Uday Mane

Horror

3  

Uday Mane

Horror

त्रिकोणी चंद्रग्रहण भाग-1

त्रिकोणी चंद्रग्रहण भाग-1

18 mins
274


भूत आहे नाही या वादात मला जायचं नाही.. माझी कथा फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी आहे.. बाकी कोणताही हेतू नाही. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ कथेतील गरज म्हणून काही गोष्टींचा व ठिकाणाचा उल्लेख केला गेला आहे.लक्षात घ्या माझा उद्देश फक्त आणि फक्त मनोरंजन आहे..कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा कोणाला घाबरवायचा हेतू नाही..


डोगरला लागून सुरुर हे गाव.वाई पर्वताच्या पायथ्याशी असल्याने सगळा परीसर हिरवागार होता.गावला तशी देवाने निसर्गची देणगी भरून दिली होती.एक बाजूने नदी असल्यामुळे चारी बाजूने हिरवीगार शेतीचे मळे, रंगीबेरंगी फुले आणि गोडसर फळे.पावसाळ्यात धो-धो कोसळणारा पाऊस आणि हिवाळ्यात कडाक्यची थंडी. गावात साधारण २००-२६० घरे आणि गावच्या वस्तीपासून थोडे दूर मानेंचा शानदार मोठा वाडा अतिशय दिमाखात उभा असतो. पुर्वीच्या काळातील कोरीव दगड आणि मातीतिल बांधकाम. वाड्याच्या आजूबाजूला घनदाट झाडे होती. वाड्यामध्ये गगन माने आणि बबन माने यांचे कुटूंब राहत होते. गगन माने आणि बबन माने प्रत्येकी एकच मूल होते.गगन माने हे मोठे भाऊ होते.ते एक चांगले सामाजिक कार्यकर्ते होते.ते महिलांच्या सबलीकरणासाठी आणि मुला-मुलींच्या शिक्षणासाठी अहोरात्र झटत.

 

बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी केलेले महिलांचे मजबूत संघटन, पंचायत समिती, जिल्हा परिषद व विविध शासकीय कार्यालयातून रखडलेल्या नागरिकांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी आयुक्‍त, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, व विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देवून, प्रत्यक्ष भेटून त्यांनी अनेकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करायचे.होतकरू गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करत


गावाच्या भल्यासाठी दिवस रात मेहनत करत त्यांनी गावामध्ये दवाखाने आणि प्राथमिक शाळा हि सुरू केल्या होत्या. अतिशय भले माणूस होते आणि गावात खूप मान होता. आजची रात लक्षात ठेवण्यासरखी होती. कारण हे की ७१ वर्षातील सर्वात मोठं चंद्रग्रहण दिसणार होते. हा ग्रहणचा तब्बल १ तास ४३ मिनिटचा कालावधी होता.कारण की चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या अगदी मध्यातून जाणार असल्याने हे चंद्रग्रहण सर्वात मोठं असणार होते. व चंद्र एका विशिष्ट स्थानात असताना पृथ्वी सूर्यापासून अगदी दूरच्या बिंदूवर जाणार होती. त्यामुळे पृथ्वीची चंद्रावर जास्त मोठी सावली पाडली जाणार होती.हे चंद्रग्रहण जगात सगळीकडून पाहता येणार नव्हते. पण ज्या मोजक्या देशातून ग्रहण दिसणार आहे त्यात भारताचा समावेश होता.संपूर्ण जगाचं लक्ष लागून होते.त्यापेक्षा जास्त लक्ष अमानवी शक्ती चे कारण चंद्रग्रहानाचा जास्त प्रभाव त्याच्या अमानवी शक्ती वर पडतो.


तब्बल ७१ वर्षांनी ब्लू मून, ब्लड मून आणि सुपरमून हा त्रिकोणी चंद्रग्रहण संगमची वेळ आकाशांत चंद्रग्रहणाची डोळ्यांचे पारणे फेडणारी दृष्ये दिसत होती.

वेळ घड्याळात रात्रीचे साधारण ११.३० वाजले असतील. कुत्रे , रात्रकिडे,कोल्हे असा कोणाचाही आवाज येत नव्हता , सगळीकडे भीषण शांतता पसारली होती आगदी हृदयाच्या ठोका स्पष्ट ऐकू येत होता. वसंत ( गगन मानेचा मुलगा ,वय १० वर्ष ) अचानक झोपेतून दचकून जागा होतो. पूर्णेपणे घामाने ओला झालेला तो काहीतरी भयंकर पाहिलं असल्यासारखे भीतीने तो झागा झालेला होता. खर म्हणजे त्याला स्वप्नात काय पाहिलं हे अजिबात आठवत नसतं. आणि झोपेतून उठून तो स्वंयपाक घरात जावुन मटक्यातील गार पाणी पिला. अचानक त्याला बाहेर चाहूल जाणू लागली तसा तो वाड्याबाहेर पडला.


