STORYMIRROR

भरत टोणपे

Inspirational

4  

भरत टोणपे

Inspirational

*हुतात्मा शिवराम हरि राजगुरु*

*हुतात्मा शिवराम हरि राजगुरु*

1 min
371

पुण्या जवळील खेड  येथे 24 ऑगस्ट 1908 ला त्यांचा जन्म झाला,शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल येथे,हुतात्मा शिवराम हरी राजगुरू भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक त्यांच्या नावावरुन खेड चे नामकरण राजगुरु नगर झाले,लहान पासून व्यायाम कुस्ती पोहणे यात तरबेज असणारे,हुतात्मा शिवराम हरी राजगुरू संस्कृत शिक्षण घेण्यासाठी वाराणसी येथे गेले होते तेथे ते भगतसिंग, सुखदेव यांच्या संपर्कात आले येथील हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेच्या कार्यात सहभागी झाले व भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी स्वताला झोकून दिले , त्यांचे क्रांती कार्य प्रचंड साहस आणि धाडसाने भरलेले आहे स्वातंत्र्य लढ्यातील फितूराला अचूक रिव्हाॅलवरच्या गोळीने टिपने व शिताफीने ब्रिटिश पोलिसांच्या तावडीतून निसटणे क्रांतिकारक भगतसिंग यांनी साॅडर्स ला मारताना अंगावर धावून आलेल्या पोलिस अधिकार्याला रोखताना रिवाॅलवर  खराब झाल्यावर रिवाॅलवर खिशात ठेवून त्या अधिकार्याला  ऊचलून हवेत फिरवत आपटले हे साहसी काम राजगुरु यांनी केले लाहोर कटात हुतात्मा भगतसिंग, राजगुरु, सुखदेव या क्रांतिकारकांना फासी झाली व ते देशासाठी अमर हुतात्मा झाले अशा शुरवीर क्रांतिकारक शिवराम हरि राजगुरु यांची आज जयंती त्या निमित्त त्यांना विनम्र अभिवादन


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational