STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Romance

3  

Sanjay Dhangawhal

Romance

'भाव तुझ्या चेहऱ्यावरचे'

'भाव तुझ्या चेहऱ्यावरचे'

1 min
836

भाव तुझ्या चेहऱ्यावरचे

खूप देखणे होते

तसेच तुझे वागणे होते

झाकू नकोस ओंजळीत 

रूप तुझे

नजरेचे एकसारखे बघणे होते


थांबून थांबून तू नको जावूस

वळून मागे नको पाहुस

नको टाकूस तुझ्या नजरेचा कटाक्ष

आडोसा घेवून का तुझे हसणे होते

तुझ्यासाठीचतर माझे जगणे होते


कळत होते भाव तुझ्या चेहऱ्यावरचे

छळत होते नाव माझ्या हातावरचे

पाहू नकोस वाट मी येण्याची

पावले तुझ्याच दिशेने वळत होते


हळूच खुलते खळी

 तुझ्या गालावर

गोड हसू आणते

माझ्या ओठांवर

काळजात माझ्या येण्यास 

कितीदा होकर घेते

का माझ्या नजरेची

तू शिकार होते


बघ रात्रही कशी सजून आली

काळोखाला गर्द करून गेली

चांदण्यारातीतही रूप तुझे

लावंण्याचे दिसत होते

मिणमिणते काजवेही पहात होते


कसेलेच बहाणे आता नको होते

दूर दूर जाणेही नको होते

पाहिले जगाने भाव प्रितीचे

एकात एक होवून

एकमेकात रहाणे होते

एकमेकास डोळे भरून

पाहाणे होते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Romance