Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Madhuri Donglikar

Romance Others

5.0  

Madhuri Donglikar

Romance Others

प्रेमाची फुलबाग

प्रेमाची फुलबाग

1 min
180


तुझ्या आठवांचा झुला

माझ्या मनोमनी झुले

स्वप्नी झुला झुलताना

मनी प्रेमांकुर फुले !


स्पर्श तुझा मोरपीस

मोहरते माझे मन

डोळ्यातल्या भाषेतच

पटे प्रीतीची ही खूण !


कसे सांगू सख्या तुला

माझी अबोल ही प्रीत

ऐकण्यास आसुसले

तुझ्या श्वासातले गीत !


धुंद श्वासांचा हा गंध

श्वास श्वासात मिसळे

एकरूप होऊ दोघे

प्रीत हृदयी उसळे !


चिंब होऊ या प्रेमात

साहवेना हा दुरावा

तुझ्या मिठीत सख्या रे

स्वर्ग माझ्या हाती यावा !


पौर्णिमेच्या चांदराती

प्रीत दर्याला उधाण

चंद्रमिठी प्रणयाची

अंगी चांदणं गोंदण !


फुलबाग ही प्रेमाची

सदा रहावी फुलत

राहो टवटवी सदा

प्रेमकळ्या उमलत !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance