Viral Video प्रसारण Viral Video प्रसारण

Drama Action

2.3  

Viral Video प्रसारण Viral Video प्रसारण

Drama Action

वॉन्टेड

वॉन्टेड

8 mins
962


"हॅलो अक्षय, कोठे आहेस तु?"

"हा... निघतोय आता."

"Okk...!! नळ Stop ला आल्यावर Call करतो."

एव्हडं बोलून मी फोन ठेवला, Sack मधे कपडे भरले. रूम Lock केली, वाघोली च्या Bus Stop पाशी आलो आणि 'पुणे स्टेशन' ला जाणार्या Bus ची वाट पाहु लागलो...

College ला दिवाळीची सुट्टी लागली होती. सुट्टी म्हणजे 4-5 दिवसांची जबदस्तीने घेतलेली रजाच ती. Engineering ला कुठे असते तेव्हा 'दिवाळी' ची सुट्टी किंवा 'उन्हाळ्याची' सुट्टी. तर मी चाललो होतो अक्षयकडे. खूप दिवसांनी त्याला भेटणार होतो. तसं नवोदय सोडल्यानंतर त्याला भेटायची ही दुसरीच वेळ होती. अजुनही अठवतय जेव्हा त्याला 1st time भेटायला चाललो होतो, तेव्हा फक्त स्वारगेट आणि पुणे स्टेशन च माहीती होतं. अक्षय ने मला सांगीतलं होतं की स्वारगेट वरून डायरेक्ट "कोथरूड डेपो" ची बस पकड आणि नळ Stop ला उतर. मी स्वारगेटच्या बस Stop वर ऊभा राहीलो अर्धा-पाऊण तास झाला "कोथरूड डेपो" ची PMT आलीच नाही. या वेळेत माझ्या समोरुन 5-6 "को. डेपो" नावाच्या PMT गेल्या. शेवटी न राहवून मी शेजारी विचारपूस केली तेव्हा समजलं की "को. डेपो" म्हणजेच "कोथरूड डेपो..." माझ्या या भोळेपणावर तेव्हा अक्षय आणि मी खुप हसलो होतो. हा सगळा Flash back आठवत मी पुणे स्टेशन ला पोचलो आणि तिथुन "को. डेपो" च्या PMT मधे बसलो.

'अक्षय' म्हणजे आमच्या मैत्रीच्या दुनीयेतला राजा माणुस. मित्रांच्या मदतीला कायम धावून येनारा. आर्थिक मदत असो किंवा अजुन कोणतीही मदत, अक्षय कायम मदतीसाठी तत्पर असायचा. त्याची एक सवय होती, तो भिकार्यांना कायम पैसे द्यायचा. असा एकपण भिकारी नव्हता की जो अक्षयकडे आला आणि रिकाम्या हाताने परत गेला. त्यामुळे आम्ही अक्षयला चेष्टेने 'कुबेर' बोलायचो.

तो वाडिया कॉलेज मधे B.Com करत होता आणि कॉलेज करता करता CCD मधे पन Job करत होता. CCD चे त्याने माझे जवळपास सर्व लाड पुरवले होते. Cappuccino पासून ते बिर्याणी पर्यंत चे सगळे Menu त्याने मला खाऊ घातले होते.

नळ Stop ला आला आणि बोलला, 

"आन्या, बस पटकन 'अलका' ला 'वाँटेड' चा शो लागला आहे, जाऊ पहायला."

तीथुनच आमची स्वारी 'अलका' Talkies ला निघाली. जाता जाता समजलं की अक्षय ची ही तीसरी वेळ आहे Wanted movie पहायची, त्याला तो मुव्ही खुप आवडला होता. मुव्ही पाहीला, सल्लुच्या एन्ट्रीवर, त्याच्या डायलाँगवर मनसोक्त शीट्ट्या मारल्या. सिंगल स्क्रीनवर मुव्ही पहायची हीच खरी मजा असते. हिरोने एखादा खणखणीत डायलाँग मारला की एव्हड्या वेळ शीट्ट्या अन् टाळ्या पडायच्या की पुढचे 2-3 डायलाँग ऐकूच यायचे नाहीत...!!