थंडगार हवेची झुळूक आणि आकशातील त्रिकोणी चंद्रग्रहण पाहून तो हरपून गेला होता. रस्ता सामसूम होता. अचानक त्याला विजेचा कडकडात ऐकू येतो पण हा रुतृ पावसाचा नाही व तसी पावसाची काहीच चिन्ह दिसत नव्हती. त्याला खुप नवल वाटते. जोराचा वारा सुटू लागतो. जमीनीवरील माती व झाडाची पाने हवेत उडू लागले व वाराचे रूपांतर आता वादळात होऊ लागले. त्या वादळाचे तोंड जमणिकडे व शेपूट आकाशाकडे होते. त्याचे डोळे समोरील दृश्य बघून मोठे होतात.त्या वादळाच्या दोन्ही बाजूने वीज चमकत होती व वादलामधून आगीचे गोळे बाहेर पडत होते.नकळत तो वादलाच्या दिशेने चालू लागतो व वादालामध्ये ओडला जातो.आकाश व जमीन मधील पोकळया जागेत जाऊन पडतो.ती जागा ना देवाची ना माणसाची ती जागा होती फक्त सैतानाची ,त्याला कळून चुकले होते की आपण सैतानाच्या वस्तीत आलो.तो पटकन एक ढगामागे लपून बसतो व पुढील जे चालू आहे बघू लागतो. तिथे एक बाई आंघोरी यज्ञ करत होती.तीच्या आजूबाजूला अनेक प्राण्याचे मुडॆ पडलेले होते व ती जोरजोरात मंत्र बोलत होती व आगीचे मोठं मोठे गोळे उडत होते.दुसऱ्या बाजूला तीन सैतान व दोन तेजस्वी पुरुष( देवदूत) मथ्ये घमासान युद्धध चालू होते. देवदूताचा गदा व सैताची तलवार एकमेकार धनाधान आपटत होत्या व त्यातून आगीचे ठिपके उडत होते. अधून मधून सैतान आगीचे गोळे भेकत होते . देवदूत मोठया हुशारी ने वाचवत.त्यातील एक सैतान - समीरा लवकर पूजा कर आम्ही जास्त वेळ नाही लढू शकत आपल्याला मालविष ( सैतानाचा राजा )ला लवकर या दुनियेत परत आनायचे आहे.


इकडे आगीतून माळविष चे एक खनजिर बाहेर येते. ते बघून त्यातील एक देवदूत दुसऱ्या देवदूतलाबोलतो- जा तू थंबव तिला नाहीतर मोठा संकट परत येईल जा मी एकटा लढतो त्यातील दुसऱ्या देवदूत पळत जाऊन पुजातील साहिते फेकू देतो व संपूर्ण पूजा तो मोडतो परत जाऊन सैतान बरोबर युद्ध चालू करतो मग दोघे मिळून एक एकला पकडून रुद्राक्ष माळा घालतात व सर्व सैतानाला एका पेटीत कैंद करतात. मग ते दोहे समीरा कडे जाऊ लागतात इकडे समीरा परत पूज्याचे साहिते गोळा करत होती त्या दोघांना बघून ती घाबरते व बोलते मला माफ करा मी एक बाई आहे. दुसऱ्या देवदूत बोलतो चल निघ येतून बाई आहे म्हुणून सोडून देतो तुला. पण तिच्या मनात वेगळाच खेळ चालू होता. तीने आपला उजव्या हातात मालविष चा खनजिर पाठीमागे लपवून ठेवलेला होता. दुसऱ्या देवदूताच्या जवळ जाऊन देवदूतच्या पोटात खनजिर खुपचते आणि वेड्यासारखं हसू लागते. तोच दुसऱ्या देवदूत तीच्या डोक्यवर गदाने वार करतो, त तसे तिच्या डोक्यातून प्रचंड रक्त वाहू लागते पण मारताना ती वेड्यासारखं हसून प्राण सोडते. देसऱ्या देवदूत पहिल्या देवतुला बोलतो- जातो गुरुजी माझी वेळ संपली. दुसरा देवदूत हवेत विलीन होतो.


इकडे सैतांन पेटीमधून हसू लागत व बोलतात तुझी पण वेळ संपत आली आहे पुढच्या त्रिकोणी चंद्रग्रहण ला मग कोण रोकू शकतो माळविष ला या जगात येण्यापासून

(एक देवदूतचा कार्यकाळ ५०० असतो व तो आपल्या कार्यकाळ संपणाच्या यात आपली शक्ती दुसऱ्याला देत असे आणि

पहिल्या देवदूताच कार्यकाळ ४७५ झाला होता व दुसरा मरण पावलेला )

अचानक वसंतच्या कानावर एक आवाज आला या वसंत माने तसा तो आवाज ऐकून उभा राहतो

वसंत - कोण तुम्ही आणि माझे नाव माहित कसे काय?

देवदूत - मी देवदूत आहे आणि सैतानी शक्तीला रोखनाचे देवाचे कार्य मी करतो, आता माझे वय झाले असून या कार्यसाठी तरुण देवदूत शोधात आहे.

