आकाश निर्मलाई मधुकर लोंढे आप्पा

Inspirational

3  

आकाश निर्मलाई मधुकर लोंढे आप्पा

Inspirational

तुकोबाची अभंगवाणी १२

तुकोबाची अभंगवाणी १२

1 min
1.5K


ॐ॥जय जय राम कृष्ण हरि॥ॐ

*॥ तुकोबाची अभंगवाणी १२॥*

न देखें न बोलें नाइकें आणीक । बैसला हा एक हरि चित्तीं ॥१॥

सासुरें माहेर मज नाहीं कोणी । एक केलें दोन्ही मिळोनियां ॥२॥

आळ आला होता आम्ही भांडखोरी । तुका म्हणे खरी केली मात ॥३॥


*अर्थ*-

*तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम*

असे सामर्थ्य असणारे ते श्रीमंत श्री जगद्गुरु देहू निवासी श्री तुकोबाराय यांचा गाथ्यातील हा अभंग आहे. या अभंगात त्यांची त्या पांडुरंग परमात्म्याच्या प्रति असणारी ओढ  जी भक्ती आहे जे प्रेम आहे ते दिसत आहे. तुकोबाराय असे म्हणत आहेत की मला त्या विठोबा शिवाय काहीही बघायला आवडत नाही ना काहीही बोलायला आवडत नाही ना काही ऐकायला आवडत नाही माझ्या चित्तात फक्त तोच तो विश्वाचा अधिकारी तो पांडुरंग परमात्मा बैसला आहे‌. सासर माहेर हे माझ्यासाठी काहीही आणि कुणीही राहिले नाही माझे सासर माहेर हे दोन्हीचा संगम विठुराया झालेला आहे. असा तो चक्रपाणी तुकोबाराया साठी सर्वस्व झाले आहे. तुकाराम महाराज एका अभंगात असा उल्लेख करत आहेत की

*तुका म्हणे मज येथे नाही कोणी एका चक्रपाणि वाचुनिया*

शेवटच्या चरणात तुकाराम महाराज असे म्हणत आहेत त्यांच्यावर जगातील हे जनलोक काहीना काही आळ घेऊन त्यांचे नाव बदनाम करत होते कोणी त्यांना भांडखोर म्हणत होते  पण त्यांच्या सर्वांवर त्यांनी मात करून त्यांनी सिद्ध केले ते सत्य पुरुष आहेत विठोबाचे दास आहेत.


ॐ रामकृष्णहरि ॐ

॥श्रीसदगुरूदत्तात्रयार्पणमस्तु॥


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational