रायरेश्वर पठार
रायरेश्वर पठार
दर महिन्याला एका गडकिल्ल्यांवर ट्रेकिंग ला जायचे अगदी पायथ्यापासून पायी चालत किल्ल्यावर पोहाचयच जाताना किल्याची ऐतिहासिक माहिती घ्यायची असा उपक्रम चालू असतो, लाॅकडावून च्या काही दिवस आधी आमच्या ग्रुपनी पुणे जिल्ह्य़ातील भोर तालुक्यातील रायरेश्वर पठारावर जाण्याचे ठरवले. सकाळीच सह्याद्रीच्या निसर्ग रम्य डोंगर रागांतून वाट काढीत आम्ही पायथ्यापाशी पोहचलो. समोर भव्य असा रायरेश्वर पठाराचा कातळ कडा आणि एक छोटीशी पायवाट त्यालाच लागून असलेली लोखंडी शिडी चढून पठारावर पोहोचलो. आजूबाला डोळ्यांच पारण फेडणारा निसर्ग लांब अंतरावर दिसणारा केजंळ गड,सह्याद्रीच्या कड्या कपारीतून येणाऱ्या नद्या ,छोट्या पायवाटा आणि या कड्यावर डौलाने फडकणारा भगवा झेंडा....आणि पठाराला सुरवात झाली हिरव गार प्रसन्न वातावरण आणि आम्ही पायवाटेने चालत रायरेश्वर मंदिरा कडे पोहोचलो. वाटेत काही ठिकाणी गर्द झाडी पाण्याचे नैसर्गिक कुंड आणि लांबूनच भगवा झेंडा फडकत असलेला रायरेश्वर मंदिराचा कळस दिसला ...हेच ते पाडंव कालीन महादेवाचे मंदिर. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या निवडक मावळ्यांसह स्वतःचे बोटातून तलवारीने रक्त काढुन 27 एप्रिल 1645 ला रायरेश्वरावर रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती....
पराक्रम शौर्य आणि गणिमी कावा वापरत बलाढ्य मुगल साम्राज्याला धुळ चारत हिंदवी स्वराज्य स्थापल त्याची सुरवात याच रायरेश्वर पठारावरून झाली ,प्रचंड सकारात्मक ऊर्जा देणारा ह्या मंदिरात पोहचलो. अगदी प्राचीन पाषाणात कोरलेल दगडी खांबावर ऊभ असलेल्या मंदिरात गेल्यावर प्रसन्न वाटल आणि गाभार्यात गेल्यावर ती छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श झालेली महादेवाची पिंड ,त्या पिंडीवर डोक टेकवून दर्शन घेतल आणि शिवरायांच्या पद स्पर्शाने पावन झालेला तो पठारावरील परिसर फिरून पाह्यला याच पठारावर आढळून येते. निसर्गाचा चमत्कार म्हणावा असी सात रंगाची माती विविध रंग असलेले नैसर्गिक माती निळी ,पिवळी ,सोनेरी, लाल, जाभंळी अशा रंगाची मुक्त ऊधळण करणारी माती बरोबरच शौर्य ,धाडस ,साहस ,निर्भयता ,त्याग सेवा, प्रामाणिकपणा रयतेविषयी प्रेम आणि स्वातंत्र हा या मातीचे गुणच शिवरांया मधे होते. म्हणूनच हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ येथे घेतली गेली आणि हिंदवी स्वराज्य स्थापन झाल.प्रत्येकाने येथे जाव आणि शिवछत्रपतीच्यां पदस्पर्शाने पावन झालेल्या विविध रंगाची माती असलेल्या या पठाराच आणि शिवमंदिराच दर्शन घ्याव.
