STORYMIRROR

Karishma Wani

Tragedy Others

3  

Karishma Wani

Tragedy Others

जेव्हा तू मला सोडून जात होतीस.

जेव्हा तू मला सोडून जात होतीस.

1 min
683

(माझ्या रूममेट साठी लिहिलेली हि कविता जेव्हा ती हॉस्टेल सोडून जात होती ... )


जेव्हा मला माझी आई सोडून जात होती ...... 

तेव्हा वाटलं होता सगळं काही मागे कुठेतरी सुटतंय ....... 

काहीतरी आठवणार आहे, काहीतरी रडवणारं आहे...... 

आई दरवाज्याच्या बाहेर जातांना रडत होती ...... आज कळलं .... 

ती का रडत होती... 

जेव्हा तू मला सोडून जात होतीस ....... 


माझी आई जेव्हा मला सोडून जात होती.... 

तशीच काहीतरी चलबिचल होती माझ्या मनात ..... 

जेव्हा तू मला सोडून जात होतीस.... 


तू एक अनोळखी व्यक्ती होतीस माझ्यासाठी ..... 

कधी सक्ख्या पेक्षाही जास्त नातं जमाल ..... कळलंच नाही .... 

तू कधीच आता भेटणार नाहीस हा विचार डोक्यात घडी घडी येत होता ..... 

जेव्हा तू मला सोडून जात होतीस .... 


पण मनाची नाती कधी दोन माणसांच्या दूर असण्याने तुटतं नसतात ..... 

ती उलट घट्ट आणि घट्ट होत जातात वेळे सोबत .... 

तू एक सुंदर स्वप्न होतं.... 

जे आता संपलंय ... 

फक्त मला विसरू नकोस .....  



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy