Savita Tupe

Tragedy

3  

Savita Tupe

Tragedy

वारस ! भाग २

वारस ! भाग २

2 mins
280


भाग २ 

मल्हारीने आज मात्र अगदी कहर केला . ज्या रामजीला सारा देऊळ गाव देवमाणूस समजायचा त्या देवमाणसाच्या एकुलत्या एक मुलाने गाव पुजाऱ्याच्या मुलीची छेड काढली होती .

   पाणी भरायला गेलेल्या अनुला मल्हारीने रस्त्यात अडवून तिचा हात धरला , तसं तिने त्याला तोंडात मारली आणि तिथून पळून गेली , तिला पकडायला मल्हारी तिच्यामागे धावला पण आजूबाजूला बाकीची माणसे बघून तो गाल चोळत तिथेच थांबला.

  ही गोष्ट रामजीला समजली .आपला मुलगा कोणत्या मार्गावर चाललाय हे पाहून त्याला खुप वाईट वाटले .

 त्याने पुजाऱ्यांना भेटून , सगळ्या गावासमोर त्या दोघा बापलेकीची माफी मागितली .मनातून खचलेला हतबल बाप स्वतःला कोसत राहिला .त्याला जाणीव झाली मुलगा मोठा झालाय .ही तर सुरुवात आहे , लग्न करून देणं हा एकच मार्ग दिसत होता रामजीला . साऱ्या गोष्टी योग्य वयात झाल्या म्हणजे वय पण भरकटत नाही .अजून अल्लडपणा आहे जरा जबाबदारी पडली की सुधारेल . 

   हाच मार्ग काढायला हवा आहे , मल्हारीला जर आत्ताच आवरले नाही तर ज्या गावात प्रत्येक स्त्री आई बहिणी समान आहेत ,त्यांच्या पुढे उभे राहणे शक्य होणार नाही , हा विचार करून रामजी घरी आला .

  रामजीने सखूला तिच्या भावाची मुलगी सून करून घेवू म्हणून सांगितले . तीही तयार झाली .

मुलगी द्यायला भाऊ पण आनंदाने तयार झाला . एकुलता एक भाचा आहे .भरपूर पैसा अडका आहे .मुलगी अगदी राणी होवून राहीन .बापाच्या भोळ्या मनाच्या आशा .त्यालाही वाटलं मल्हारी जरा पोरसवदाच आहे , लग्न झालं की लागेन मार्गाला .

  यथावकाश लग्न झालं . रूपा खरंच खूप गोड आणि गुणी पोरं .नाजूक पण उठावदार बांध्याची .मल्हारीपेक्षा खूपच उजवी , पण मुलीला द्यायला , मुलगा कसा का असेना पण घर कसं तालेवार आहे याला जास्त महत्त्व देणारा हा समाज . आणि साऱ्यांचा गोड गैरसमज की लग्न झालं की मुलं सुधारतात .त्यासाठी मात्र मुलीचा अगदी डोळे झाकून बळी देणार . 

  जणू काही फक्त पैसा भरपूर आहे म्हणून मुलीला त्या घरात द्यायची .लग्न पैश्यासोबत करतात का मुलासोबत हा सहज पडणारा प्रश्न !

   रुपा घरात सून म्हणून आली .नव्याचे नऊ दिवस सरले .मल्हारी पण आता जरा घरात जास्त घोटाळत असायचा ते पाहून दोघे आईबाप सुखाने निश्चित झाले . योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याचे समाधान दोघांच्या चेहऱ्यावर पसरले .आपण आता सगळं दोघांवर सोपवून लवकरच तीर्थ यात्रेला जावू असे स्वप्न दोघे मनात रचत होते .

    चार पाच महिने सुखसमाधानात सरले , रूपाला दिवस गेले , सासर माहेर आनंदाने मोहोरून गेले . तिला मात्र कडक डोहाळे लागले .काहीच पचत नव्हते तिला . उलट्यानी ती अगदी बेजार झाली होती .

   अश्यातच गावात एक अशक्य अशी घटना घडली .सारा गाव हादरला त्यामुळे .

   सकाळी जनावर धुवायला गेलेल्या एका गावकऱ्याला नदीच्या किनाऱ्यावर एका १८-१९ वयाच्या मुलीचा मृतदेह पडलेला दिसला . घाबरून तो तसाच गावात पळत सुटला ......

क्रमशः



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy