Nilesh Bamne

Romance

1.0  

Nilesh Bamne

Romance

तो आणि मी

तो आणि मी

8 mins
1.6K


तो आणि मी यांची एकमेकांशी तुलना केली असता तो मला महाभारतातील श्रीकृष्ण आणि मी मला सुदामा वाटतो कारण तो म्ह्णजे विजय श्रीमंत राजा सारखा जीवन जगणारा आणि मी सुदामा सारखा गरीब बुध्दीजीवी. आमच्यातील मैत्री सर्वांसाठी चर्चेचा विषय आणि आमच्यात रोज नक्की कोणत्या विषयावर तासनतास चर्चा होते याबद्दल सार्‍यांनाच कुतूहल होत. आमच्यात रोजच गरीबी - श्रीमंती अथवा इतर कोणत्याही गहण विषयावर नाही तर फक्त ‘लग्न’ या सामान्य पण सध्या असामान्य ठरत असलेल्या विषयावर चर्चा होत असते. तो मला सारं खरं खरं सांगतो पण मी मात्र त्याला हातच राखूनच सांगतो. खरं म्ह्णजे मी माझ्याबद्दल त्याला अजून काहीच सांगितलेले नाही. गुप्तता पाळ्ण्यात मी एखादया गुप्तहेरालाही मागे टाकू शकतो म्ह्णूनच लोक त्यांची मने माझ्यासमोर मोकळी करतात आणि मी बर्‍याचदा त्यांच्या मोकळ्या मनाच भांडवळ करतो त्यांच्याही नकळत पण फक्त समाजहितासाठी. विजय आणि मी आमच्या दोघांच्या वयात तीन - चार वर्षाच अंतर आहे. मी त्याच्या पेक्षा मोठा आहे पण त्याने फारसा फरक पडत नाही कारण लहानांच्या पातळीवर येऊन मैत्री करायची मला सवयच जडलेली आहे. आमच्या दोघांचे विचार जुळत होते हे एकमेव कारण होते आमच्यात घट्ट मैत्री व्हायला. त्याला श्रीमंतीचा अभिमान होता आणि मला गरीबीचा अर्थात साधेपणाचा माज. तो सहा हजाराचे बुट पायात घालतो आणि मी सहाशे रुपयाचे ! आमच्यात असणारा हा दहा पटीचा फरक जवळ – जवळ सर्वच बाबतीत होता. मी लग्नासाठी दहा मुलींना नाकारल होत त्याने शंभर ! पण लग्नासाठी मी स्वतःहून एकही मुलगी पाहिली नव्हती. त्याने जवळ - जवळ हजार मुली पाहिल्या असतील. आजही लग्न जुळविणार्‍या संकेत स्थळांवर सकाळ - संध्याकाळ तो पडलेला असतो. लग्न जुळविणार्‍या संकेतस्थळांवर पेड मेंबरशीपसाठी आता पर्यत त्याचे दोन लाख रुपये खर्च झाले होते. मी त्याला म्ह्णालो तू लग्नासाठी एक मुलगी शोधण्यासाठी जितके पैसे खर्च केलेस तितक्या पैशात मी दोन लग्न करून झालो असतो. लग्नाच्या बाबतीत आमच्या दोघांमधे एक महत्वाचा फरक होता तो म्ह्णजे तो लग्नासाठी उतावळा झाला होता आणि मी लग्नापासून शक्य तेवढ लांब पळण्याच्या प्रयत्नात होतो.

