Sanjay Raghunath Sonawane

Tragedy

2.4  

Sanjay Raghunath Sonawane

Tragedy

वणवा-नाट्य-

वणवा-नाट्य-

3 mins
11.1K


(पात्र:कोकिळ पक्षी, चिमण्या, बिबट्या, आपट्याचे झाड, मुलगा, वाघ )

झाड:थांब मला मारू नकोस

मुलगा:मुलगा इकडे तिकडे पाहू लागला .कोण आहे तिकडे?

झाड:इकडे पहा मी झाड बोलत आहे. मला मारू नकोस. मला व माझ्या लेकराना त्रास होतोय.

मुलगा:पण मी तुला झाड कसे म्हणू?तुला तर पाने नाहीत, फांदया नाहीत, अजून कोणती तुझी लेकरे?

झाड:सगळे काही सांगतो; पण तुला माहीत आहे?माझी अशी दशा कोणी केली?

मुलगा:कोणी केली तुझी अशी दशा?त्याचा माझ्याशी काय संबंध?

झाड:मी ही तुझ्यासारखा लहान होतो. मी परिस्थितिचा संघर्ष करत मोठा झालो.माझ्या अंगाखांद्यावर आताच कुठे पक्षी किलबिलाट करत होते. संसार मांडू लागली होती. खेळत बागडत होते. पण नियतीला ते काही पहावले नाही.ही नियती दुसरी तिसरी कोणी नव्हती. ती होती माणसाची लोभी वृत्ती.

मुलगा:मी अजून नाही समझलो?

झाड:तुला होळी हा सण आवडतो का?

मुलगा:होय तर.आम्ही त्या दिवशी खूप सिमगा खेळतो.

झाड:तुमचा हा सिमगा मला व माझ्या निष्पाप लेकराना सजा ठरली आहे.या वर्षीच्या होळीसाठी काही लोकांनी माझे हात, पाय कापून नेले. माझ्या लेकरांची व आमची घरे उध्वस्त केली. संसार उध्वस्त झाला. आता कुठे पावसाळ्यात मला पाने,, फांदया येऊ लागल्या होत्या. मी आनंदी झालो. स्वप्न रंगवू लागलो. पण पुन्हा माझ्या स्वप्नांवर कुराड मारली. या माणसाने एक दिवसाचा सण साजरा करण्यासाठी कित्येक दिवसांपासून पहात असलेले स्वप्न त्यांनी क्षणार्धात उध्वस्त केले. तुम्ही दसऱ्याला जी पाने वाटली ती माझीच पाने होती.

दृष्य:(चिमनी व कोकीळ झाडाजवळ येतात.)

मुलगा: अरे व्वा!चिमनी आणि कोकीळ किती दिवसांनी पाहिली.

झाड:यात आश्चर्य काय?थोड्या दिवसांनी त्यांचे चित्र दिसतील.

मुलगा:असे का म्हणतो?

चिमनी:थांब मीच सांगते, आमच्या किलबिलाट बंद होण्याला माणूस कारणीभूत आहे.

कोकीळ:तुला माझा मधुर आवाज ऐकायला येतो का?

मुलगा:नाही, पण त्याला माणूस जबाबदार कसा?तुमच्या पंखाना आणि पायाना काय झाले?

चिमनी:झाडे गेली आणि आमची घरे गेली. उंच आकाशात भरारी घेणे भयानक वाटू लागले आहे. तुझ्याच सारखी मुले पतंग उडवत असताना त्यांच्या मांज्यात माझे पंख गुरफटले गेले. त्या मांज्यासोबत मी दोन दिवस झाडावर अडकून पडले होते. काही भल्या माणसानी मला तेथून सोडविले. आता मी पक्षी असूनही उडू शकत नाही.

कोकीळ: प्रदूषणामुळे माझा ही जीव गुदमरला आहे. माझे मित्र, आप्त सुरक्षित जगण्यासाठी जागा शोधत भटकत आहे.तुम्ही आमची नाती तोडली. काही शिकार शौकिनांच्या हौसेसाठी माझा डोळा आणि पाय गमवावा लागला. आता मलापण कुठेतरी लपून बसावे लागणार आहे.

मुलगा:तुमची ही अशी दशा आमच्यामुळे झाली हे खरेच वाटले नव्हते. याची मला आता लाज वाटू लागली आहे. इथे येव्हढी हिरवळ आहे, साप तर नाही ना?

झाड: तू त्याबद्दल निश्चिंत रहा. कसे असतील इथे साप?

मुलगा:असे का म्हणतो?

झाड: तस्कारांच्या सुळसूळटामुळे आधीच साप कमी झाले आहे. काही माणसे माझ्या मित्रांना नागपंचमीसाठी घेऊन गेले. आता उरले सुरले भीतीपोटी बाहेरच येत नाही.

मुलगा:इथे इमारती होण्याआधी वाघाचे अस्तित्व होते हे कितपत खरे?इथले अवाढव्य डोंगर कुठे गेले?छोट्या, छोट्या नदया कुठे गेल्या?यालाही माणूसच कारणीभूत आहे का?

कोकीळ: हे खुद्द वाघोबाच सांगतील.

वाघ: घाबरू नकोस मी तुला खाणार नाही. दुसऱ्यानी जरी आमचे वाईट केले तरी त्याचे वाईट करण्याची आमची कृतघ्न बुध्दी नाही. मी काय तुझी शिकार करणार?ना मला नखे ना मला दात?

मुलगा:कुठे गेले तुझे दात आणि नखे? चित्रात तर तू फार शूर वाटत होता.

वाघ:शूरच होतो मी. साऱ्या जंगलात राजासारखा वावरायचो, शिकार करायचो; पण बिल्डरानी जंगलांचीच शिकार केली. मला माझ्या घरातून हाकलले.पिंजऱ्यात बंद करून ह्या जागी सोडले. आता मी शिकार विसरलो आहे.तू वाघाना शाकाहारी प्राणी म्हणू शकतोस.शिकारीला गेल्यावर परिसरातील कुत्रा मला पळवतो.सरकारचे वाघ बचाव धोरण आम्हाला लागू होत नाही. माणसांच्या परिसरात बिबट्या घुसला अशा बातम्या तुम्ही पाहता. स्वतःलाच विचारा कोणी घूसखोरी केली आहे?काहीनी आमचे निवारे, संसार, प्रजाती, पिढ्या उध्वस्त केल्या आहेत. माझा मित्र चित्ता तर नामशेष झाला आहे. काही दिवसांनी आमच्यावर सुद्धा अशीच वेळ येणार आहे. जिथे माझ्या सारख्या राजाची अशी दशा झाली तिथे माझ्या राज्यातील प्रजा कशी टिकणार?

झाड:आम्ही माणसाना सर्व दिले; पण त्यांनीच आम्हाला संपवायचा कट रचला. डोंगर गेले, इमारती आल्या. नदया गेल्या ,गटारे आली. स्वच्छ समद्र गटारमय झाली. स्वर्गासारखी पृथ्वी नरकासारखी दिसू लागली. अजूनही वेळ गेलेली नाही. आमची व्यथा समजून घ्या. आमच्या अस्तित्वासाठी आम्ही तुमच्याकड़े हात पसरवत आहे. आम्हाला तुमच्या परोपकारी हातांची गरज आहे. विकास करा; पण आमचे भान राखा. झाडे लावा, झाडे जगवा. हे प्रत्यक्षात कृतीत आणा. अन्यथा तुमचा विनाश अटळ आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy