Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Pradnya Khadakban

Inspirational Thriller


2  

Pradnya Khadakban

Inspirational Thriller


मनुष्य रूपातला देव

मनुष्य रूपातला देव

1 min 121 1 min 121

म्हणे माणुसकी काही उरली नाही...असे आपण सहज ऐकतो किंवा म्हणतो... वि. स. खांडेकरांनी म्हंटलं होत "स्वतः साठी जगलास तर मेलास"... पण "दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास"...पण हल्ली कुठे कोण कोणासाठी जगतंय.... प्रत्येक जण आपआपल्या विश्वात कार्यमग्न आहेत... कोणाला कोणाकडे पहायला वेळ नाही.... माणसाला माणसांवर विश्वासच राहिला नाही.... माणुसकीचे झरे आटत चाललेत.... नात्यांचे बंध तुटत चाललेत....पण कधी कधी हे सुद्धा फोल ठरत जेव्हा पॉईंटमन मयुर शेळके सारखी शौर्यवान व्यक्ती स्वतःचा जीव धोक्यात घालुन दुसऱ्याचा जीव वाचवते.


वांगणी रेल्वे प्लॅटफॉर्मवरुन आपल्या लहान मुलाला घेऊन जाणारी अंध आई.... तिच्या नकळत ते मुल रेल्वे पटरीवर पडतं.... समोरून भरधाव वेगाने येणारी एक्सप्रेस.... दुर्घटना घडायला एक क्षणसुद्धा पुरेसा असतो...काहीही होऊ शकत....पण त्यावेळी पॉईंटमन मयुर शेळके यांनी प्रसगांवधान राखून वाऱ्याच्या वेगाने धाव घेऊन त्या मुलाचे प्राण वाचवले.... स्वतःच्या प्राणाची बाजी लावुन दुसऱ्याला जीवनदान देणाऱ्या माननीय मयुर शेळके यांना मानाचा मुजरा. मनुष्य रूपात भेटलेला देव असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही.


Rate this content
Log in

More marathi story from Pradnya Khadakban

Similar marathi story from Inspirational