Sanjay Dhangawhal

Inspirational

1.8  

Sanjay Dhangawhal

Inspirational

वेदना

वेदना

5 mins
117


'वेदना',हा शब्द जरी लहान असला तरी थेटं काळजावर घाव घालतो किंबहुना मनाला जखमी करतो,वेदना फक्त जखमच नाही तर रडकुंडीलाही आणते म्हणजे कुणाचही मन समजून न घेता क्षणात डोळ्यातून अश्रु यावीत ईतकी तिव्रता या वेदनेत असते.आणि या अशा वेदना प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत प्रत्येक स्त्री,पुरुष,गरीब,श्रीमंती कोणीही असुदेत प्रत्येकाच्या वाटेला वेदना असतातचं.जन्माला आल्यापासून तर मरणापर्यंत या वेदना भोगाव्याचं लागतात. वेदनांपासुन कोणीही सुटतं नाही किंवा पळवाट काढू शकतं नाही.पळुन पळुन जाणार तरी कुठे? शेवटी माणसाच्या आयुष्याची सुरुवात जेथून सुरू होते तिथेच पुन्हा येवून या वेदना स्विकाराव्या लागतात.थोडक्यात सांगायचं झालं तर दुःखाचा साथीदार म्हणजेच वेदना!;बरं या वेदना काही कुठे घ्यायला जाव्या लागतं नाही काहीना काही कारणास्तव या वेदना माणसाच्या वाटेला येतचं असतात.फक्त त्या वेदना कशा हाताळायच्या हे ज्याला त्याला ठरवायचं असतं.


या जगात वेदना विरहीत तरी आहे का कोणी!,शोधूनही सापडणार नाही.कितीही दुरं राहण्याचं ठरवलं तरी या वेदना काही पिछा सोडतं नाही.सातत्याने त्यांचा पाठलाग सुरूच असतो. सुख,दुःख,आनंद यांचे भाव लगेच चेहऱ्यावर उमटतात पण वेदनांच तसं नाहीना,या माणसाला आतल्याआत जाळतं असतात, घुटमळवत असतात,जीव आगदी कासावीस म्हटलतरं मेटाकुटीला आणतो.काय करावं काहीच सुचतं नाही कोणाला सांगाव काहीच समजतं नाही, कशातचं मनं लागत नाही सततं काळजी वाटते कसं होईलं काय होईल या वेदनेच्या विवंचनेतून कशी सुटका होईल याच चिंतेत अर्धमेला होतो.या वेदनेचा फास गळ्याशी असाकाही आवळला जातो की.यातून सोडवायला शेजारपाजार जावूचं द्या हो,आपला जवळचा माणूसही त्यावेळी आपल्या सोबत नसतो.दुरून डोगंर साजरे याचं भुमिकेत तो स्थितबध्द असतो.आहो पाठीवर सहानुभूतीचा हात ठेवायलाही खुप विचार करतां.

आणि अशी वेदना परूषांनाच मात्र जास्त छळतात.कारण सहनशीलतेचा पुतळा म्हणजे पुरूष, अर्थात पुरूषाईतकी सहनशीलता या जगाच्या पाठीवर शोधूनही सापडणार नाही.वेदनेचा जराही त्रास बायकांना झाल की त्या रडुन मोकळ्या होतात.पण परूषांच कायं!,ते कोणालाही सांगु शकतं नाही.पुरुषाला समजून घेणे आजतागायत कोणालाही जमलेलं नाही.एव्हढी सहन करण्याची ताकद फक्त पुरूषांमध्येच असते.तो कुठेतरी एकांतात जावून रडुन घेईल पण कोणाला सांगणार नाही.कारण आपल्या माणसांच्या हसऱ्या चेहऱ्यावर स्वतःच्या वेदना तो कधीच बघतं नाही. स्वतःला दुखात ठेवून दुसऱ्याच्या सुखात आपला आनंद बघण्याचं सामर्थ्य फक्त पुरूषातच असतं म्हणून पुरुष वरवर कठोर जरी दिसत असला तरी तो आतून खुपचं हळवा,मवाळ असतो.परंतू पुरूषांचा हळवेपणा कोणालाही दिसत नाही.


पुरुष कधी जगतो का? प्रपंच्याचा,कुटुंबाचा, परिवाराचा रहाटगाडा त्याला एकट्याला ओढायचा असतो,बऱ्याच जबाबदारीचं ओझं ऐकट्या पुरुषाच्या खंद्यावर असतं.घरातल्या बाहेरच्या अडचणीही त्यालाच सांभाळ्याव्या लागतात.कुणाचीही मदतं न घेता आयुष्याच्या प्रत्येक वळणावर पुरुषाला जपुन पावले टाकावी लागतातं,मान सन्माना पासुन चार पावले दुरं राहून पुरुषाच्या वाटेला पदोपदी दुःख, वेदना यातना, अपमान, तिरस्कार विश्वासघात, याच्याशिवाय त्याच्या पदरात काहीच पडतं नाही.सुखाचे क्षण कमी आणि दुःखाचे क्षणचं पुरुषाच्या वाटेला जास्त येतात.मनातल्या व्यथा सांगाव्यातरी कुणाला,कोण ऐकतो?कोणीही नाही. एखाद्याला सांगुन जरावेळ मन हलकं वाटल्यासारख होतं पण ते ओझं तर स्वतःच्या डोक्यावरच असतं ना आजच्या काळात तरी दुसऱ्याच ओझं कोणी घेत नाही स्वतःच्या समस्या स्वतःलाचं सोडवायच्या असतात अशावेळी बायको मुलं सुध्दा हस्तक्षेप करत नाही.म्हणून पुरूष रडण्यासाठी कुठेतरी एकांत बघतो आणि एकटाच रडुन घेतो. 

