Pradnya Khadakban

Fantasy Others

4.3  

Pradnya Khadakban

Fantasy Others

त्याग तिचा आणि त्याचा

त्याग तिचा आणि त्याचा

6 mins
485


स्वप्न ती नसतात जी झोपेत पाहिली जातात, स्वप्न ती असतात जी माणसाची झोप उडवतात...स्वप्न माणसाला जगायला शिकवतात... आत्मविश्वास देतात आणि स्वप्न पुर्ण करण्यासाठी धावायला पण शिकवतात... ही गोष्ट आहे स्वप्नांच्या मागे धावणाऱ्या शशांक आणि रिया यांच्या स्वप्नांची...


एका छोट्याश्या शहरात राहणारा शशांक नावाचा मुलगा...लहानपणापासून त्याने गायक व्हायचं स्वप्न पाहिलं. पण घर आणि संसार यामधून त्याला त्यांच्या स्वप्न पूर्तीसाठी वेळच मिळाला नाही.... आईवडील दोघे पण सुशिक्षित त्यामुळे त्यांनी शशांकला चांगलं शिकवलं आणि स्वतःच्या पायावर उभं केलं...घरची परिस्थिती अगदी सामान्य त्यामुळे वयाच्या 18व्या वर्षी पासूनच नोकरी करायला लागून घराला हातभार लावत होता. कामाप्रती प्रेम, प्रामाणिकपणाने काम त्यामुळे त्याची उत्तोरोउत्तर चांगली प्रगती झाली....वयाच्या पंचवीसाव्या वर्षी त्याचे निशा नावाच्या सुंदर, सुशील मुलींसोबत सुत जुळले आणि त्यांनी प्रेमविवाह केला... दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम... त्याचे आईवडील सुद्धा तिला मुलीसारखे वागावायचे. आईवडिल आणि मुलगा, सुन असा चौकटीतला संसार आनंदाने फुलत होता.... पण काहीतरी कमतरता जाणवत होती. लग्नाला पाच वर्षे उलटून गेली तरी त्यांना मुलं होत नव्हतं. आईवडिलांना आता नातवाची आस लागली होती. त्यांनी त्यांना डॉक्टर कडे जाऊन ट्रीटमेंट करायचा सल्ला दिला.


वेगवेगळ्या डॉक्टरला भेटुन झाले. विविध दवाखाने पालथे घातले. ट्रीटमेंट साठी अमाप खर्च होत होता. आणि हा वाढलेला खर्च आता त्याच्या पगारातून भागेनासा झाला होता. आणि त्याचवेळी टेलिव्हीजनवर रिऍलिटी शो ची जाहिरात चालु होती. "इंडियाज बेस्ट सिंगर" ला 1 कोटीचे बक्षीस. ही जाहिरात बघताच शशांकचे डोळे चमकले. मी जर ही स्पर्धा जिंकलो तर मला हे 1 कोटी रुपये मिळतील... मग मी माझ्या कुटुंबाला दुसऱ्या एका शहरात घेऊन जाईल आणि तिथे एखादं मुल दत्तक घेऊन आनंदाने संसार करेल. आणि मग घरी येऊन त्याने ही कल्पना आईवडिलांना आणि बायकोला सांगितली....


ॉ आपण हे शहर सोडुन दुसऱ्या शहरांत राहायला जाऊया आणि एखादं दत्तक मुलं घेऊन चांगल्या प्रकारे त्याच पालन पोषण करूया.... निशाला हा निर्णय पटला पण आईवडिलांना काही हा निर्णय आवडला नाही.... ते बोलले आपण अजुन थोडी वाट पाहुया. शशांक बोलला मेडिकल ट्रीटमेंट वरचा खर्च खुप होतो आणि त्यात कधी यश मिळेल? हे सांगु शकत नाही. 3 वर्षे ट्रीटमेंट चालु आहे...मला दत्तक मुलं हा पर्याय योग्य वाटतो. पण आईवडिलांनी स्पष्टपणे नकार दिला. वडील बोलले आता विज्ञान खुप पुढे गेलंय दत्तक मुलं घेण्यापेक्षा सरोगसीचा पर्याय आपण निवडू शकतो... आईवडीलांचा हा सल्ला ऐकुन दोघे पण चमकले...पण शशांक म्हणाला असं कोण भेटेल? कोणाला शोधाव? या सर्व प्रक्रियेमध्ये पण खुप वेळ जाईल. त्यामुळे त्याने सरोगसीसाठी स्पष्ट पणे नकार दिला आणि तूर्तास मुल हा विषय घरात बंद झाला....


पण "इंडियाज बेस्ट सिंगर" या स्पर्धेत भाग घेऊन आपण सिंगर व्हायचं स्वप्न पुर्ण करायचं असं त्याने ठरवलं. त्याच्या शहरातील ऑडिशनच्या ठिकाणी तो गेला. त्याच्या सुमधुर आवाजामुळे त्याची स्पर्धेकरीता निवड सुद्धा झाली. त्याला खुप आनंद झाला.... आपल्या स्वप्नांच्या दिशेने त्याने पहिले पाऊल टाकले होते.... आता तो रोज पहाटे उठुन रियाज करत होता... तूर्तास त्याने मुल हा विषय बाजुला ठेवला होता. आणि नोकरी आणि गाणं यामध्ये पूर्णपणे गुंतला होता....


दुसरीकडे रिया नावाची 20 वर्षाची मुलगी आपली आई आणि भाऊ यांच्या समवेत शहरातील एका छोट्याश्या घरात रहात असते. घरची परिस्थिती खुप बिकट असते. आई घरकाम करून मुलांना शिकवत असते. पण अचानक ती आजारी पडते आणि तिच्या आजारपणावर होणारा औषधांचा खर्च खुप असतो... त्यांना मदत करणारे पण कोणी नसतात. रियाचे अपूर्व नावाच्या मुलावर नितांत प्रेम असते. आपल्या भावाला चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करायचे आणि सर्वं जबादादाऱ्या पार पडल्यावरच अपूर्व सोबत लग्न करण्याचा तिने निर्णय घेतला होता. 


त्याचवेळी तिला सुद्धा या 1 कोटीच्या बक्षीसांने भुरळ घातली आणि हे बक्षीस जर मला मिळाले तर भावाच शिक्षण व आईचे आजारपण त्यात होईल व बाकी पैसे Savings मध्ये ठेवुन मी अपूर्व सोबत लग्न करून आमच एक सुंदर आयुष्य सुरु करेल... असं स्वप्न ती रंगवते व दुसऱ्याच दिवशी ऑडिशनच्या ठिकाणी दखल होते. तिचा पेहराव.... तीचे साधे कपडे बघुन सगळे लोक तिची टिंगळ उडवतात पण तिच्या आवाजातील गोडव्यामुळे सर्वांची बोलती बंद होते आणि तिची सुद्धा या स्पर्धेसाठी निवड होते....


आता एक नवीन खेळ सुरु झाला होता....शशांकच्या व रियाच्या स्वप्नांचा.... दोघेही खुप मेहनत घेत होता.... ही स्पर्धा त्यांच्या साठी आयुष्य बदलवणारी होती.... शंशाकच गायक होण्याच स्वप्न, कुटुंबाचा आनंद, रियाच्या भावाच्या स्वप्नाची पूर्ती आणि अपूर्व सोबत लग्न.... दोघेही खुप सुंदर गात होते.... त्यांचा एक वेगळा फॅन वर्ग बनला होता. जिंकण्याची आस तर दोघांनाही होती... पण आता हळूहळू रिऍलिटी शोचा फायनल शो जवळ येत होता.... आणि शेवटचे 5 फायनलीस्ट उरतात आणि यामध्ये सरस दोघेच असतात. शशांक आणि रिया... यामध्ये 1 कोटीचे बक्षीस कोण मिळवेल हे सांगूच शकत नव्हतं.... दोघेपण आता थोडे Insecure Feel करतात. रियाला वाटत शशांक जिंकेल.... शशांकला वाटत रिया जिंकेल....आणि मग रियाच्या मनात येत की आपण शशांकला भेटुन सांगूया की मला या 1 कोटींची खुप गरज आहे....कृपया तु मला हे जिंकण्यासाठी मदत कर.. ते दोघेही भेटतात...शशांक आणि रिया एका कॉफी शॉप मध्ये समोरासमोर येतात... आणि रिया त्याला ही स्पर्धा सोडायला सांगते. शशांकला क्षणभर काय बोलावे हेच सुचत नाही... त्याला दुसरं शहर, त्याचे सिंगर व्हायचं स्वप्न आणि दत्तक मुल ही कल्पना, हे स्वप्न त्याच्या डोळ्यासमोर येत. त्यामुळे तो तिला नाही सांगतो... माझ्या साठी, माझ्या कुटुंबासाठी ही स्पर्धा खुप महत्वाची आहे. आणि मग रिया थोडी हिरमूसली होते. आणि त्याला सांगते माझ्यासाठी सुद्धा ही स्पर्धा खुप महत्वाची आहे... या स्पर्धेमुळे माझ्या आईचा जीव वाचु शकतो.... तिच आजारपण आणि त्यावर होणारा खर्च आणि माझ्या भावाच शिक्षण.... आणि हे 1 कोटी मिळाल्यावर माझ्या जबाबदाऱ्या पार पाडून मी माझे स्वप्न पुर्ण करू शकते.


दोघांच्याही स्वप्न पूर्तीचा हा प्रवास होता... त्याचे स्वप्न आईवडील, बायकोचा आनंद आणि हीची जबाबदारी आई आणि भावाची स्वप्न पूर्ती आणि मग तिची स्वप्नपूर्ती...अचानक शशांक तिला मी स्पर्धा सोडायला तयार आहे... पण माझी एक अट आहे. अट असे म्हणुन रियाचे डोळे चमकले... त्याने चाचपडतच तिला सांगितले... माझ्या लग्नाला 8 वर्षे झालीत. मला मुल नाही... अनेक औषधोपचार करून झाले. आणि आता या सर्वं ट्रीटमेंटवरं होणारा खर्च आणि लागणारा वेळ यामध्ये मी खुप थकून गेलोय. माझे आईवडील दत्तक मुलं घायला तयार नाही... तु जर सरोगसी साठी तयार झालीस तर मी ही स्पर्धा सोडतो..... तिच्या पायाखालची जमीनच सरकली.... माझं वय 20 वर्षे... माझ्या आयुष्याची सुरुवात सुद्धा अजुन झाली नाही. माझी स्वप्न, माझं भविष्य... हे सर्वं विचार करता करता तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले .... आपण नकळत काय बोलुन बसलो? सशांकला खुप अपराधी वाटतं. भावनेच्या भरात मनातली इच्छा ओठावर आली आणि तो तिची माफी मागतो....पण काहीच न बोलता रिया तिथून निघुन जाते. रियाज दरम्यान रोज त्यांची भेट होत असते.... सामना अगदी अटीतटीचा होणार असतो. रिया आणि शशांक एकमेकांसोबत बोलत सुद्धा नाही. आणि स्पर्धेचा दिवस उजाडतो....


कोण जिंकणार? शशांक का रिया असे सगळीकडे बोर्ड लागलेले असतात. फायनलला जायची तयारी चालु होते. शशांक स्पर्धेच्या ठिकाणी जाण्यासाठी तयारी करत असतो. तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. समोरून थरथरलेल्या ओठांनी मी री री रिया बोलते....तुम्ही मला कॉफी शॉप मध्ये भेटु शकता का? शशांकला प्रश्न पडतो? आता हिने मला का बोलावले असावे?


ते दोघे पण कॉफी शॉप मध्ये भेटतात. थरथरलेल्या ओठांनी, डोळ्यात आसवांचे थवे वहात असताना....मला तुमची अट मान्य आहे असे रिया बोलते. क्षणात शशांक जागेवरच उडतो. तुम्ही ही स्पर्धा सोडा... बाकी फॉर्मॅलिटी साठी आपण लवकरच भेटुया आणि क्षणात ती तिथून निघुन जाते.....शशांक तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहातच राहतो....ती कशी काय तयार झाली? खरंतर मी भावनेच्या भरात तिला खुप चुकीची अट घातली होती. आणि मला त्याचा खुप पश्चाताप होत होता... तीच वय खुप लहान आहे तिच्या समोर तीच आयुष्य, तीच स्वप्न असताना ती सरोगसी साठी का तयार झाली??


शशांक विचार करत तिथेच बसुन राहिला. इकडे "इंडियास बेस्ट सिंगर" ची विजेता रिया ठरली होती. सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत होता. रियाच्या हातात ट्रॉफी होती.... तिच्या डोळ्यात आनंद दिसत होता...पण तिच मन खुप दुःखी होत...ती आतून कोलमडली होती....तिने हा धाडसी निर्णय का घेतला असावा?


तिच्या भावाचं स्वप्न पूर्ण होणार होत....पण तिचं लग्न?? मनात विचाराचे काहूर माजत होते....अपूर्वचा अपघात झाला होता.... तो हॉस्पिटल मध्ये Admit होता....तो जगण्याची झुंज देत होता....त्याच्या हॉस्पिटलसाठी लागणारा खर्च 50लाख रुपये होता. आणि हा खर्च या ट्रॉफीच्या पैश्यामधुन करून तो त्यातुन वाचणार होता. कोणालाही न सांगता तिने हा धाडसी निर्णय घेतला होता. अपूर्वला हे सर्वं कळल्यावर तो तिचा स्वीकार करेल का?

भावाचं स्वप्न पुर्ण होतंय पण तिच्या स्वप्नाचं काय?

तिची स्वप्न, तीच भविष्य?? आई आणि भावासाठी, अपूर्वसाठी त्यांचा ती त्याग करते... आणि दुसरीकडे शशांक घरच्याच्या आनंदासाठी, आईवडिलांच्या इच्छेसाठी लहानपणापासून बघितलेल्या स्वप्नाचा त्याग करतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy