STORYMIRROR

Suvidha Adelkar

Drama Fantasy

3  

Suvidha Adelkar

Drama Fantasy

वर्षाअखेर

वर्षाअखेर

1 min
94

सरता सरता हे वर्ष

अश्रू हृदयात दाटिले

स्वप्नी पाहिले जे ध्येय

प्रयत्न करीता राहिले

का कोण जाणे मनी उणीव उरे

सोबतीस तू असावयास हवे....

उणीव तुझी रोजच जाणवे

आठवण येताच क्षणी

अश्रु नयनात साठिले 

जग जिंकूनही आज

माझ्या विश्वात मी हरे

का कोण जाणे मनी उणीव उरे

सोबतीस तू असावयास हवे....

तुझ्या कुशीत येऊनी 

मन आनंदी होई

हात तुझा डोईवरून फिरता

सारे दुःख दूर होई

का कोण जाणे मनी उणीव उरे

सोबतीस तू असावयास हवे....

भानावर येताच क्षणी 

जीव मात्र कासावीस होई

तुझ्या सोबत नसण्याची जाणीव

खूप त्रास देई

का कोण जाणे मनी उणीव उरे

सोबतीस तू असावयास हवे....


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama