आयुष्य
आयुष्य
खुप जवळून पाहिलंय
आपल्या माणसांना बदलताना
गरजेनुसार जवळ येताना आणि वेळेनुसार दूर जाताना
गोष्ट छोटीशीच असते
पण त्या गोष्टींना रंगवून सांगताना
मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात
पण चतुर व्हावं उत्तरांची सांगड घालताना
कधी कधी परिस्थिती पाहून
घ्यावे लागतात मनाविरुद्ध निर्णय
पण जाणीव असावी
सुख-दुखा:ची बेरीज वजाबाकी करताना
जगात येताना एकटे आलोय
जाताना हि एकटेच जाणारं
मग का हा अट्टाहास कायम सोबत राहण्याचा
जाता जाता एकचं सांगणं
एकचं आहे स्वप्न
गेल्यावर हि तुझ्या मनात अजरामर राहणं....
