आयुष्याचे ध्येय
आयुष्याचे ध्येय
माणसाच्या आयुष्याचे ध्येय कसे असावे
प्रेयसी सोबत अख्खे आयुष्य जगावे!!
दोघे मिळूनी नदी काठी बसावे
हातात एक दुसर्याचे हात असावे
बँग्राऊंड मधे 'बडे अच्छा लगते है' चलावे
प्रेयसी सोबत अख्खे आयुष्य जगावे!
स्वप्न देखील नेहमी तिचेच पडावे
डोळे बंद केलेत तरीही तिच दिसावे
तिच्या प्रेमा पोटी जगाशी लढावे
प्रेयसी सोबत अख्खे आयुष्य जगावे!
सात जन्मांच्या गाठीचे स्वप्न डोळ्यांत असावे
त्या स्वप्नांच्या पुर्तते साठी स्वत:ला झोकून द्यावे
दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करावे
प्रेयसी सोबत अख्खे आयुष्य जगावे!
माणसाच्या आयुष्याचे ध्येय कसे असावे
प्रेयसी सोबत अख्खे आयुष्य जगावे!!

