STORYMIRROR

Pradnya Khadakban

Inspirational Children

3  

Pradnya Khadakban

Inspirational Children

हरवलेले बालपण

हरवलेले बालपण

3 mins
552

खरंच बालपण कधी हरवत का

हा प्रश्न मला, तुम्हाला, सर्वांनाच पडला असेल ना

या प्रश्नांचे उत्तर शोधायला कुठून सुरुवात करावी तेच कळत नाही.... लहान असतो तेव्हा ओढ असते लवकर मोठं व्हायची... आपले आईवडील सुद्धा मुलं एकदा मोठी झाली की टेन्शन नाही किंवा आपण लहान असताना त्यांना देत असलेला त्रास त्यामुळे सुद्धा कधी एकदा ही मुलं मोठी होतात असं झालंय असं वैतागून ते बोलत असतील.

लहानपणाची गम्मत वेगळी, मौज वेगळी... जगाशी ओळख नसते... शाळा आणि घर या व्यतिरिक्त आयुष्यच नसते... त्यावेळी तर मोबाईल सुद्धा नव्हते... ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही पासुन ते रंगीत टीव्ही असा प्रवास आपल्या Generation ने केलाय... लग्न समारंभा व्यतिरिक्त फिरणं पण नव्हतं... कोणत्याही अपेक्षा नसलेल सुखासूखी आयुष्य होत ते.... करवंद, कैऱ्या, चिराड जंगलात जाऊन काढायचा आनंदच पण वेगळाच... नवीन ड्रेस आणला तरी सर्वाना दाखवण्याचा आनंद भारीच होता. आपल्या सणांची उत्सुकता होती, आतुरता होती... पण आता सण येतात आणि जातात... त्यांचं वेगळेपण असं काही राहीलच नाही असं वाटत.. पण जसं जसं मोठं होत गेलो तश्या अपेक्षा, जबाबदाऱ्या पण वाढत गेल्या... आणि निरागस असणार मन हळहळू अनुभवातून बरंच काही शिकू लागलं... माणूस शिक्षण, नोकरी, लग्न, संसार यामध्ये हळहळू इतका गुंतून जातो की त्याला स्वतःचा सुद्धा विसर पडायला लागतो...

लहानपणी माणसांकडे पैसा नव्हता पण वेळ होता. बैठे खेळ, पटांगणातील खेळ सर्वांनी एकत्र येऊन खेळले जायचे... त्यामुळे ऐकमेकांनविषयी ओढ होती प्रेम होते... पण आता सगळंच काही बदललंय बरं का.....घडलंय बिघडलंय ते कसं तेच बघा...आताची मुलं बाजु बाजूला बसतात पण त्यांचा एकमेकांशी सवांद नसतो. सगळी डोकी मोबाईलमध्ये असतात. आजीकडे सुट्टीला आलेली नातवंड सुद्धा आजीशी संवाद न करता मोबाईल मध्ये गुंतलेली असतात. आताच्या मुलांचे लहानपण एकदमच गुरफटून गेलंय... गुरफटून गेलंयहे ऐकायला विचित्र वाटेल. पण आताची मुले शाळा, क्लासेस, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी यामध्ये एवढी busy झाल्यात की त्यांना लहानपण Njoy करता येतच नाही. आणि घरी आल्यावर शाळेचा अभ्यास, क्लासचा अभ्यास आणि त्यातून वेळ मिळाल्यावर हातात मोबाईल....त्यामुळे त्यांचा कोणाशीही संवाद होत नाही... मोठं झाल्यावर पैसा हातात येतो पण वेळ मिळत नाही हे लहान असल्यावर नाही कळत. मोठं झाल्यावर माणुस जबाबदाऱ्या मध्ये इतका गुंतून, गुरुफ़ुटून जातो की त्याला श्वास सुद्धा घेणं अशक्य होत... आणि मग विचाराच्या गर्तेत तो हरवून जातो. लहानपण किती छान होते... कशाचीही चिंता नाही... कशाचीही अपेक्षा नाही... जुनी पुस्तके, जुने ड्रेस वापरायला पण कधीच लाज वाटली नाही... पण याच गोष्टी मोठं झाल्यावर आपोआप बदलतात.. मग आपण लहान असताना जास्त विचार करत नव्हतो तेच बरं होत असं वाटत राहत. आयुष्यातले बालपणीचे अनमोल क्षण निसटून गेल्यावरच त्या क्षणांचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते. मग आपण आपलं हरवलेलं बालपण शोधायचा प्रयत्न करतो... पण ते कधीच शोधू शकत नाही. "म्हातारीचे केस" कसे भुरकन उडून जातात तसे आपले लहानपण आपल्या हातून निसटून गेलेले असते. तरीही ओढ लागते बालपणाची, हरवलेल्या अनमोल सोनेरी क्षणाची.....


ओढ बालपणाची.... ओढ शाळेची


ओढ बालपणाची.... ओढ पावसाची


ओढ बालपणाची.... ओढ मैत्रीची


ओढ बालपणाची....ओढ नात्यांची


ओढ बालपणाची.... ओढ लपवाछपवीच्या खेळाची

 

ओढ बालपणाची.... ओढ भातुकलीच्या खेळाची


माझे बालपण...

मला आता हवेहवेसे वाटते...


बालपणीचे हरवलेले क्षण,

मला आता हवेहवेसे वाटते...


तेव्हा नव्हतं कसलंच टेन्शन,

तेव्हा नव्हती कसलीच पेन्शन...


डिजिटल विश्वात वावरतोय,

पण जगाशी तुटलेलेलं बालपण हवेहवेसे वाटते...


आयुष्यातले निसटून गेलेले क्षण नव्याने जगावेसे वाटते...

भातुकलीच्या खेळात पुन्हा रममाण व्हावेसे वाटते...


आता हेची मागणे देवाला,

देवा देशील का रे लहानपण मला...

निसटून गेलेले अनमोल क्षण पुन्हा जगता येतील का मला...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational