Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Sayali Kulkarni

Inspirational


3.8  

Sayali Kulkarni

Inspirational


वर्किंग वूमन - व्यथा, स्वप्ने आणि बरेच काही..

वर्किंग वूमन - व्यथा, स्वप्ने आणि बरेच काही..

4 mins 103 4 mins 103

 "आल्या बघा मॅडम..!! ही काय आॅफिसमधून घरी यायची वेळ झाली??...या आजकालच्या मुली... नुसत्या पैशांमागे धावतात.. घरातल्या माणसांची मुलांची काही म्हणून काळजीच नाही.. " सीमाची गाडी सोसायटीच्या गेटमधून आत शिरते न शिरते तोच बाजूच्या बेंचवरुन तिच्या कानावर ही कुजबुज (पण जरा मोठ्यानेच बरं का...ऐकू जायला पाहिजे ना!!...)ऐकू आली आणि सीमाच्या तळपायाची आग मस्तकात गेली... तिला वाटले गाडी तिथेच लावावी आणि त्यांना चांगले चार शब्द सुनवावेत... पण आधीच आॅफिस मधून घरी यायला उशीर झाला होता आणि तिच्या डोळ्यासमोर वाट बघत बसलेल्या मुलीचा छकुलीचा चेहरा आला आणि तिने गाडी तशीच पुढे दामटली व घरी गेली....छकुली दाराकडे डोळे लावूनच बसलेली होती...आईला दारात बघून ती चटकन धावत आली आणि म्हणाली "आई, तू आज लवकर घरी येणार होतीस ना गं?? आपल्याला बागेत जायचे होते ना..??मग उशीर का केलास?? किती दिवसात आपण बागेत गेलो नाही...केव्हाची वाट बघती आहे मी... तू अशीच करतेस...मी बोलतच नाही बघ तुझ्याशी..."आधीच थकलेल्या, संतापलेल्या सीमाच्या मनात अजूनच निराशेची भर पडली... "अगं आॅफिसमध्ये खूप काम होतं गं...उद्या येईन हं लवकर...मग आपण खूप धमाल करु..." असे तिला आश्वासन देत कशीबशी तिची समजूत घालून सीमा हातपाय धुण्यासाठी आत गेली..पण मनात मात्र विचारांचे वादळ आले होते... आपण चूक तर करत नाही ना नोकरी करून..?? आपण कुठे खूप कमी तर पडत नाही ना?? खरंच आपल्याला पैशांचा मोह आहे??आपण मुलीला, घरातील प्रत्येकाला वेळ देण्यात खरंच कमी पडतो आहोत का अशा अनेक निराशाजनक विचारांची तिच्या मनात गद्री झाली होती...तेवढ्यात तिच्या डोळ्यासमोर तिचा जीवन पट उभा राहिला.. तिच्या आईबाबांनी अॅडमिशन साठी काढलेल्या खस्ता, चार वर्षे घालवून मिळवलेली डिग्री, मेहनतीच्या बळावर आव्हानात्मक परीक्षा पास झाल्यानंतर तिला आणि तिच्या आईवडीलांना झालेला आनंद, ती आणि नवरा दोघांच्या नोकरीच्या बळावर त्यांनी घेतलेले स्वत:चे घर, कामातून मिळणारे समाधान व स्वावलंबी असल्याची सुखावह जाणीव व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उराशी बाळगलेली अत्यंत खास अशी तिची स्वप्ने... !! ती मनाशीच विचार करु लागली आईबाबांनी मला एवढे शिकवले ते काही घरी बसायला नाही...आणि बाकी सगळ्या गोष्टींचे सोंग आणता येते पण पैशाचे सोंग मात्र आणता येते का??.. शिवाय काळ आणि वेळ ही काही सांगून येत नाही...नोकरी करणे वा न करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि या प्रश्नाला घरची परिस्थिती, वडिलधाऱ्या माणसांचे सहकार्य,काम करण्याने मिळणारे समाधान असे असंख्य कंगोरे आहेत हे या बायकांना का बरे कळत नाही???