वसंत काही बोलणार तोच त्याला तीन भुतांचा आवाज ऐकू येतो

तीन भुते - त्या म्हताऱ्याचे नको ऐकू त्याकडे काही शक्ती उरलेली नाही. तुला इतकी शक्ती देऊ कि तू सर्व दुनिया आपल्या बोटावर ठेवशील. हाहा हीही भुते मोठ मोठनि हसू लागतात.( एका बंद पेटीमधून आवाज येत असतो आणि त्या पेटीला मंतरलेला धागा व त्रिशूल बांधलेले होते व त्यावर काही सांकेतिक खुणा होत्या)

देवदूत- वसंत नको जाऊ त्याच्याकडे ते तुझा वापर करून घेतील आणि सैतानाला या जगात परत आणतील.

पण वसंत पेटीच्या दिशेने जाऊ लागतो व वाटेतील मालविष चे खनजिर उचलतो. त्याला तीन भुताचा आवाज जास्त आकर्षित करत होता.

तीन भुते- हा हा हा हिईई हो हो हिईईई लवकर मुक्त कर आम्हला या पेटीतून मुक्त कर आणि तयार हो जगाचा राजा बनायला. लवकर लवकर हिईईई हि हि

देवदूत - मी जिवंत असे पर्यंत हे भुते कधीहि मुक्त होणार नाही.

देवदूत रागाने आपल्या हाता मधील गदा फिरवू लागतो तसे गदेतून निळसर प्रकाश दिसू लागतो तो निळसर प्रकाश वसंत कडे जेपावून बोलतो जा इथून तू ती शक्ती घेण्याच्या लायक नाही तशा वसंत खनजिर बोरोबर दूरवर फेकला जातो आणि तो एका दगडावर जाऊन पडतो आणि त्याच्या कमरेचे हाड मोडते.

तीन भुते - ये म्हताऱ्या किती दिवस कैद करशील हिईईई हिईईई

देवदूत - अरे देवा माझा कार्यकाळ संपण्याच्या आत नवा देवदूत पाठव .

इकडे वसंतच्या शोधात त्याच्या घरचे निघतात काही तासानंतर वसंत त्यांना बेशुद्ध सापडतो . तसे त्याला वडील व काका त्याला दवाखान्यात नेतात , डॉक्टर त्याचावर उपचार करतात पण त्याचा कमरे खलचा भाग कायमचा निकामी झालेला होता.


यानंतर  २५ वर्षांनी होणारं चंद्रग्रहण मागील ग्रहणापेशा सर्वात मोठं असणार होत.

वर्षेनुवर्षे उलटून गेली.... २५ वर्षाचा काळ ही उलटून गेला..

गोड गुलाबी थंडी, दाट धुके मस्त प्रसन्न सकाळची वेळ ( स्थळ- मुंबई) प्रेमाची कबुली देताना लवाचे हात कापत होते; पण अखेर मोबाइलवर शब्द टिपले गेले " माझं तुझ्यावर प्रेम आहे !"पण करणार तर काय त्याच्याकडे फोन नंबर नसतो.

लव जसा शांत , हुशार आणि दयाळू मूलागा होता.

रंग सावळा , मध्यम उंची , काळे डोले लव दिसायला अगदी सामान्य होता पण चेहऱ्या वर अनोखे तेज होते.

आज पण तो सारा ला नेहीप्रमाणे कॉलेजच्या कट्टयावर बसून कॉलेजच्या गेट मधून आत येताना तिरकस नजरेने पाहत होता. सारा दिसायला अतीशय देखणी , गोरा रंग , लांब सडक केस अगदी कमरे पर्यत , घारे डोळे , धारदार नाक

जणू परी आहे असे वाटे.


कॉलेज म्हंटलं की मजा -मस्तीच्या फुलपाखरांना हवेत झेपावण्याचं ठिकाण. कॉलेज जीवनात कोणी न कोणी ती किंवा तो असतेच, वयच असते ते, काही लोक त्याला प्रेम समजतात, काही लोक आकर्षण. तसेच लव बद्दल होत .

चोरून पाहणे बस तिथ पर्यंतच त्याची मजल होती.

उमेश,संदेश,अमोल,वीणा आणि नीलिमा असा चांगला ग्रुप होता लवचा.

ग्रुप कँटीन मध्ये बसलेले होता. कॉलेजियन्सचा सॉफ्ट कॉर्नर आणि हक्काचं ठिकाण म्हणजे कँटीन. कँटीन कट्ट्यावर येण्यासाठी वेळ लवकर संपत नाही आणि एकदा का कट्ट्यावर आलं कि वेळ कधी संपते हेच कळत नाही. चहा, वडापावच्या पार्ट्या, मैत्रीची मज्जा, मस्करी,

एकमेकांची टोपणनावं, लेक्चर बंक करण्याचे प्लॅन्स यांपासून सुरु होणारं ते दोन जणांचं अफेर सुरु होण्यापासून ते ब्रेकअपपर्येंत आणि ब्रेकपासून पुन्हा पॅचअपपर्येंत सारं काही  याच कट्ट्यावर होत असत.


