आकाश निर्मलाई मधुकर लोंढे आप्पा

Inspirational

3  

आकाश निर्मलाई मधुकर लोंढे आप्पा

Inspirational

॥ तुकोबाची अभंगवाणी 2॥

॥ तुकोबाची अभंगवाणी 2॥

1 min
321


सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥

तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥

मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥

तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥


अर्थ:-

सुंदर मनमोहक मनाला भक्तिप्रधान करणारे असे रूप ज्याचे आहे तो विठोबा विटेवरी उभा राहून कटेवर कर ठेवून उभा आहे. पिवळा पितांबर घालून गळ्यात तुळशीच्या माळा असे हे रूप मला निरंतर आवडते असे तुकोबाराय अभंगात म्हणत आहेत. त्या विठ्ठलाच्या कानात असलेले मकर कुंडले आकर्षक स्वरूपाची आहे आणि कंठी कौस्तुभमणी शोभिवंत विराजमान आहे. असे हे विठोबाचे रूप लावण्य सुंदर आणि मनाला भावणारे आहे. असे रूप पाहून मन हे विठ्ठल रुपी होऊन जाते.

तुकाराम महाराज शेवटच्या चरणात म्हणतात असे हे देखणे स्वरूप पाहण्यास आम्हाला सुख वाटते आणि ते वेळोवेळी पाहावेसे वाटते आणि ते स्वरूप आवडीने पाहीन. असा हा पांडुरंग परमात्म्याच्या रूपाचे वर्णन करणारा अभंग तुकाराम महाराजांनी लिहीलेला हा अभंग वेळोवेळी कीर्तनाच्या सुरुवातीस आजूनही चारशे वर्षापासून गायला जातो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational