लपंडाव
लपंडाव
का कुणास ठाऊक आज पुन्हा आभाळ काळवंडले होते,
मनाच्या या गाभाऱ्यात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले होते
माझी दयनीय अवस्था मलाच समजत नव्हती, कदाचित निसर्गाने ही ती आपली मानली होती।धृ।
डोळे भरून आले मात्र आठवणीत पुन्हा तिच्या, आभाळाला ही कळेना कशा विसराव्या यातना
धडधड मात्र वाढत होती वाऱ्याच्याही वेगाने,
जीवन सीमा विसरुन गेलो आपल्याही व्यथेने।।१।।
काळजालाही आस लागली प्राण प्रियेच्या येण्याची
झिंगून सारे वाट पाहती आभाळातल्या पाण्याची,
चालूनचालून पायही थकले वाट तिची पाहून&nbs
p;
व्यथा ही माझी जाणून मग आभाळही आले भरुन ।।२।।
डोळ्यांनीही बांध फोडला वाहू लागला पूर
मनाच्या या गाभाऱ्यात कसे बांधू थर
माझ्या या पुरामधे सामील झाला निसर्ग
मग आला माझ्या आणि त्याच्या यातनांना भर।।३।।
धाय मोकलून पुन्हा विरले दोघांचेही गाणे
जिकडेतिकडे पाणीच पाणी आणि जीवनातील तराणे,
गेला वारा आली किरणे हटले सारे तुफान
विसरून सगळे गमभन मग आले भान।।४।।
पाहून मग मी दोन जीवांची विस्कटलेली अवस्था
पुन्हा नव्याने सुरुवात केली संपवून सगळ्या व्यथा...