मुव्ही पाहील्यानंतर आम्ही रूम मधे आलो. तिकडे सगळ्या मित्रांशी भेटलो. रात्रभर आमच्या शाळेतल्या गप्पा, मित्रांचे Gossip, भुतांच्या गप्पा रंगल्या. रात्री झोपायला पार पहाट उजाडली. त्यामुळे दुसर्या दिवशी ऊठायला डायरेक्ट दुपार झाली. बाकीचे मित्र सकाळी ऊठुन आपापल्या ऊद्योगाला गेले होते. मी येनार म्हणुन अक्षय ने सुट्टी टाकली होती, त्यामुळे तो अजून निवांत झोपला होता. उठुन आम्ही रूमची आवरा आवरी केली. जेवन करून ईकडे तिकडे जरा टाईमपास केला. मी आता घरी निघायच्या तयारीला लागलो. मी अक्षयला पण माझाबरोबर येण्याचा आग्रह केला. सुरवातीला त्याने आढेवेढे घेतले, पन नंतर तो तयार झाला. CCD मधे त्याने फोन करुन Emergency Leave घेतली आणि सातार्याला निघण्यासाठी प्रस्थान केलं.

यावेळेस काहीतरी 'हटके' करावं म्हणून आम्ही ठरवलं की आपण रेल्वेने प्रवास करायचा. ठरल्याप्रमाणे आम्ही ऱेल्वे स्टेशन ला पोहचलो. 17:15 ची पैसेंजर प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर उभी होती. मी तिथल्या बुक स्टॉल वरून 'नागायन' सिरिज च 'अंतिम कांड' नावाचं 'राज कॉमिक्स' घेतलं आणि bag मधे टाकलं. पैसेंजर गाडी असल्यामुळे गर्दी काहीच नव्हती. आम्ही Window seat पकडली आणि निवांत पाय पसरून बसलो. रेल्वे सुरू झाली आणि झाडे, झुडपे, घर, ईमारती सगळं मागे सोडत सुसाट निघाली. तेव्हा अक्षय ने नुकताच LG चा touchscreen मोबाईल घेतला होता आणि Touchscreen ची तेव्हा भयानक Craze होती. मी त्याचा मोबाईल घेऊन डोंगर, झाडांचे शुटींग करत बसलो. कधी फोटो काढ, तर कधी गेम खेळ तर कधी Video बघ असा माझा कार्यक्रम सुरू होता. अक्षय कॉमिक्स वाचण्यात व्यस्त होता.आमच्या डब्यामधे College वरून घरी जाणारी 3 मुले बसली होती. त्यांच्या गप्पांवरून असं समजलं त्यांच्या मोबाईल मधे Wanted मुव्ही होता. अक्षय ने मला नजरेनेच खुणवलं, मी बोललो थोड्या वेळाने त्यांना मुव्ही मागतो.

आमच्या रेल्वेच्या डब्यात एक साधारण् 12-13 वर्षाचा मुलगा होता. रेल्वे सुरू झाल्यापासून मी नोटीस करत होतो की तो दरवाजापाशी जाऊन उभा राहत होता आणि बाहेर डोकावत होता. मी त्याला एकदा दोनदा हटकलं, तो काहीच बोलला नाही आणि आतमधे येऊन बसला. परत थोड्यावेळाने तो दरवाजापाशी ऊभा राहीला, मग मी त्याला Ignore केलं आणि मोबाईल मधे डोकं खुपसलं. थोड्या वेळाने डब्यातील 2-3 लोकांनी पन त्याला दरडावले. तो काहीच बोलला नाही आणि त्याच्या जागेवर जाउन बसला. 

एकाने त्याला विचारले, 'तुझे आई बाबा कोठे आहेत?' 

तो काहीच बोलला नाही आणि रडू लागला.

तेवढ्यात एकजन ओरडला, "अरे हा तर बधीर आहे."

तसं सगळे लोक त्या मुलापाशी आले. तेव्हा आम्हाला समजलं की हा मुलगा मुकबधीर आहे.

डब्यातील एकाने त्याला त्याचं नाव, गाव खुणवून विचारण्याचा प्रयत्न केला, पण तो रडतच होता.

एकाने खुणवून विचारले, "तुला लिहीता, वाचता येतं का?"

त्या मुलाने होकारार्थी मान डोलावली आणि सर्वांच्या जीवात जीव आला.

वही आणि पेन दिल्यावर त्याने लिहुन सांगीतले की त्याचं नाव 'विशाल' आहे, आणी तो 'देवाची ऊरूळी' गावचा राहणारा आहे.

याला वाचता - लिहीता येतं याचं मला खूप आश्चर्य आणि कौतुकही वाटलं.

पुढचं जेजुरी स्टेशन येनार होतं. सगळ्यांनी ठरवलं की जेजुरी मधे पोलिसांकडे विशाल ला सुपुर्द करू, म्हणजे पोलिस त्याला सुखरूप पोहचवतील.

अक्षय हा सगळा प्रकार निमुटपणे बघत होता. त्याच्या डोक्यात काय विचार आला काय माहीती, अन् तो अचानक मला म्हणाला "आन्या, तू जा घरी...!! मी विशालला त्याच्या घरी सोडून उद्या येतो"

हे ऐकून माझ्या पोटातच गोळा आला. मी माझ्या मनाशी बोललो, "आईच्या गावात...!! कुठुन बुद्धी सुचली आणि रेल्वेने आलो."

ही असली हिरोगीरी गोष्टीमधे वाचायला किंवा सिनेमा मधे पहायला भारी वाटते, पन Actual मधे हे सगळं घडतं तेव्हा बेक्कार फाटते. I mean कोन या मुलाला घरी सोडवण्याच्या झंझट मधे पडेल. पोलिसांना द्या, त्यांचं ते बघून घेतील, पण नाही अक्षय ला थोडी न हे समजनार होतं. त्याच्या Body Language वरून आणि त्याच्या सेंटी चेहर्याकडे बघून मला एक पक्क समजलं होतं, आता अक्षयला किती जरी समजवलं तरी तो ऐकनार नाहीच, तो विशाल ला घालवायला जाणारच. मग मी पन त्याला समजवण्याच्या भानगडीत पडलो नाही.

शेवटी मी पन विचार केला कुठं त्याला एकटं सोडू आणि होय - नाही करत मी पन त्याच्याबरोबर यायला तयार झालो.

डब्यातील दोघांनी आम्हाला कसं जायचं ते समजावलं. विशाल ला पण समजलं की आम्ही त्याला सोडायला येणार आहोत. त्यामुळे तो आता शांत झाला. रडणं त्याचं बंद झालं होतं. कॉलेज च्या मुलांना मी 'वाँटेड' मागीतला. त्यांनी खुशी खुशी आम्हाला सेंड केला. डब्यातील लोकं पण मग आमच्याशी आपुलकीने संवाद साधू लागली. रात्री 19:20 ला रेल्वे जेजुरी स्टेशन ला थांबली. डब्यातील सर्व लोकांचा निरोप घेऊन आम्ही स्टेशनवर उतरलो. 

आता आम्हाला 'देवाची ऊरूळी' ला जायचं होतं. तिकडे जाण्यासाठी आम्हाला परत 'पुणे स्टेशन' ला जाऊन 23:30 ची पैसेंजर पकडायची होती, जी की देवाची ऊरूळी ला थांबुन पुढे जाणार होती. जेजुरीला आम्ही चौकशी केली तर समजलं की पुण्याला जाणारी 'महाराष्ट्र एक्सप्रेस' 20:45 ला येनार होती,

मी विशाल ला खुणवुन विचारलं, 'भूक लागली आहे का?'

त्यानेपण होकारार्थी मान डोलवली.

तिकडेच मग स्टेशन बाहेरील होटेल मधे आम्ही गेलो आणि मिसळ पाव वर येथेच्छ ताव मारला. 

रेल्वेची वाट बघत मग आम्ही स्टेशनवर टाईमपास करत बसलो. विशाल पण आता आमच्यासोबत Comfortable झाला होता. आम्ही त्याच्यासोबत मस्ती करत बसलो. त्याला मोबाईलमधे वाँटेड मुव्ही लावून दिला आणि त्यामधेच तो रमला. सल्लु दिसला की जाम चेकळायचा तो...!!

तिथेच platform वर एक रेल्वे अधिकारी पण आपल्या family सोबत प्रवासासाठी आला होता. त्याला आमची सर्व Story समजली. तो पण खूप भावूक झाला, आमच्याशी खुप आपुलकीने बोलू लागला. त्या Officer ने रेल्वे आल्यावर आमची व्यवस्था free of cost मधे sleeper coach मधे करून दिली आणि आमचा पुण्याला परतीचा प्रवास सुरू झाला. अक्षय ला मी हळूच बोललो, 'हा आता तुला जावई करून घेतोय बहुतेक...!!' यावर अक्षय गालातल्या गालात हसला आणि आम्ही त्या Officer बरोबर गप्पा मारत बसलो.

पुण्याला पोहचल्यानंतर सर्वांचा निरोप घेऊन 23:45 ची 'देवाची ऊरूळी' ची पैसेंजर finally आम्ही पकडली. आता जसं जसं विशालचं गांव जवळ यायला लागलं तसं त्याला त्याच्या गावाचा Area ओळखीचा वाटायला लागला, त्याचा चेहरा खुलू लागला, चुळबूळ त्याची वाढु लागली.