मुली नेहमीप्रमाणे गप्पा मध्ये रमल्या होत्या. आणि मुले स्कॅनिंगचे काम चालू असते, हा हा म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या मुलींकडे बारकाईने पाहत होते. चला आपण लवच्या मित्राची ओळख करून घेऊ. संदेश त्याचा स्वभाव अगदी विनोदी पण तो दोस्तीसाठी वेळ पडल्यास मागे पुढे न पाहणारा. उमेश आणि वीणा हे love Bird त्याचे कधी कसे जुळले कोणालाच माहीत नव्हते अमोल हा अतिशय लाजळू मुलगा होता व त्याला नीलिमा खूप आवडत असे. शेवटी नीलिमा अतिशय हुशार ,सुंदर आणि collage Topper होती व तिला लव आवडत असे

( सारा-लव, अमोल-नीलिमा कि लव- नीलिमा बघू पुढे कुणाची बोट किनाऱ्याला लागते)


लव कँटीन मध्ये येतो तसे सगळे उभे राहतात आणि बोलू लागतात या साहेब आसनं ग्रहण करा काय सेवा करू आपली. नेहीप्रमाणे लव नकली हसतो आणि पुढे बोलतो संदेश झाली का scanning करून

संदेश- मुली सुंदर का दिसतात मेक अप मुळे छेछे

चांगल्या कपड्यांमुळे तर नाहीस. तर मुली सुंदर का दिसतात त्या,मुलांच्या चांगल्या कल्पना शक्तीमुळे.😊😊

सगळे हसू लागतात.

वीणा - मग संदेश कधी आणतोय वहिनि.

संदेश- मुलगी बरोबर असेल तर भरा हॉटेल बिल, जणू हे खा ते खा किती बारीक झाली आहेस तू , तू काही खातच नाही

मुलगी लांब असेल तर मोबाईल बिल आणि बसा रातभर बोलत आणि मुलीने Break up केला की पीत बसा दारू

म्हणून सांगतो प्रेम करू नका.माझं बर आहे एकटा जीव सदाशिव.

उमेश- कोल्हाला द्राक्ष आंबट.

संदेश- बघ वीणा काय बोलतोय मुलींना , द्राक्ष ?

वीणा- जाऊ दे संदेश तो लकी आहे त्याला मी भेटले.

उमेश -मला समोरच्या गल्लीत राहणारी पिंकी खूप आवडते, पण मी शेजारच्या वीणा शी लग्न करणार. कारण कि माझी आई नेहमीच मला बोलते रस्ता पार करून पलिकडे नाही जाणार तू.

वीणा- काय उमेश काय बोलला.

उमेश- वीणा I am just joking जाणू

लव- काय मग कालचा गणिताचा पेपर कसा गेला मित्रानो.

सगळे जण- मस्त

संदेश- फक्त एक मार्क कमी मिळलेलं

लव- अरे वा मस्त

संदेश- १०० मधील एक कमी म्हणजे ०० मार्क हाहा😊☺️

असे मस्त कॉलेजचे दिवस चालू आसतात.


इकडे वसंत च्या घरी

अपंग झाल्यामुळे वसंत व्हील चेअर बसून होता. वसंत चे डोळे रातभर जागत असल्यामुळे नेहमी लाल व पापण्या काळसर झाल्या होत्या. त्याने आपल्या खोली मथ्ये पाच दरवाजे बनून घेतले होते . तो त्या दरवंजार आपल्या नखाने जे त्यानी 25 वर्षांपूर्वी पाहिलेल्या सांकेतिक ( सैतानाला कैद केलेल्या पेटवरील सांकेतिक खुणा )ओरबडत असे आणि आपल्या रक्तनी रंगवत बसे व सतत बडबड असे हो मीच आहे खरा वारस मी आणि मीच ह्या जगाचा राजा बनणार.

आपल्या मुलाचे हाल गगन मानेना बघवत नसे त्याना सारखे रडू कोसळले त्यानी वसंत च्या उपचारासाठी खूप रुपय खर्च केले अगदी त्याला उपचारासाठी परदेशी पण गेले व अनेक नवस हि केला पण वसंत मध्ये काही फरक पडला नाही.

मग त्यानी आपला सगळा कारोभार समीर कडे देणे चालू केले ( बबन मानेचा मुलगा व वसंतचा चुलत भाऊ )


परत कॉलेज कडे

इकडे संदेश पिकनिक चा प्लॅन करतो , सगळे जण कँटीन मथ्ये जमलेले असतात.

संदेश- या वर्षी आपण हिवाळी पिकनिकला वाई ला जाऊया

अतिशय छान ठिकाण आहे पिकनिक साठी मग काय मंडळी जाऊ का वाई ला

सगळे होकार देतात

उमेश - अरे लव विहिनी ला पण आन पिकनिक ला

लव - कोण वाहिनी ?

वीणा- मुलगी मुलावर प्रेम करते तेव्हा ते त्या मुलीला सोडून कोणालाच माहित नसते,आणि मुलगा मुलीवर प्रेम करतो तेव्हा ते त्या मुलीला सोडून बाकी सर्वाना माहित असते

आपला माहीत आहे की तू लव सारा ला लाईक करतो ते.

लव लाजतो आणि मान खाली करून हसतो.

नीलिमा- मी घेऊन येईल तिला पिकनिकला माझी शाळेतील फ्रेंड आहे ती नाही बोलणार नाही मला

बिचारी नीलिमा आपल्या प्रेमाचा अंत स्वतः करीत होती बहुतेक तिला आपल्या ख़ुशी पेशा लव ची ख़ुशी जास्त प्यारी होती,खरं‬ प्रेम तर प्रत्येकाच्याच .ह्दयात असत.पण दुःख याचं आहे की ते प्रत्येकाच्या नशीबात नस.


