बचेंगे तो और भी लढेंगे
बचेंगे तो और भी लढेंगे
शूर सेनानी दत्ताजी शिंदे
कुकडीच्या लढाईत पराक्रम गाजवणारे व मारवाड प्रांत आपल्या लढवय्या गुणाने आणि पराक्रमाने जिंकणारे शुर सेनानी होते.
1750 चा काळ मराठी सैन्याने पाकिस्तानातील अटकेपार झेंडा रोवला आणि भारतावर 700 वर्ष राज्य करणाऱ्या ईस्लामी राजे भयभीत झाले आणि मुस्लीम राज्यकर्त्यांना मराठ्यांना रोखणे गरजेचे वाटू लागले ,अशातच मराठी सैन्याने दिल्लीही काबीज केली आणि लाल किल्ल्यावर हिंदवी स्वराज्याचा भगवा फडकला, मुघलांना नामधारी राज्य कारभारी करून तिमूरशहा दुराणीला हाकलले, मराठ्यांना प्रतिऊत्तर देण्यासाठी मुस्लिम राज्यकर्त्यांनी अफगाणिस्तानातील अफगान सेनानी अब्दाली याच्या मदतीने नजीबखान व कुतुबशहाने अफगानी व बलूची लोकांच्या छोट्या छोट्या सैनिकी तुकड्या ऊभ्या केल्या व या तुकड्या मराठ्यांच्या छावण्यावर हल्ले करू लागल्या या अब्दालीचा आणि त्याच्या सैन्याचा बिमोड करणे गरजेचे होते आणि 10 जानेवारी 1760 ला बुरूडी घाटावर पानिपतचा रणसंग्राम छेडला गेला अब्दालीच्या अफगाणी फौजा व मराठी सैनिक यांच्यात बुरूडी घाटात
युध्दाला सुरवात झाली, दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांच्या सैन्याच्या तुकड्या अफगाणी सैन्याशी त्वेषाने लढत होत्या, अफगाणी पठाणी सैन्याच्या प्रत्येक सैनिकाकडे बंदुका होत्या फार थोड्या मराठी सैन्याकडे बंदुका होत्या, अनेक मराठा सैनिक या बंदुकांच्या गोळ्यांनी धारातिर्थी पडत होते मात्र दत्ताजी शिंदे आपल्या चौफेर तलवारबाजीने अफगाणी सैन्याला कापित होते, आणि एक गोळी जनकोजी शिंदेच्या छातीत लागली ते खाली कोसळले त्यांना आधार देण्यासाठी दत्ताजी शिंदे खाली वाकले व त्या वेळी नजीबखान व अब्दालीने दत्ताजी शिंदे यांच्यावर गोळ्या झाडल्या त्यावेळी दत्ताजी शिंदे जखमी होऊन खाली कोसळले त्या वेळेस नजीबखान दत्ताजी शिंदे यांच्या जवळ बसून म्हणाला क्यो पाटील और लढेंगे ? त्या वेळेस त्वेषाने व बाणेदार पणे दत्ताजी शिंदे यांनी उत्तर दिले बचेंगे तो और भी लढेंगे! आणि या उत्तराने संतापलेल्या नजीबखान ने दत्ताजी शिंदे यांचे शिर तलवारीने ऊडवले. दत्ताजी शिंदे प्राणपणे लढले व जगाला प्रेरणादायी वाक्य दिले बचेंगे तो और भी लढेगे! अशा महान योद्ध्याचा 10 जानेवारी हा स्मृतीदिन त्यांना विनम्र अभिवादन
