* तशात पाऊस... *
* तशात पाऊस... *
आज पुन्हा तीच ओल... आज पुन्हा तोच गंध...
आज पुन्हा तोच साकव, आज पुन्हा तेच बंध...
आज पुन्हा तीच रात्र, आज पुन्हा तेच चांदणं..
आज पुन्हा तेच confusion, आज पुन्हा तीच खात्री...
एखाद्याला सोबत घेऊन जगणं, खरंच इतकं कठीण असतं का?
दोन धागे एकत्र आणणं, खरंच इतकं अवघड असतं का?
भीती नक्की कसली वाटते?
साथ सुटण्याची....
आधार नक्की कोणाचा वाटतो?
आपल्याला समजून घेणा-याचा....
इतकं सगळं clear आहे, तर मग अडचण येते कुठे?
तो विचार करत होता अन् ती दरवळत होती त्याच्या आत,
तशात पाऊस....