लव पिकनिक साठी तवेरा ठरवतो.सगळे जण पीकनिक साठी दादरला जमा होतील हे ठरले. रस्त्याने खाण्यासाठी लागणारा खाऊ संदेश व पाणी उमेश घेऊन येईल हे ठरते.योजने प्रमाणे सर्वे जण दादरला जमा होतात मग चालू होत पिकनिक ( येथे सर्वांसठी पिकनिक चालू होतो पण लव साठी आयुष्य बदलून टाकणारी वेळ चालू होते)


वसंत च्या घरी

अखेर ती रात्र आली तिची वाट तब्बल २५ वर्षांपासून वसंत बघत बसलेला होता. आज त्याचा चेहऱ्यावर आनंदी भाव दिसून येत होते. तो पाच दरवाज्या समोर बसेलेला असतो त्या घरात संपूर्ण अंधार असतो आणि त्यानी प्रत्येक दरवाज्या काही अंतरावर मागे व पुढे पाच आणि डाव्या व उजव्या बाजूला दोन आरसे बसून घेतलेले होते. बरोबर रास्त्रीच्या १२ ठोकल्या त्रिकोणी चंद्रग्रहनाचा (ब्लू मून, ब्लड मून आणि सुपरमून) मंद प्रकाश खिडकीतून पहिल्यादा डाव्या व नंतर उजव्या आरसावर उमटतो. डाव्या आरसावरील त्रिकोणी चंद्रग्रहनाचे किरणे दरवाज्या मागील पाच आरसावर परिवर्तीत होतात आणि उजव्या आरसावरील किरणे पुढील पाच आरसावर हळूहळू परिवर्तीत होतात व संपूर्व घर मंद चंद्रग्रहनाच्या प्रकाशात उजळते. १२ ही आरसे आता चमकू लागतात. व त्यांची चकमक पाची दरवाजावर पडू लागते . वसंतने पाची दारवाजवर काही सांकेतिक खुणे ( पाची दारवाजवर सांकेतिक खुणा सारखा असतात पण त्याची मांडण्याची क्रमवारी वेगवेळी असते) काढलेली असतात व आपल्या रक्तने रंगवलेली असतात.

त्यातील एक दरवाजा त्याला त्या पोकल्या जगात घेऊन जाणार असतो जिथे सैताणाचे राज्य असते. चोथ्या दरवाजातून थंडगार हवा व धुके बाहेर येऊ लागते, वसंतने चोथ्या दरवाजाला हात लावतात दरवाजा संतानाच्या जगात खुलतो. वसंत आपल्या बरोबर जाताना माळविष ची खनजिर  घेतो व ती आपल्या मांडीखाली लपवतो.वसंत सैतानाच्या जगात प्रवेश करतो. देवदूत वसंतला बघून बोलतो हे असं शक्य आहे तू येथे कसा आलास

वसंत - कसा आलास हे महत्वचे नाही तर का आलास हे विचारा.

देवदूत - का आलास आहे हे मला माहित आहे पण तू त्या शक्तीच्या लायक नाहीस तुझा तुझ्या मनावर ताबा नाही त्यामुळे तू त्या शक्तीच्या वरास नाही होऊ शकत.

दोहा मध्ये खूप वेळ शाब्दिक वाद चालतो इकडे देवदूत खूप

रागावतो व आपली गदा फिरवू लागतोच वसंत बोलतो नको देवदूत परत नका करू माझावर गदा प्रहार मी निघतो येथुन. देवदूत शांत होतो व आपली गदा खाली ठेवतो

वसंत आपल्या व्हील चेयरवर हात फिरवून मागे वळतो व दरवाज्या दिशेने जाऊ लागतो त्याच वाटेर डाव्या बाजूला सैतानाला कैंद केलेली पेटी असते.लगेच वसंत आपल्या मांडीखालिल मालविष ची खनजिर काढतो व पेटीला लक्ष्य करतो. खनजिरच्या वारने पेटीवरील लावलेले मंत्रीत आवरण तुडले जाते आणि तीन ही सैतान मुक्त होतात. चवताळले सैतान पटापट आगीच्या गोळ्यांचा वर्षव देवदूत वर करतात. अचानक झालेल्या आक्रमांनामुळे देवदूत जबर जख्मी होतो व आपल्या सिहसनावर कोसळतो. सैतान देवदूतला ठार मारण्यासाठी त्याच्या सिहासनाकडे येऊ लागत तोच त्याना विजेचा जटका बसतो. सिहसनावर हनुमानाची मूर्ती कोरलेली असते.

तीन सैतान - आरे म्हताऱ्या आमच्या हातून नाही मेला तर काय झाले तरीपण तुझा अंत आज होणार आहे. तुझा कार्यकाळ ( ५०० वर्ष ) आज संपणार आहे .

तीन सैतान मागे वळून वसंतकडे जातात व बोलतात मालविष खूप खुश होईल तुझावर व तुला महान शक्ती देईल.

सर्वे सैतान वसंतच्या शरीरात प्रवेश करतात आणि भूलोकात पाचरण करतात.

थोडे मागे जाऊया - पिकनिक - सकाळची वेळ तवेरा दादर मधून निघते.

तवेरा मध्ये मधील सीटवर लव , सारा आणि नीलिमा , मागील सीटवर उमेश आणि वीणा व ड्रायवर च्या सीटवर संदेश व त्याच्या बाजूला अमोल बसलेले होते.

लव - सारा कशी वाटते आमची कंपनी.

सारा - मला असं वाटतंय कि मी खूप एन्जॉय करेल ही कंपनी.

संदेश ड्रायवर च्या मिनिरमधून नीलिमाला खुणावतो तशी ती समजते.

नीलिमा सारा ला लव बदल चांगल्या व गमतीदार गोष्टी सांगते एक प्रकारे ती लव व सारा चे प्रेम जुळवून देण्यास लव ची मदत करते.

नीलिमा-लव कडे बघून ( आपल्या मनात बोलते )मी जे हरवले,ते कधीच माझे नव्हतेच पण तू जे हरवलेस ते फ़क्त तुझेच होत.

तेवड्यात तवेरा एका खड्यात खाडकन आदळली, आणि तसा साराने आधारासाठी लवचा हात पकडला ..रस्त्या वरील खड्यांचा आणि आपल्या सरकारचा लव ला त्या वेळी खूप भयंकर अभिमान वाटला.

काय मग.जैसे डाग अच्छे होते हे, तैसे खड्डे पण अच्छे होते हे.काय म्हणता.लव उगाच गंमत म्हणून साराला बोलला.

वाईट होता .दोन शब्दांत तिने लव च्या सेन्स ऑफ ह्युमरची वाट लावली होती.पण थोडस स्मित तिच्या चेहऱ्यावर आरूढ झालं होतं.चेहऱ्यावरील स्मिताने तिचा चेहरा खुलवलेला होता. खिडकीतून वारंवार आत येणाऱ्या सूर्यकिरणांनी तिच्या डोळ्यांची सारखी मिणमिण सुरू होती. सुंदर हा शब्दही कमी पडावा इतकी सुंदर ती दिसत होती.

तवेरा मध्ये मोठा आरडाओरडा, गोंधळ, हास्यविनोद चालू होता पण लव शांत होता.

काय झालं तू इतका शांत का.

सारा ने अचानकच बोलायला सुरुवात केल्यामुळे लव जरासा दचकला.आणि ती खुदकन हसली.

अरे वा खूप सुंदर हसता की तुम्ही.लव हसतच साराला म्हंटला का मी हसू शकत नाही का ती जरा डोळे मोठे करतच बोलली.रमत गंमत तवेरा वाईला पाच सुमारास पोचते. रात्रीचे जेवण करून त्रिकोणी चंद्रग्रहनाचा पाहण्याचा प्लॅन ठरतो. तसे सर्व मंडळी जेवण करून घरा बाहेर पडतात.संपूर्ण जगाचं लक्ष लागून असणारी ग्रहणाची रात आज होती.

 दिवसभर चांगलं कडकडीत उन होतं पण अचानक रात्री

ढग दाटून आले आणि एकाएकी विजेच्या कडकडाटासह धुवांधार पाऊस सुरु झाला.सगळे जण पावसात भीजण्याचे ठरवतात.

भर पावसात लव साराला म्हणतो मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे. ते ऐकून दोघेही एका झाडाखाली थांबतात..

सारा ( त्याच्याकडे पहात) हा बोला ना मला जाणवतंय कि तुला माझ्याशी काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे.

लव: ( किंचित सावरत सराचा हात हातात घेत ) सारा l love you. do you love me?

सारा : ( लाजून मुद्दाम) पिकनिक झाल्यावर सागते.


पण तिच्या चेहऱ्यावरील भाव सगळे काही सांगतात होते.

थोड्यावेळ पावसात भिजून झाल्यानंतर सगळे जण परत हॉटेल कडे जाऊन लागतात.

दिवस भरच्या गमती जमतीमुले सगळेजण खूप थकतात व लवकर झोपी जातात.लव आज साराला भेटल्या व बोलल्यामुळे खूप आनंदी असतो. तीच्या गोड आठवणीत रमून जातो व तिच्या गोड स्वप्नांत बुडून जातो.

साधारण १२:४५ सुमारास लवला एक चांगले स्वप्न पडले होते. त्याज्या स्वप्नात ते गृहस्थ आले होते.. कोणी ओळखीचेच होते वाटत .. तो त्यांना ओळखत होता पण त्याला आठवत नव्हते नक्की कोण आहेत पण असं वाटतं होत की खूप वर्षाची कोळख आहे. 

गृहस्थ - या लव पाटील

लव- मी येथे कसा आलो हे स्वप्न आहे ना

गृहस्थ- तू स्वन्पतच आहे पण जे तुला दिसत आहे किंवा होत आहे ते तुझे संपूर्ण जीवन बदलून टाकणारे सत्य आहे.

