीन विशिष्ट प्रकारची नगरे (पुर) तयार करून घेतली ह्यालाच त्रिपुर असे म्हणतात हि शहरे आकाशात फिरणारी होती व जर हे त्रिपुर मध्यान्ह समयी चंद्र पुष्य नक्षत्रात असताना निळ्या ढगांच्या सावलीत आली तरच विषिष्ट अशा बाणाच्या सहाय्यानं त्रिपुरावर बाण मारला तर त्यांचा नाश होईल,आणि असा योग येण फार कठीण या मुळे हे तीनही दैत्य फार उन्मत्त झाले.ह्या त्रिपुरात राहुन ते सर्व सामान्य जनते बरोबर देवांनाही त्रास देवू लागले सर्व देव भगवान शंकरा कडे गेले व त्रिपुरासुरांच्या त्रासा बद्दल सांगितले तेव्हा भगवान शंकराने आपल्या दिव्य शक्ती च्या सहाय्याने हि तीनही पुरं जाळून टाकली व या पुरांमधे राहणार्या त्रिपुरांसुराचा वध केला तो दिवस होता कार्तिक पौर्णिमेचा ,म्हणून या दिवशी विजय व्यक्त करण्यासाठी सर्वत्र महादेव मंदिर व ईतर मंदिरात व घरी दिवे लावतात नदित दिवे सोडतात दिपदान करतात , देव पुजा करून मिठाई वाटली जाते. दिपोत्सव साजरा करतात त्रिपुर वाती लावतात व आनंदोत्सव साजरा केला जातो.याच दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात
ॐ नमः शिवाय
