End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

Sumedha Adavade

Drama


4.8  

Sumedha Adavade

Drama


टूर टूर!!

टूर टूर!!

4 mins 1.0K 4 mins 1.0K

तो घाई घाईत ऑफिस मधून निघाला. दुपारचा १ वाजून गेला होता. त्या दोघांचं लंच एकत्र घ्यायचं ठरलं होतं. ती एव्हाना पोहोचली असेल. पुन्हा चिडेल आपल्यावर. एक तर आधीच वैतागली आहे. गेल्या आठवड्यापासून मागे लागली आहे की फिरायला जायचयं कुठेतरी ८ दिवस. ८ दिवस!!?? आपण चेहऱ्यावरचं आश्चर्य लपवू शकलो नव्हतो. आणि मग भुणभुण गाणं चालू झालं होतं. आणि चांगलं तास भर चालूच होतं. गेल्या ३ वर्षात कुठे फिरायला नेलं नाही. स्वतःला काही वाटतं की नाही. मुलाला पण सुट्टी आहे नाताळची. निदान त्याच्या साठी तरी काही विचार करावासा वाटतोकी नाही. सतत आपलं आईचा विचार करा. तिला वाईट वाटेल. ती घरात एकटी राहील. तिला कंटाळा येईल. असं आपलं आपणच गेलोतर वाईट दिसेल. तिला आवडणार नाही. ती रागावेल. सतत आई, आई, आई! एक मुलाचे बाप झालात. कधी संसार सुरु होणार आपला? माझी काही हौस मौज आहे की नाही?.......देवा!!!


कानात कापसाचे बोळे घालून बसावसं वाटत होतं. पण त्याने रान अजून पेटलं असतं. नशीब त्या वेळेस आई देवळात गेली होती. नाहीतर घराचं कुरुक्षेत्र झालंच असतं. च्याआयला! ह्या जगात आई आणि बायको ला एका घरात एका वेळेस हॅन्डल करणारा कोणी महापुरुष, सिद्ध योगी, साधू बाबा वगैरे असेल का? गुरुमंत्र घेऊन येतो त्याच्याकडून! पण त्याच्याकडे गुरुमंत्र असता तर तो साधू बाबा कशाला होईल? ह्या विचाराने त्या परिस्थितीतही त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. पण हसला असता तर आगीत तेल, रॉकेल, पेट्रोल, डिझल सगळं पडलं असतं.


पण एका अर्थी तिचं बरोबर होतं. ती काय एवढा ताजमहाल मागत होती आपल्याकडे? ३ वर्षं आपण खरंच कुठेही नेलंय नाही तिला. अद्वैत आता ३ वर्षाचा झाला. त्याच, घरच, ऑफिस सगळं करण्यात तिचाही दिवस जातो. तिला ब्रेक घ्यावासा वाटत असेलच ना? पण आईचं काय करू? तिला राग येईल आम्ही तिघं अशी फिरायला बाहेर गेलो तर. परत ती पण इमोशनल ब्लॅकमेल करणारच आपल्याला. तुझे बाबा असते तर मला हे दिवस दिसले नसते.. अँड ऑल! काय करू यार मी? आज निक्षून सांगितलंय बायकोने लंच एकत्र करायचा आणि त्या नंतर टूर्स च्या ऑफिस मध्ये जाऊन ८ दिवसांची टूर बुक करायची म्हणजे करायचीच! हा बॉम्ब घरी फुटला तर आई माझ्यावर तोफ डागायला तयार असेलच! आज वाट लागणार हे नक्की!


वाटेत त्याची बाईक सिग्नल ला थांबली तेव्हा शेजारच्या बाईक वर एक couple होतं. त्यांचा वाद चालू होता.

" हे काय रे. आपण आपलं आयुष्य कधी जगणार? जरा कुठे ४ दिवस फिरून येऊ म्हटलं तर तुझ्या आई वडिलांना आताच यायचं होतं आपल्या घरी?"

"अगं, अशी काय करतेस? ते जवळ जवळ ७-८ महिन्या नंतर यायचं म्हणत आहेत. त्यांना नाही कसा म्हणायचं? आपण जाऊ कि पुढल्या महिन्यात!"

" हे तू गेल्या ५ महिन्यापासून म्हणत आहेस. तुझा पुढचा महिना पुढच्या जन्मावर जाईल आता! आणि नकोच मला पुढचा जन्म ह्याघरात. ह्याच जन्मी धन्य जाहले मी!" म्हणत तिने हात जोडून कपाळाला लावले.

"मला माहित नाही त्यांना पुढल्या महिन्यात यायला सांग. आपण ह्यामहिन्यातच फिरायला जायचं. बस झालं आता! खूप सहन केलं मी. मला काही life आहे कि नाही?"


तो बिचारा गप्प. इतक्यात सिग्नल चालू झाला. मनात हा म्हणाला," घरोघरी..." त्याच्या समोर ही आज असच काही मोठ्ठ ताट, नव्हे थाळी, परात काय असेल ते वाढून ठेवलं होतं, जे त्याला निस्तरायचं होतं.


विचार करत करत तो ठरलेल्या त्यांच्या नेहमीच्या हॉटेल मध्ये पोहोचला. तिने table बुक करून ठेवला होता. ह्या गोष्टी तिला कधीसांगाव्या लागल्यात नाही त्याला. ती अगदी परफेक्ट होती सगळ्यात.... वेल.. काही गोष्टीत.

तिच्या समोर बसून त्याने नेहमी प्रमाणे हसून आधी सॉरी म्हटलं. मग दोघांनी ठरवून ऑर्डर दिली आणि गप्पा मारू लागली. तीच बोलत होती. त्याला ऑफिसचे किस्से सांगत होती. बोलता बोलताफिरण्याचा विषय निघाला आणि त्याला ठसका गेला. त्याला पाणी देत ती म्हणाली,

" अहो हळू जरा. पाणी घ्या!" तो शांत झाल्यावर ती पुन्हा बोलूलागली.

" हा, मी काय बोलत होते. ऑफिस मध्ये हल्ली काम वाढलंय हो. ह्या मंथ एन्ड ला आमचे ग्लोबल हेड येणार आहेत ऑफिसला. ते २ आठवडे तरी थांबतील. आणि त्या नंतर तर कामाचा लोड आणखीवाढेल. मला नाही वाटत आपल्याला इतक्यात काही टूर वगैरे प्लॅनकरता येईल असं."

त्याचा स्वतः;च्या कानांवर विश्वास बसेना ! हे म्हणजे कोणाकडे हजाररुपये मागावे आणि त्याने एक blank cheque सही करूनआपल्याला हातात ठेवावा असं झालं! मनातून आनंदाच्या उकळ्याफुटत होत्या. पण आता लढाई का शेवटचा टप्पा जिंकायचा तर शत्रूला सहानुभूती दाखवणं ह्या परिस्थितीत गरजेचं होतं. तरच सगळं नॉर्मल होणार होतं. त्याने तिचा हात हातात घेऊन म्हटलं,


" इट्स ओके. आय कॅन अंडरस्टॅंड. आपण पुन्हा कधी तरी जाऊ. तू तुझ्या कामावर focus कर."


जेवण झालं, त्याने बिल दिलं आणि दोघे बाईक ने निघाली.तिला तिच्या ऑफिस जवळ सोडून तो निघून गेला. ती वर ऑफिस मध्ये आली. तिच्या डेस्क वर आल्या नंतर थोड्या वेळाने तिची मैत्रीण आली तिच्याकडे.


"काय ग? कुठली टूर बुक केलीत?"


"नाही ग. आम्ही नाही जाणार आहोत." ती.


" का?" तिने आश्चर्याने विचारलं. तिला माहित होतं हिला ब्रेक ची किती गरज आहे ते.


"अगं. त्याला खूप जड गेलं असतं आईंना आम्ही फिरायला जातोय हेसांगणं. शिवाय त्या इथे एकट्या राहिल्या असत्या तर हा पण आमच्यासोबत काही एन्जॉय करू शकला नसता... त्याचं अर्ध लक्ष आईंकडेच लागून राहिला असतं. शिवाय त्याला guilty पण वाटत राहिलं असतं. तो खूप हळवा आहे ग त्यांच्या बाबतीत.शिवाय मला नाही म्हटलंअसतं तर मी पण धारेवर धरलं असतं त्याला. मग मी कामाची टेप लावली आणि मलाच नाही जमणार म्हणून सांगितलं"


" अगं ह्याला काय अर्थ आहे? आणि त्यात guilty काय वाटायच? तुम्ही तुमचं life कधी जगणार ?


तिने हसून उत्तर दिलं,

"आम्ही? रोजच्या येणाऱ्या प्रत्येक क्षण सोबत आमचं life जगणार ! जाऊ दे ग. आपलं माणूस आहे. त्याला तरी कोण समजून घेणार?


Rate this content
Log in

More marathi story from Sumedha Adavade

Similar marathi story from Drama