Finally आम्ही 00:30 वाजता 'देवाची ऊरूळी' ला पोचलो होतो. सगळीकडे अंधार आणि भयानक शांतता होती. पण आता आम्हाला काही टेन्शन नव्हतं, कारण विशाल पुढे पुढे Lead करत होता आणि आम्ही मागे मागे त्याला follow करत होतो. थोडा वेळ चालल्यानंतर दुरवर आम्हाला 2-4 घरांमधे लाईट लागलेली दिसत होती. लोकांचे अस्पष्ट आवाज कानावर पडत होते. हळुहळू ते आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागले, स्त्री चा रडन्याचा आवाज ऐकू येत होता. आमच्या येण्याची चाहुल त्या लोकांना लागली. सगळ्यांच्या नजरा आमच्या दिशेने वळाल्या.

पुढचा Scene आता मला माहीती होता म्हणून मी माझा चालण्याचा वेग मंद केला व हलकेच अक्षय आणि विशालच्या चार पावले मागे थांबून सावकाश चालु लागलो. विशाल ला पाहताच त्याची माय धावत त्याच्याकडे आली आणि त्याला मीठीत घेऊन आक्सोबोक्शी रडू लागली. नंतर अक्षयकडे पाहुन जणु कोणी देवमाणुस आला आहे असं समजुन त्याच्या पाया पडू लागली पण अक्षयने तीला अडवले आणि ती भाबडी माय अक्षयच्या गळ्यात पडून हुंदके देत खूप रडली. हे पाहत असताना शेजार पाजार सर्व लोकं पण रडत होती आणि माझ्या पण डोळ्यात हलकेच पाणी आले.

सगळं वातावरण आता शांत झालं होतं. सर्व लोकांनी आमचे आभार मानले. आम्ही मग विशालच्या घरी गेलो. विशालचं घर म्हणजे 250sq.ft ची खोली होती ज्यामधे फक्त विशाल आणि त्याची आई राहत होती. त्याच्या आईने सांगितलं की ते मुळचे सूपा या गावचे राहणारे आहेत. विशाल चे बाबा विशाल दोन वर्षांचा असतानाच देवाघरी गेले होते. विशालची आई त्याला जिद्दीने मोठं करत होती. एकुलता एक जीव फक्त तीचा आधार होता. या गावामधे मुकबधीर शाळा आहे आणि त्याच्या शिक्षणासाठी ही माय आपलं सगळं घरदार सोडून विशालला शिकवण्यासाठी या गावात रहायला आली होती आणि मोल-मजुरी करून जीवन जगत होती. 

मी विशालच्या शाळेबद्दल विचारलं तेव्हा समजलं की आपलं एका वर्षाचं जे शिक्षण असतं ते पुर्ण करायला विशालला दोन वर्ष लागतात...!! म्हणजे विशाल आत्ता सातवीला हवा होता पण त्याचं आत्ता चौथीचं पहीलं वर्ष सुरू होतं. बिना काही बोलता आणि ऐकू जाता विशालच्या गुरूंनी त्याला कसं कसं शिकवलं असेल...!!! त्याच्यामागे त्याच्या आईने व त्याच्या गुरूंनी कीती कष्ट घेतले असतील हा विचार करूनच माझ्या मनात त्यांच्याबद्दल खूप आपुलकी आणि Respect वाटू लागला. विशाल नक्की पुण्यात हरवला कसा ते विचारल्यानंतर समजलं की गावातील लोकं निवडणुकीच्या प्रचारासाठी रेल्वेने पुण्याला चालली होती तेव्हा विशाल पण आईची नजर चुकवून त्या लोकांबरोबर प्रचारासाठी पुण्याला आला होता पण Return येताना त्याची चुकामुक झाली आणि तो चुकून साताराला जाणार्या पैसेंजरमधे बसला होता.

विशालच्या आईने आम्हाला जेवनाचा खूप आग्रह केला पण आमचं मन आणि पोट खूप भरलेलं होतं. आम्ही फक्त कोरा चहा पिऊन झोपलो. पहाटे लवकर ऊठलो. भरलेल्या अंत:करणाने आम्ही सर्वांचा निरोप घेतला आणि 5:30 च्या पैसेंजर मधे बसलो.

रेल्वेमधे बसल्यानंतर मी अक्षयकडे पाहीलं तर तो वाँटेड मुव्ही लावून कानात हेडफोन टाकुन बसला होता. मला त्याच्याकडे पाहुन मी त्याचा मित्र असल्याचा खुप अभिमान वाटला. त्याचं लक्ष अचानक माझ्याकडे गेलं, तो काहीच बोलला नाही फक्त माझाकडे पाहुन त्याने हलकीच Smile दिली. नंतर मी पण 'राज कॉमिक्स' घेऊन 'सुपर हीरोंची' कहानी वाचन्यात मग्न झालो...!!


Rate this content
Log in

More marathi story from Viral Video प्रसारण Viral Video प्रसारण

Similar marathi story from Drama