लव- स्वन्प आहे व खरे घडत आहे ( लव हसू लागतो )

गृहस्थ - हसन्यावर नेऊ नकोस मूर्खां हे देवा चे कार्य आहे

लव - देवाचे कार्य म्हणजे?

गृहस्थ- भूलोकला सैतानापासून रक्षण करणे व भूलोकात शांतता पसरवणे आणि गरजू लोकांची मदत करणे हे कार्य

लव- सैतान असतात? पण मला वाटत आहे की ह्या कार्यसाठी मी योग्य नाही

गृहस्थ- ठीक आहे तर बाजूला पडलेल गदा मला उचलून दे

( लवने ती गदा उचलून देवदूतला देतो )


गृहस्थ- हो तू आहे खरा हक्कदार या शक्तीचा कारण ही गदा फक्त नेक व चांगले चारित्र असलेला माणूसच उचलू शकतो.

लव- तसे असेल हि पण मी तयार नाही हा कार्यसाठी, मला माझे जीवन फक्त माझा परिवार आणि मित्रानंसाठी आहे.

गृहस्थ - हा मला मान्य आहे पण आज माझ्या कार्यकाळचा शेवटचा दिवस आहे व शक्ती आज जर मी हस्तांतरित नाही केली तर माझ्या बरोबर हा शक्तीचा अंत होईल.तुला जर वाटले तर वापर कर नाहीतर तु पण ही शक्ती हस्तांतरित करू शकतो.

लव - असे असेलतर ठीक आहे मी तयार आहे.पण ह्या शक्तीचा वापर अश्यासाठी करायचा आहे.

गृहस्थ - वेळ आल्यावर तुला समजेल त्या शक्तीचा वापर कसा कराचा आहे.ते कुणि तुला सांगू व शिखवू शकत नाही.

चल गदावर हात ठेव व डोळे मिट आणि तयार हो शक्ती घेणास.देवदूत मधून तेज निघून लव मध्ये सामावून जाते व देवदूत हवेत विलीन होतो.

लव दचकून जागा होतो बाबरे किती विचत्र स्वप्न होते परत झोपी जातो.येथे बाहेरील वातावरण आता पूर्णपणे शांत होते.सर्व मित्र झोपलेले बघून वीणा व उमेश एकांत व रोमांस साठी घरा बाहेर पडतात . नेमकाच मुसळधार पाऊस अलगद शांत होऊन थांबला होता. झाडावरील पावसाचे पाणी टीप टीप जमिनीवर प्रहार करत होती.पांढरशुभ्र चांदण्यात सगळ काही स्पष्ट आणि स्वच्छ दिसत होत.गर्द दाट झाडी, वा-याच्या प्रत्येक झोक्यावर डोलणारी आंब्या, चिंचेची झाडे, त्यांवर चमचमणारी, प्रकाशाचा खेळ करणारी लखलखणारी काजव्यांची माळ, किर्र्र किर्रर्रर्र किर्रर्रर्रर असे आपापसात संवाद साधणारे रातकिडे,हवेतील गारवा व एकांत पाहून दोहे हि आतुर होतात मिलनासाठी. अचानक आकाशात ढग आले. चंद्र ढगा आड गडप झाला. चांदणं अचानक नाहीस झाल. एकदम अंधारुन आले आणि जोराचा पाऊस सुरू झाला. त्यांनी पावसापासून बचाव म्हणून जवळच्या पडक्या मंदिरात आश्रय घेतला. बराच वेळ वाट पाहिली त्यांनी पण पाऊस काही थांबेना. शेवटी पावसाचा अंदाज घेत ते बाहेर पडले. पण थोडे पुढे गेल्यानंतर त्यांना काही समजेना कि आपण कोठे चाललो ते. काळोख. त्यात सपाटून पडणारा पाऊस. त्यामुळे ते दोघे भांबावून जातात आणि एका झाडाखाली उभे राहतात.

 वीणा चाहूल लागते कि कोणीतरी आपल्याकडे बघत आहे. तसी ती झाडावर बघते तर वसंत फांदीवर बसलेला होता त्याला बघून ति जोरात किंचालते. त्याचे रूप बघून उमेश व वीणा खूप घाबरतात.


वसंतच्या शरीरातून तिन्ही सैतान बाहेर पडतात व वीणा आणि उमेश वर जडप मारतात, त्याच्या मानेचे लचके तोडतात व रक्त पिऊ लागतात. सैतानाच्या तोंडाला आता रक्त लागलेले असते व त्याची रक्तची भूक आता वाढतच राहणार. वसंत आपल्या शरीराकडे बघत बोलतो आता मी खुप शक्तीशाली बनलो आहे व कुणी माझ्यापुढे ठिकू शकत नाही त्यातील एक सैतान आपल्या चेहऱ्यावरील रक्तचें ठिपके जीभेने चाटत बोलते देवदूतला त्याचा वरास भेटला आहे व तो तुज्यापेक्षा जास्त शक्तीशाली आहे. पण त्याने आपल्या

शक्तीचा वापर केला नाही व त्याला स्वतःच्या शक्तीची क्षमता माहित नाही.त्याला समजण्या आदी त्याचा खेळ संपवायचा आहे.