 

एका पुरुषांच आयुष्य वाटतं तितकं सोप नसतं मुळात पुरूष कोणालाच कळतं नाही.कोणाकडून मन दुखावले गेले तरी तो सहजासहजी वाईट वाटून घेत नाही.प्रसंग कुठलाही असला तरी त्यावेळच्या परिस्थितीला समजून घेवून सार काही सहज सुलभ करून घेतो खरतर हे जगं किंवा आजची परिस्थितीत खरेपणा स्विकारुन अत्याचार सहन करण्याच नाही. थोडक्यात प्रामाणिकपणाच नाही आपल्यातले,व आपल्या अवति भोवती कितीतरी खलनायक असतात अशा खलनायकांना दुसऱ्याला नायक होताना बघवतं नाही.एखादा पुढे जात असेलतर त्याचे पाय मागे खेचतात.मग ते घर असो नातलगं असो नाहीतर ऑफिस,एखादा माणूस खुप चांगला असेल प्रामाणिक असेलं तर त्याला मुद्दामहुन छळतात काहीचं कारण नसताना अपमाणीत करतात.चारचौघात अपमानास्पद वागणूक दिली जाते.आता अस करण्यामागे त्यांचा काय हेतू असतो हे देव जाणे. कसं आहे चांगल्या माणसाला चापलूसीपणा,किंवा कोणाच्या पुढे पुढे करायला जमतं नाही.म्हणून अशी पुरुषमंडळी मागे रहाते आणि हाजीहाजी करणारे मागे वळून पहात नाही त्यांचा पुढे जाण्याचा वेग एव्हाढा असतो की ते कुठेही थाबंत नाही.घरातही असचं असते. ईच्छा अपेक्षा पुर्ण झाल्या नाहीत,सांगीतलेलं आणून दिले नाही,तर वादाला तोंड फुटते आणि स्वतःच्या ईच्छेला हौसमौजेला तिलांजली देवून घारात काहीच कमी पडायला नको म्हणून घरच्यांची काळजी घेणाऱ्या आपल्याचं लोकांकडून घरातल्या कर्त्यापरुषाचा अपमान होतो.मनासारखे जगता येत नाही म्हणून बाप आणि नवरा नावाच्या पुरुषाचा विरोध झुकारून स्वतःच्या मनासारखे जगणारे काही कमी नाही. मग त्यांच वागणं,जगणं, रहाण, चुकीच जरी असल तरी त्याची पर्वा नसते कोण काय म्हणेल याची भिती न बाळगता आपल्याच मस्तीत जगणारी आपल्या माणसांच चुकीच वागणं एका भल्या पुरुषाला ते खुपच धोकेदायक वाटतं. पण त्यावेळी त्याला सहण करण्याशिवाय पर्याय नसतो. आपलीच माणस जर मनावर घाव घालून एका पुरुषाला जखमी करत असतील तर त्याला वेदना मुकाट्याने सहण कराण्याशिवाय पर्याय नसतो.


कुटुंबाचा भार आपल्या खांद्यावर घेवून आपल्या परिवाराला सुखात ठेणाऱ्या आपल्या माणसाच्या अशाही भावना दुखवायला नको की त्याला एकटेपणा वाटेलं.कारण कमावत्या पुरूषाला कुठे कसा काय त्रास सहण करावा लागतो हे घरी बसणाऱ्यांना नाही कळायचे.जे सांगितले ते मिळत असतानाही जर त्याच्या मना विरुद्ध त्याच्या मर्जीशिवाय वागतं असाल तर ते थांबल पाहीजे.कारण कुटुंबाची ओळख ही पुरुषामुळे आपल्या माणसाच्या नावाने होते पावले जराही ईकडे तिकडे वाकडी झाली म्हणजे बदनामी पुरूषांचीच होते,मनस्ताप फक्त पुरूषांच्याच वाटेला येतो.करणारे करून मोकळे होतात.पण अपमानीत पुरुषालाच व्हावे लागते.तेव्हा एक बाप एक नवरा किंवा एक पुरुष किती जिवाच राण करून जगतो यावर एक जबादारी म्हणून परिवारातील सदस्यांनी चिंतन करणे गरजेचे आहे.आपल्या हसत्या खेळत्या कुटुंबाची उर्जा घेवून आपला माणूस घर सोडुन घरा बाहेर गेल्यावर त्याला अनेकांकडून शाब्दीक चकमकीत जखमी व्हावे लागते.अशावेळी त्या जखमांवर आपल्याच माणसा कडून जाणीवेची हळवी फुंकर अपेक्षीत असते.पण ति ही मिळतं नाही,मिळाली तर सोबतं उपदेशाचे डोसही असतात.अशा अवस्थेत त्या माणसाचा कोडंमारा होतो.आणि मग मन गहिवरून येते त्यावेळी मन कुठे मोकळे करावे हा दिर्घ प्रश्न त्याच्या समोर असतो. तेंव्हा आपल्याच कुटुंबीयांनी आपल्या माणसाच मन जपलं पाहिजे.त्याच्या मनावरच्या जखम जावू द्या साधा ओरखडाही पडायला नको एव्हढी काळजी घेतली ना तरं जगातली भयानक संकटे,वादळे नडगमगता समर्थ अंगावर घेण्याचं बळ पुरुषात असते.


म्हणून माणसाच्या दिसण्याला जास्त महत्व न देता त्याच्या असण्याला महत्व द्या. कारण आयुष्यात उसणे आधार किती घेतले तरी आपल्या माणसाचाच आधार भक्कम असतो. शिवाय माणसांच्या व्यथा समजून घेतल्यातर  जखमा जावू द्या हो वेदनांची सुध्दा हिंमत होणार नाही त्याच्या जवळ जायला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational