शेवटची सेटलमेंट
शेवटची सेटलमेंट
"आता 60 ते 65 किलो या वजनगटातील स्पर्धा सुरू होत आहे, तरी सर्व स्पर्धकांनी स्टेजवर आगमन करावे." एव्हडं बोलून स्पर्धेच्या संचालकांनी सर्व 'बॉडीबिल्डर्स' ला स्टेजवर येण्याची सुचना दिली.
'सातारा श्री' या शरीरसौष्ठव स्पर्धेचा तिसरा राऊंड सुरू झाला होता. तालिम संघाचे ग्राउंड आता प्रेक्षाकांनी खचाखच भरले होते. बॉडीबिल्डरांना पाहून सगळी लोकं शिट्ट्या आणि टाळ्या वाजवत होते. त्यांच्या पिळदार शरीरयष्टीला प्रेक्षक भरपुर दाद देत होते. सर्व मैदान रोमांचित झालं होतं.
रोहीतने सकाळ पासून काहीच खाल्लं नव्हतं अगदी पाणी सुद्धा पिलं नव्हतं. पण त्याच्या चेहर्यावर थकवा किंवा भुकेचा एकही लवलेशही जाणवत नव्हता. जर आपल्या शरीरात काहीच अन्न नसेल तर आपले शरीर अजुन पिळदार दिसते, कटींग्स व्यवस्थीत दिसतात, अशी त्याची संकल्पना होती. त्याची ही पहीलीच बॉडीबिल्डिंगची स्पर्धा असल्याने तो खूप उत्सुक आणि तेव्हडाच नर्वस पन होता. त्याने संपुर्ण बॉडीला ब्राऊन शेड लावला होता. स्टेजवर गेल्यावर ठरल्याप्रमाणे 'पोज' कश्या द्यायच्या हे मनोमन तो घोळत होता.
संचालकांच्या अनाऊंसमेंट नंतर तो स्टेजकडे जायला निघाला, पयर्यांवरून चढत असताना त्याचं लक्ष अचानक समोर गेलं. स्टेजवर पडत असलेल्या हॅलोजनच्या लाईटींचा प्रकाश त्याच्या चेहर्यावर पडला. त्याने वर पाहीले तर त्याला सगळा प्रकाश दिसला आणि खाली पाहीलं तर त्याला जमलेल्या प्रेक्षकांची प्रचंड गर्दी दिसली. समोर जमलेल्या विराट जनसमुदयाकडे पाहुन रोहीतच्या काळजाचा ठोकाच चुकला. भर डिसेंबरच्या थंडीमधे त्याला दरारून घाम फुटला. त्याला स्टेजवर जाण्याचं धाडसच झालं नाही. आहे तसा तो खाली उतरला, अंगावर शर्ट चढवला. त्याला बघून समीर पळतच त्याच्याकडे आला.
"काय झालं रे रोह्या" समीरने काळजीच्या स्वरात विचारले.
"काही नाही रे, सकाळपासून काही खाल्लं नव्हतं म्हणून अशक्तपणा आलाय आणि चक्करही यायला लागलीय" रोहीने खोटच सांगितलं.
"लका तरी तुला मी म्हणत होतो काहीतरी खा म्हणुन"..."
"जाऊदे रे सम्या, चल गाडी काढ, घरी जाऊ"
दोघेजण रोहीतच्या घरी जाऊ लागले आणि स्टेजवरून "Badge क्रमांक 10 यांनी लवकरात लवकर स्टेजवर ऊपस्थीत रहावे अन्यथा त्यांना या स्पर्धेतून बाद करण्यात येईल...!!" हा आवाज हळुहळू क्षीण होत गेला.
रोहीत घरी गेला पोटभरून जेवला. घरात त्याने या घटनेबद्दल कोणाला काहीच सांगितलं नाही. त्याने गाडी काढली आणि परत समीरबरोबर स्पर्धा पाहण्याठी प्रेक्षकांच्या गर्दीत जाऊन विसावला.
'रोहीत' म्हणजे एकदम शांत व्यक्तीमत्व. हसरा चेहरा. कधी कोणावर न रागवनार, सगळ्यांशी मिळुन मिसळून राहनारा. सर्वांच्या मदतीला तो कायम तत्पर असायचा. त्याचे मित्र कमी होते पण जेव्हडे होते, ते सर्व जिवाला जीव देनारे होते. समीर हा त्याचा लंगोटी यार होता. म्हणतात ना, 'Brother from another mother' तसच काय ते होतं त्यांचं. रोहीतच्या घरची परीस्थीती तशी बेताचीच होती. वडील MIDC मधे कामाला होते. आई ग्रुहीणी आणि एक थोरली बहीण होती.
रोहीत तसा अभ्यासात जेमतेमच होता. कशीबशी त्याने बारावी सोडवली होती. त्याला फक्त दोनच गोष्टींची आवड होती. एक म्हणजे व्यायाम आणि दुसरी म्हणजे Cooking.
बारावीनंतर त्याने एका वर्षाच्या Hotel Management च्या कोर्स ला Admission घेतलं. तिथे तो Top चा Chopping Master बनला. कांदा असो किंवा कोणतीही भाजी असो, पाहीजे त्या क्वांटीटी मधे, पाहीजे त्या प्रकारे तो 2 मिनीटांत कापुन देत असे. संपुर्ण Institute मधे Chopping च्या बाबतीत त्याचा कोणी हात धरू शकत नव्हतं. In Short तो 'स्पीडचा बेताज बादशाहा' बनला होता. 6 महीने Institute मधे घालवल्यानंतर पुण्यातील नामांकीत 5 स्टार हॉटेलमधे Internship साठी त्याची निवड झाली. तिकडे त्याला मुबलक पगार पण होता आणि आवडीचं काम असल्याने तो एकदम मन लाऊव काम करत होता. Internship झाल्यानंतर सिंगापूरला असणार्या 7 स्टार Cruise वर काम करण्यासाठी त्याची निवड झाली होती. कंपनीने त्याला बक्कळ पॅकेजही ऑफर केलं होतं.
रोहीत जाम खूष झाला होता. घरी गेल्यावर त्याने ही बातमी सांगितली. त्याला वाटलं सगळे खूष होतील पण झाले उलटेच, त्याच्या आईने त्याला परदेशात जाण्यासाठी सक्त नकार दिला. वडीलांनी पण नकारघंटा दर्शवली. त्याच्या घरच्यांचा असा गैरसमज होता की देशाबाहेर गेल्यावर मुलं बिघडतात, हाताबाहेर जातात, घराकडे फिरकत पण नाहीत. झालं...!!! रोहीतने खुप समजवण्याचा प्रयत्न केला. कडाक्याचे भांडण झाले. आईने जीव देण्याची धमकी दिली. वडीलांनी परदेशात न जाण्याची शप्पत घातली.
शेवटी रोहीतने घरच्यांसमोर हार मानली. त्याने सगळं सोडून दिलं. हताश होऊन घरच्यांच्या मर्जीप्रमाणे त्याने कला वाणिज्य कॉलेजला Admission घेतलं आणि समीरच्या ओळखीने पुढारी पेपरच्या Office मधे Office boy म्हणून रूजू झाला. ईच्छा नसतानाही तो फक्त घरच्यांच्या मर्जीखातर हे सगळं करत होत. त्याच्या आवडीची फक्त एकच गोष्ट राहीली होती ती म्हणजे व्यायाम, पण काल झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेमधील घटनेमुळे त्याच्यातला आत्मविश्वासच मरून गेला. त्याने जीमला पण जायचं बंद केलं. तो फक्त आता घरीच दंड बैठका मारायचा. त्याने कट्ट्यावर पण जाणं आता कमी केलं होतं. कॉलेज, Office आणि घर एव्हडच त्याचं रूटीन झालं होतं. फक्त अधुन मधून तो एका Event Management च्या कंपनीसाठी सर्विस एक्झिक्युटीव म्हणून काम करायला जायचा.
"ए आई, दे ना मला डबा लवकर. कीती उशीर लावतेस, तो साहेब एकतर माझ्यावर कायम डोळा ठेऊन असतो." रोहीत Office ला जायच्या गडबडीत होता.
डबा बॅगेत टाकून रोहीत Office ला पोचला. तिथली कामे ऊरकुन तो विसावला होता तोच त्याला फोन आला, हॉटेल 'मराठा पॅलेस' मधे आज 7 वाजता एक Event होता. त्यासाठी त्याला बुलावा आला होता. त्याने होकार सांगितला आणि परत तो त्याच्या कामात गुंतला.
सायंकाळी 6:30 पर्यंत रोहीतने Office मधली सगळी कामे ऊरकली. ठरल्याप्रमाणे तो 7:00 वाजता 'मराठा पॅलेस' ला पोचला. तिथे त्याच्याबरोबर अजून 14 मुले आणि 7 मुली होत्या. रोहीतने सर्व मुलांबरोबर ओळख करून घेतली. तो आधीपासुनच लाजाळू स्वभावाचा असल्यामुळे तो विशेषत: मुलींशी बोलताना घाबरायचा. त्यामुळे त्याने तिथल्या एकाही मुलीकडे ढंकुनही पाहीले नाही. मैनेजर ने सर्वांना आपापली कामे वाटून दिली. रोहीतला टेबल आणि खुर्च्यांवर पांढरे कापड लावायचे काम दिले होते. त्याचे सगळ्या खुर्च्यांना कापड लावून झाले होते. आता त्याने टेबललांना कापड लावायला सुरवात केली. पण टेबल मोठा असल्यामुळे त्याला एकट्याला कापड लावणे जड जात होते.
"Excuse me, मी काही मदत करू क?"
अचानक आलेल्या आवाजाने रोहीत दचकला. त्याने वर पाहीले तर, त्याच्यासमोर एक मुलगी ऊभी होती.
तिचे टपोरे डोळे... त्याच्याकडेच पाहत होते... ती हसत होती. तिच्या ओठांच्यावर छोटासा तीळ होता, तो तिच्या चेहर्याला खुप सुंदर शोभून दिसत होता. तिच्या चेहर्यावर आलेली केसांची बट हलकेच मागे सारून ती त्याच्याशी बोलत होती. इतक्या जवळून पहील्यांदाच तो एखाद्या सुंदर मुलीला पाहत होता. ती मन मोहुन टाकनारी होती..!! तीच्या नजरेत दोन तीन सेकंद त्याची नजर खिळली होती.
"न... नको...!!" काहीसा अडखळतच तो बोलला.
पण तीने त्याचं काही एक ऎकलं नाही आणि ती त्याला कापड लावायला मदत करू लागली.
रोहीत मनोमन खूष झाला होता पण चेहर्यावर त्याने त्याचे हे भाव दाखविले नाहीत.
"तुझं नाव काय रे?" तिने विचारलं.
"रोहीत"
"आणि तुझं?" त्याने घाबरतच विचारलं
"आयेशा" ती उत्तरली.
हळुहळू त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. रोहीतपण आता तिच्या बरोबर कंफरटेबल झाला. दोघांनी खूप गप्पा मारल्या. एकामेकांची भरपूर थट्टा मस्करी केली. Event संपल्यानंतर अर्थातच रोहीतने जड अंतकरणाने तिचा निरोप घेतला. Actually त्याला खरंतर तिचा मोबईल नंबर मागायचा होता, पण As usual त्याचं धाडसच झालं नाही.
दुसर्या दिवशी नेहमीप्रमाणे रोहीत त्याच्या कामाला लागला. पण आज काही केल्या त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं. राहून राहून त्याला आयेशाची खूप आठवण येत होती. तीच तेहरा, तीचे बोलने त्याला सतत आठवत होते. आपण तिला मोबाईल नंबर का मागितला नाही या गोष्टीची त्याला खूप खंत वाटत होती. आपण एव्हडे फट्टु कसे असु शकतो याचे त्याला खूप वाईट वाटत होते.
या गोष्टीला चार पाच दिवस झाले पण एकही क्षण असा गेला नसेल की त्याला आयेशाची आठवण आली नसेल. रोहीत आपल्या कामामधे व्यस्त होता, तोच त्याच्या मोबाईलची रिंग वाजली.
"हॅलो?"
"हॅलो...!!" पलिकडून मुलीचा आवाज आला.
"हं कोण??"
"काय रोहीत, एव्हड्या लवकर विसरलास?"
रोहीतच्या डोक्यात एकदम ट्युब पेटली. संपुर्ण शरीरात वीज संचारली. त्याचं सगळं शरीर बर्फासारखं थंड पडलं. ह्रुदयाचे ठोके जोरात वाढले. हात थरथर कापू लागले. त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. तरीपण सर्व अवसान एकवटुन तो बोलला...
"कोण... आयेशा??"
"होSS... काय यार, मोठी माणसं तुम्ही, विसरलात लगेच आम्हाला...!!"
दोघेही खुप हसले.
आयेशाला पण रोहीत खूप आवडला होता. त्याचं आकर्षक व्यक्तीमत्व, त्याचा शांत आणि लाजाळू स्वभाव तिच्या मनाला खूप भावला होता. तिला माहीती होतं रोहीतने काय तीला तिच्या संपुर्ण आयुष्यात फोन केला नसता. शेवटी तिनेच मैनेजर कडून रोहीतचा नंबर मिळवला होता.
आयेशा रोहीतपेक्षा दोन वर्षांनी मोठी होती. पण याची पर्वा त्या दोघांनाही नव्हती. ते दोघे एकामेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. दिवसभर ते फोनवर बोलायचे आणि संध्याकाळी दोघेजण आपापली कामे लवकर आटोपून एकामेकांना भेटत असत. कधी ते राजवाड्याची चौपाटी, कधी चार भींती, कधी कुरणेश्वर, तर कधी गुरूवार बाग अशी त्यांची निरनिराळी भेटण्याची व फिरण्याची ठिकाणे होती. रोहीतपण आता तीच्यामधे छान रमू लागला. त्याचा आत्मविश्वास आता चांगलाच वाढला होता. आपल्या सुख दुखा:मधे भगीदार होणारं कोणीतरी आपलं माणूस आहे, या विचाराने तो चांगला सुखावून जायचा.
"हॅलो...!!" आयेशा स्पुंदत बोलली.
"हॅलो, अैशु बोल ना काय झालं?" आयेशाचा रडवेला आवाज ऎकून रोहीतला धडकी भरली.
"मला तुला आत्ता भेटायचं आहे.." आयेशा रडता रडता बोलली.
"ठिक आहे, नटराज मंदिरापाशी थांब मी आलोच"
एव्हडं बोलून रोहीतने कसाबसा हाफ डे टाकला आणि तडक तिला भेटायला गेला.
रोहीत येताच आयेशा रोहीतच्या गळ्यात पडून हुंदके देऊन रडू लागली. रोहीतने कसेबसे तिला शांत केले. रडण्याचे कारण विचारल्यावर तिने सांगितले की तीचे वडील त्यांच्या नात्यातल्या एका मुलाबरोबर तीचे लग्न ठरवत आहेत. रोहीतला पण या गोष्टीचे वाईट वाटले, तो आयेशाला बोलला थोड्या दिवस थांब माझं Graduation पुर्ण होऊ दे आपण लग्न करू, मला थोडा वेळ दे. पण 'वेळ'च आयेशाकडे कमी होता.
या गोष्टीवरून त्यादोघांमधे आता खटके ऊडू लागले. आयेशा रोहीतकडे आता लग्नाचा तगदा लावला होती. रोहीत कसंबसं तिला समजवायचा, स्वत: च्या परिस्थीतीची तिला जाणीव करूण द्यायचा. आयेशा पण समजून घ्यायची पण तेवड्यापुरतच...
"हॅलो"
"हं, बोल ना बाळा"
"कुठे आहेस तू??"
"Office मधे, बोल की काय झालं"
"खाली ये, मी तुझ्या Office च्या खाली थांबली आहे"
रोहीत खाली गेला, पाहतो तर काय आयेशा उभी होती, सोबत तीच्या हातात कपड्यांनी भरलेली बॅग होती आणि पाठीवर Sack अडकवली होती.
"काय ग झालंं अैशू?"
आयेशा रोहातच्या हातात हात घलून म्हणाली,
"मी घरातुन न सांगता निघून आली आहे, मला नाही रहायचं आता तिशे. चल आपण आत्ताच्या आत्ता पळून जाऊन लग्न करू"
हे ऎकून रोहीतच्या डोक्यात शीट्ट्या वाजल्या. दुपारचे 12 वाजले होते. रोहीतला काही सुचत नव्हते. त्याने कशी ईमरजन्सी सुट्टी टाकली आणि समीरला फोन केला. समीर गोष्टीचे गांभीर्य ओळखून 10 मीनीटात हजर झाला. तीघेजण मिळून संगम माहुलीला गेले. तिघेजण विचार करू लागले, आता निर्णय घेतलाय तर मागे हटायचं नाही.
लग्न कसं करता येईल आणि पुढे कसं कसं काय काय करायच याबद्दल त्यांचं Discussion सुरू झालं. तेव्हड्यात दुपारी 2 च्या दरम्यान रोहीतला एका लोकल Land line नंबर वरून फोन येतो.
"हॅलो..."
"कोण, रोहीत जाधव..?"
"हा, बोलतोय...!!"
"मी हवलदार सावंत बोलतोय, अर्ध्या तासात मुलीला घेऊन सीटी पोलिस स्टेशन मधे या. नाहीतर परिणाम खूप वाईट होतील."
आता मात्र रोहीतच्या पाचावर धारण आली.
दुपारी 3:30 च्या आसपास दोघेजण पोलिस स्टेशनच्या दरवाजा पाशी पोहचतात. आतमधे इन्सपेक्टर घोलप फईली चाळत बसलेे होते. आयेशाचे वडील आणि चुलते तीची वाट बघत बसले होते. त्या दोघांना पाहताच इन्सपेक्टर घोलप रोहीतला दरवाजातून आत ओढतो.
"भाडखाऊ, मा***द, पोरीला पळवून नेतोस...!! हेच धंदे करायला शिकलास का..." असे बोलून घोलप रोहीतला चार पाच कानाखाली मारतो आणि एक जोराची लाथ त्याच्या पोटात घालतो. रोहीत एका कोपर्यात पडून कळवळतो.
रोहीतची हालत बघून आयेशा जोरात ओरडते, "साहेब त्याची काही चुक नाही, मीच घरातून पळून आले होते...!!"
भोकाड पसरत ती त्याच्याकडे पळते, पण तीचा चुलता तीचा हात पकडतो अन फाडकन एक कानाखाली वाजवतो.
"चूप कर, पूरे खानदान का नाम बदनाम कर दिया है छिनाल ने...!!"
आयेशा मुसमुसत शेजारच्या बेंचवर बसली. घोलपने रोहीतला त्याच्या केबिनमधे बोलवले.
"हे बघ, तीचा बाप आता तुझ्यावर F.I.R करायला सांगत आहे. तुझ्यावर जर का एकदा FIR पडली तर तुझ्या करीयरचा बट्ट्याबोळ झाला म्हणून समज."
रोहीत फक्त होकारार्थी मान डोलावत होता.
"पण मी तिच्या बापाला समजवले आहे. 10,000 रूपायात तुमचा मामला सेटल करतो. जा पटकन पैशाचा बंदोबस्त कर."
ते ऎकून रोहीत बोलला, "साहेब, आत्ता माझ्या ATM मधे फक्त 4,000 रूपये आहेत. ऊरलेले पैसे मी तुम्हाला उद्या देतो."
घोलपने संमती दिली आणि तो पैसे काढायला ATM ला निघाला. जाता जाता त्याची नजर मंगेश वर पडली. मंगेश पुढारी पेपरसाठी पत्रकार म्हणून काम करत होता. पोलिस स्टेशनला तो क्राईम रिपोर्ट घेण्यासाठी आला होता, तेव्हा त्याने घडलेला सर्व प्रकार पाहीला होता. रोहीत त्याच्याशी काहीच न बोलता ATM ला गेला.
ईकडे घोलपने आयेशा आणि तिच्या Family ला आत बोलवले,
"हे बघा, मी आत्ताच त्या मुलाशी बोललो, त्याची या सर्व प्रकारात काहीच चुक नाहीये. तो तुमच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करायला सांगत आहे."
आयेशा हे सगळं प्रश्नार्थक चेहरा करून ऎकत होती. तीचा तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता.
"पण मी त्याच्याशी बोललोय, 10,000 मधे तुमचा मामला सेटल करतो. मुलीची बदनामी पण होनार नाही आणि तुम्हाला काही त्रास पण होणार नाही."
आयेशाच्या वडीलांना ही गोष्ट पटते. ते इन्सपेक्टरच्या हातावर 10,000 रूपये टेकवतात व बाहेर जातात.
बाहेर रोहीत पैसे आणून बेंचवर बसलेला असतो. आयेशाला बाहेर येताना पाहून तो उभा राहतो. आयेशा त्याच्याकडे ढंकुनही पाहत नाही. आयेशाचे वडील आणि तिचा चुलता रोहीतकडे जळजळीत कटाक्ष टाकून पोलिस स्टेशनच्या बाहेर पडतात. रोहीत निमुटपने घोलपला 4,000 सुपुर्द करतो आणि उद्या ऊरलेले पैसे द्यायचा वादा करून बाहेर पडतो.
रोहीत पोलिस स्टेशनच्या बाहेर पडतो तोच 8-10 मुलांचा घोळका त्याला घेरून ऊभा राहतो. त्या घोळक्या मधला म्होरक्या रोहीतचं गचुंड पकडतो आणि परत आयेशाच्या नादी न लागण्याची तंबी देतो. रोहीत फक्त होकारार्थी मान डोलवून हो बोलतो. घोळका फुशारक्या मारत निघून जातो.
रोहीत मान खाली घालून घरी जात असतो तोच त्याच्या Office मधल्या मैनेजरचा फोन वाजतो.
"हॅलो"
"हॅलो रोहीत, आत्ताच्या आत्ता Office ला ये आणि येताना Office चे आय. डी. कार्ड पण घेऊन ये."
"ओक्के"
रोहीत काय समजायचय ते समजला. मंगेशने मैनेजरला पीन मारली होती. Office ला गेल्यावर त्याच्याकडून राजीनामा लिहून घेतला गेला. रोहीतने निमूटपणे राजीनामा आणि आय. डी. कार्ड मैनेजरकडे सुपुर्द केले आणि घरचा रस्ता त्याने पकडला.
सायंकाळचे 7 वाजले होते. रोहीत घरी पोचला. त्याची आई दारातच गवारीची भाजी निवडत बसली होती. रोहीतला पाहताच ती बोलली,
"बघ मी तुझ्या आवडीची भाजी आणली आहे. उद्या तुला डब्याला देते."
रोहीत हलकेच हसला. फ्रेश झाला. रात्रीचं जेवण ऊरकून अंथरूणावर पडला. शून्यामधे पाहत "उद्याची उरलेली सेटलमेंट कशी करायची, उद्या डबा घेऊन कुठे जायचं..." या गोष्टींचा विचार करत बसला.....
----------------******--------------******-------------
(6 वर्षानंतर)
माझा Interview मस्त गेला होता. महिन्द्रा कंपनीमधे माझी Area Sales Manager म्हणून निवड झाली होती. जाम खूष झालो होतो मी. मनाशी म्हटलं "बास...!! आता आपण 'सेटल' झालो. Joining चा पहीला दिवस होता. कोल्हापूरला आमच्या Head Office ला मला HR Admin. ला रिपोर्ट करायचं होतं. Office ला गेल्यावर मी HR सरांच्या केबीनच्या दिशेने वळालो, बोर्ड लागला होता, "Rohit Jadhav"(HR administration).
मी हलकेच दार लोटलं आणि बोललो,
"Excuse me sir"
रोहीत सरांनी माझाकडे पाहीलं आणि बोलले,
"Yes, please come in....!!!"
(समाप्त)