इकडे सगळे मित्र उमेश , वीणा व सारा ला शोधू लागतात.गावाच्या टेकडीवरील गर्दी बघून सगळे टेकडीवर जातात.पोलीसाचा पंचनामा चालू असतो.वीणा व उमेश चे बेजाण शरीर बघून सगळे मित्र रडू लागतात. पोलीस त्याची सही व त्याकडे वीणा व उमेशशी माहिती घेऊन वीणा व उमेश शरीर पोस्टमोटमसाठी पाठवून देतात.पण सारा चा शोध काही केला लागत नसतो.साराची मिसिंग केस नोंदवली जाते. दोन दिवसा नंतर सगळे जण मुंबईला रवाना होतात.


एक हप्ता नंतर

लव बस स्टँडवर विचारांमध्ये मग्न असतो. वीणा व उमेश चा खून कोणी केला असेल व का आणि सारा कुठे व कशी आहे. तेवढात नेहमीची बस समोवरून निघून जाते. लव बस पकडण्यासाठी बस मागे पळू लागतो. लवला बस मागे पळताना बघून बस ड्रावर बस तासी 60 km वेगाने चालू लागतो. लव ती बस पकडतो ते बघून बस ड्रावर चकित होतो. कॉलेजचे बस स्टँप येते तसे लव बस मधून उतर असताना बस ड्रावर तुम्ही धावपटू आहे का ? ,लव बोलतो नाही .बस ड्रावर बोलतो तूम्ही तासी 60 km वेगाने धावणारी बस कसी पकडली. लव काही न बोलता बस मधून उतरतो.

संदेश लव ची वाट बघत नारलाच्या बागेत उभा होता.

लव नारलाच्या बागेतून चालत असताना आचनाक एक नारळ लव डोक्यात पडतो व त्याचे दोन तुकडे होतात. हे बघून संदेश लवकडे धावत जातो व लव चे डोके बघतो तर काय लवला साधे खरसटले सुधा नसते.संदेश लवला बोलतो तू खूप स्ट्रॉंग आहेस

लवच्या लक्षात येते की ते स्वप्न नसून खरे आहे व आपल्या पडलेले स्वप्न व बसच्या मागिल धाव ही सर्वी हकीकत सांगू लागतो. संदेश ऐकून गोधळतो व चकित होतो.

लव- आता पुढे काय व मला काय देवकार्य करायचे आहे हे सुद्धा मला माहित नाही.

संदेश - या सर्वची उत्तरे तुला त्याच जागेवर जाऊन मिळतील

आपल्या शक्तीचा वापर कर. कदाचित वीणा व उमेशच्या खुनाचे रहस्य पण उघडेल आणि साराचा पण शोध घेयचा आहे.

लव डोळे मिटून त्या जागेचा विचार करतो व एक श्रणात तो सैतनचा दुनियत जातो. देवदूतच्या सिहासनालगून देवदूत ची गदा ठेवली असते. लव बाजूला अजून काही भेटते का शोधतो पण गदा सोडून काही भेटत नाही. तो गदा घेऊन परत भूलोकात येतो.

रात्रीच्या ११:४० सुमारास तेराव्या कोंबडयाचे मुकडे कापून रम्या मांत्रिकाने सगळ्या कोंबडयाचे रक्त एक भांडत जमा केले.व ते अमोल एक दमात प्यायला सांगितले. ते रक्त पितात अमोल पटकन ओकाला.

रम्या मांत्रिक - हे काय केलंस माझी मेहनत वाया घालवली.

जाऊ दे मी करतो काही तरी. बोल तुला काय पाहिजे.

अमोल- माझ्या प्रेमाच्या वाटेत एक काटा आहे. बस तो काटा बाजूला करायचा आहे.

रम्या मांत्रिक - म्हणजे मुलीचे प्रकरण! काटा बाजूला करण्या ऐवजी मुलीवरच वशीकरण करू या.

अमोल- मला वशीकरण नको मला खरे प्रेम पाहिजे . तू फक्त तो काटा काड.

रम्या मांत्रिक - ठीक आहे

रम्या मांत्रिक काहीतर मंत्र फुटफूटण्याचे नाटक चालू करतो.

वसंत लांबूनच ते सगळे नाटक बघत व ऐकत होता.

आचनाक वसंत दोघा च्या मध्ये जाऊन उभा राहतो.

वसंत- अमोल तुझी इच्छा मी पूर्ण करेल. हा मांत्रिकाडे काही शक्ती नाही. तो भामटा आहे

रम्या मांत्रिक - तुला माहित ( वसंताला ) मी किती मोठा मांत्रिक आहे . थांब तुला रक्त ओकयला लावतो.

वसंत- तू माझे रक्त ....

वसंत मधील सैताने पटापट बाहेर येतात व मांत्रिकचे रक्त शोषून घेतात.

अमोल भीतीने थरथर कापत असतो.

वसंत - भिऊ नकोस, आम्हला तुझी गरज आहे व तुला आमची.

अमोल- मी मी.. तुमची मदत कसी करू शकतो.

वसंत - माझी शक्ती दिवसा कमजोर असते. त्यामुळे त्यावेळी

तुझी गरज पडेल. आता साग कुणाचा अंत करायचा आहे.

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror