Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.
Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.

Ashutosh Purohit

Romance

0.6  

Ashutosh Purohit

Romance

आगळे वेगळे प्रेम...

आगळे वेगळे प्रेम...

2 mins
1.6K


पत्र्यावरून पावसाचे काही शांत थेंब खाली पडले. तिनं ओंजळीत पकडले ते, एखादं नक्षत्र पहावं, तशी पाहत राहिली ती त्यांच्याकडे. एक टक. तेही तिच्याकडे पाहत होते.

"एक वर्ष झालं ना गं!" थेंब म्हणाले..

"हं म्"

"त्याच्याशी काही संपर्क ?"

"नाही."

"पकडलंस का असं आम्हाला ?"

"आठवण आली त्याची खूप.."

"😊😊 अगं मग फोन कर ना त्याला !"

"आमच्यातलं अंतर एका फोनने पार करता येईल असं नाही वाटत मला.."

थेंब हातातून खाली गळून पडले.. मातीवर साचलेल्या इवल्याशा तळ्यात विलीन झाले..

येणारे जाणारे रोज बघतात मला..

'हिला असं का इथे ठेवलंय ?'

'अहो चुकून विसरून गेलं असेल कोणीतरी...' आपापसात कुजबुजतात काहीबाही. मी सगळ्यांचं सगळं शांतपणे ऐकते. जुनं आठवत राहतं सतत... नाटकाची चालणारी तुफान तालीम आठवते... सगळं आठवतं.. माझ्यावर उभं राहून घेतला गेलेला monologue....असा ऐकत राहावसा वाटायचा मलाच! तरी गेल्या वर्षभरात आठवणी विसरायला शिकल्ये मी.. पण पावसात ना उगाच जुनी गाणी पुन्हा सुरात ऐकू येऊ लागतात, आणि आयुष्याचा तालच बिघडतो.. आठवणी उन्मळून येतात उगाच! खरं काही कारण नाही!

एक वर्षं झालं ही जागा ते सोडून गेले त्याला...

मांजरपाट आणि कात्री दोन्ही चांगले शाबूत असताना मला कसे विसरले ते, देव जाणे! अजूनही संवाद घुमतात कानात.. माझ्यावर उभ्या राहिलेल्या नाटकाच्या अनेक properties, दरवाजे, खिडक्या.. सगळं आठवतं.. पण दुःख व्यक्त करण्यासाठी माणूस मिळायलाही भाग्य लागतं.. ते नाही आमच्या नशिबात!

त्यांनी काय.. माझ्याऐवजी दुसरी level आणली असेल माझ्या जागी ! एका level च्या replacement ने असा कितीसा फरक पडणारे त्यांना.. असो..

हा पत्र्यावरून जसा थेंब पडला ना, तशी सहजता पाहिजे आयुष्याला, असं वाटतं मला कधी कधी..! म्हणजे, कशाचं दुःख नाही, लोभ नाही, राग नाही, द्वेष नाही! मनात धरून ठेवायचं नाही काही! सगळं प्रवाही! सहज! जसं होईल तसं!

पण नाही जमत तसं.. जाऊ देत...

त्या दिवशी इथलं सामन गाडीत भरताना मला बाहेर आणलं.. पण गडबडीत गाडीत भरायचंच विसरले! तेव्हापासून इथेच आहे मी.. अशीच एक अडगळ म्हणून

पडलेली... रोज वाट बघते.. आज येतील आणि मला घेऊन जातील.. पण आताशा या पावसाशिवाय माझी विचारपूस करायला इथे कोणीही येत नाही.. सगळं शांत.. भकास.. असो!

ज्याचं दुःख, ज्याचं त्यालाच भोगायचं असतं.. !"

पुन्हा काही थेंब टपटप करत जमिनीवर पडले..

तेवढ्यात काही शब्द कानावर आले...

"बघ.... तुला म्हणत होतो मी... इथेच असणार ती level.. किती कुजलंय बघ लाकूड पावसामुळं.."

"हं म्, हो रे ! चल घेऊन जाऊ पटकन म्हणजे मग पुढची practice सुरू करता येईल..."!

आणखीन एक थेंब. थोड्या अधिक समाधानाने पत्र्यावर जमा झाला.

टप.. टप.. टप...


Rate this content
Log in

More marathi story from Ashutosh Purohit

Similar marathi story from Romance