बऱ्याच महिलांना आपल्या लेकरांना सांभाळायला कुणी नाही म्हणून नोकरी सोडावी लागते तर काही स्वेच्छेने मुलांचे संगोपन चांगले व्हावे म्हणून किंवा अन्य कारणाने नोकरी सोडतात आणि यात काहीच चुकीचे नाही... पण म्हणून ज्या महिला नोकरी करत आहेत त्या चुकीच्या होत नाहीत किंवा त्यांना लेकरांची , घराची काळजी नाही असे तर आजिबातच नाही ना??...बऱ्याचदा परिस्थिती समोर हतबल होऊन नोकरी करावीच लागते..तान्ह्या बाळाला घरी सोडून नोकरीला जाण्याचे दु:ख तुम्हाला कसे कळणार ...कामावरून घरी निघायला उशीर झाला तर आपल्या लेकराला बघेपर्यंत जिवात जीव राहात नाही... खरेतर एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचे दु:ख चांगल्या प्रकारे समजू शकते, पण बायका या दुसऱ्याचं उणंदुणं काढणे, टोमणे मारणे यातच कायम पुढे का असतात अशा एक ना अनेक विचारांचे तिच्या मनात काहूर माजले होते..तेवढ्यात "अगं सीमा..मस्त आले घालून कडक चहा बनवलाय बघ...!!! अजून फ्रेश झाली नाहीस का...???खूप दमलेली दिसतीयेस...मस्त चहा पी म्हणजे बरे वाटेल..." अशी आईंची प्रेमाची हाक तिच्या कानावर आली आणि ती एकदम भानावर आली... त्या गरम प्रेमाने ओतप्रोत भरलेल्या चहाने तिचा सगळा थकवा निघून गेला आणि मन एकदम शांत प्रफुल्लित झाले...तिचा चहा पिऊन होतो न होतो तोवर घराच्या दाराची बेल वाजली... तिचा नवरा सोहम घरात आला ...त्याची स्वारी भलतीच खुशीत दिसत होती..आल्या आल्या त्याने आनंदात घोषणा केली..."आई, सीमा, छकुली... चला लवकर खाली... एक छान सरप्राईज आहे तुम्हा सर्वांना... " सगळे लगबगीने खाली गेले... तर पार्किंगमध्ये त्यांची हक्काची आलिशान कार उभी होती... "सोहम आपली कार???"सीमा म्हणाली...सोहम सीमाच्या जवळ गेला.. तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला.. "होय..!!आपली कार...अगं सीमा....फक्त आणि फक्त तुझ्यामुळे हे जमले...तुझ्या पाठबळाशिवाय मी कधीच हे करु शकलो नसतो..नोकरी, घर सगळी तारेवरची कसरत तू इतकी लिलया करतेस... सगळ्या खर्चाचं छान नियोजन करतेस....पण इतकं करूनसुद्धा कधी स्वतःच्या आवडीनिवडी, स्वतः ची स्वप्ने यांबद्दल साधे बोलत पण नाहीस...मागे काही वर्षांपूर्वी माझी चुलत बहीण आली होती...खूप हुशार, स्वप्नाळू मुलगी....आयटीत चांगल्या पगारावर नोकरी करीत होती...पण बाळ झाल्यावर कुणीही तिला जाॅब करण्यास परवानगी दिली नाही... घरी आली होती तेव्हा खूप निराश वाटत होती... म्हणाली अरे माझी सगळी स्वप्न अपुरी राहणार असे वाटत आहे...एकाच्या पगारात अगदी कसेबसे भागते...मी खूप वेळा म्हणले नोकरी करते, वाटल्यास माझी आई बाळाला सांभाळेल पण मी नोकरी करते... पण कोणीच पाठिंबा दिला नाही... सोहम....तू मात्र असे करु नकोस...बायकोला नोकरी करण्यासाठी प्रोत्साहन दे...तिची सगळी स्वप्न पूर्ण कर... तिच्या आवडीनिवडी जप...तेव्हाच ठरवले बायकोला कायम प्रोत्साहन द्यायचे....तिच्या आवडीनिवडी ओळखायच्या, त्या जपायच्या आणि तिची सगळी स्वप्न पूर्ण करायची....तरच खरी स्त्री पुरुष समानता येईल नाही का!! स्त्रीने कायमच मन मारुन का जगायचे??स्त्रीला पण हक्क आहे आनंदात जगण्याचा... म्हणलं समाज जेव्हा बदलेल तेव्हा बदलेल....आपल्या घरापासून सुरुवात तरी करुया...आणि या सगळ्यात आईनेही मला खूप साथ दिली...बरं खूप झाल्या गप्पा... सीमा, छकुली.. आत गाडीचे दार उघडून बघा...आईचा आवडता पायनापल केक केव्हाचा वाट बघतोय... आणि काय छकुली बाहेर जायचंय ना?? चला आपल्या गाडीतून मस्त फिरुन येऊ आणि बाहेर जेऊन पण येऊ... सीमा त्या गोड धक्यातून सावरली आणि स्वतःच्या कारमधील स्वप्नवत राईडसाठी तयार झाली...


Rate this content
Log in

More marathi story from Sayali Kulkarni

Similar marathi story from Inspirational