कालपरवा विजयला एका मुलीचा बाप त्याच्या कंपनीच्या कार्यालयात भेटायला आला होता. तो विजयपेक्षा दहापट अधिक श्रीमंत होता. तो विजयला म्ह्णाला, ‘ही कंपनी तुझ्या बाबांनी सुरू केली पण तू काय केलसं ? त्यावर विजय म्ह्णाला, ‘मी वीस लाखाची गाडी घेतली ना ?’ त्यावर तो म्ह्णाला,’ पण गाडी कंपनीच्या पैशातून घेतली ना ? तिचे हप्ते कंपनीच्या पैशातूनच जाता आहेत ना ?’ त्यावर विजय गप्प आणि तो माणूसही गप्प स्वतःशीच हसत. त्याच्या एक आठवडा अगोदर एका मुलीचे वडील त्याला भेटायला त्याच्या घरी आले तेंव्हा विजय चिविंगम चघळत होता इतक्यात त्यांची नजर अगोदर विजयच्या तोंडाकडे आणि नंतर समोरच्या कपाटात ठेवलेल्या पान मसाल्याच्या डब्यावर स्थिरावली त्यांनी विजयला प्रश्न केला, ‘हा पान मसाला कोण खातो ?’ त्यावर विजय माझे बाबा खातात ! म्ह्णताच पुढचा प्रश्न,’तू काय खातोयस ?’ त्यावर विजय म्ह्णाला,’मी हे चिविंगम खातोय ! पॉकेट खिशातून काढून दाखवत. पण त्यावर थांबेल तो विजय कसला त्यापुढे तो म्ह्णाला, हे चिविंगम अमेरीकेच आहे. या विभागात फक्त एकाच दुकानात भेटतात आणि माझ्यासारख्या फक्त चार - पाच लोकांसाठी तो स्पेशल ऑर्डर देऊन मागवतो. बंस विषय खल्लास ! त्याच्या अगोदर काही दिवस तो लग्नासाठी एका हवाईसुंदरीला भेटायला गेला होता ती लग्न करायला एका पायावर तयार होती पण तिच्या काही शुल्लक अटी होत्या त्या म्ह्णजे लग्नानंतर आपण स्वतंत्र राहायच, त्या स्वतंत्र घरात मुलांसाठी वेगळ्या खोळ्या असायला हव्यात आणि महत्वाचे म्हणजे लग्नानंतर चार वर्षे मी मुलांना जन्म देणार नाही. त्याने पत्रिका जुळत नाही हे फालतू कारण देऊन तिला नकार दिला कारण त्याच्या बाबांना आजोबा होण्याची घाई होती त्यापेक्षा विजय एकुलता-एक असल्यामुळे त्यांना आपल्या संपत्तीला वारस हवा होता. त्याच्या काही महिन्यापूर्वी तो लग्नासाठी एका मुलीला भेटला होता पण ती रातराणी होती, ती त्याला नेहमी रात्रीच भेटायची, एकदा चंद्राच्या प्रकाशात विजयची नजर तिच्या गोर्‍या गोर्‍या चेहर्‍यावरून तिच्या पायावर गेली तर त्याला तिचे पाय काळे दिसले म्ह्णून त्याने एकदा तिला दिवसा भेटायला बोलावले तर त्यावर ती त्याला म्ह्णाली,’ तुला काय मला दिवसाच्या उजेडात पाहायचे आहे ?’ तिला दिवसा पाहण्याचे भाग्य विजयला लाभले नाही कारण तिला त्याच्या आई - बाबांनीच नकार दिला. नाहीतर विजय तरी कोठे तिला होकार देणार होता पाय पाहिल्यावर. कोणी हेअर ड्रेसरला कंगवा अथवा फणी म्ह्णते, कोणी बावळट आहे म्ह्णून, कोणी ब्रॅडेड वस्तू वापरत नाही म्ह्णून, कोणी सिनेमागृहात खूर्चीवर पाय घेऊन बसते म्ह्णून, कोणी आपल्या बरोबरीची नाही म्ह्णून विजयने ज्या मुलींना नकार दिला होता त्या आज परदेशातील भारतीय मुलांशी लग्न करून तेथे स्थायिक झाल्या होत्या आणि आता हा त्यांच्या नवर्‍यांच्या वाढलेल्या पोटावर टिका करून मानसिक समाधान मिळवत होता. विजयच्या वडिलांचे आणि माझे फारच घरोब्याचे सबंध ते ज्या गोष्टी त्यांच्या मुलाला सांगू शकत नाहीत त्या मला सांगतात इतका. त्यांनी माझ्यासमोर विजयच्या लग्नाचा विषय काढताच मी त्यांना मानसिक आधार देतो खरा पण माझ्या आई - बाबापालाही तोच आधार लागतोय याची मला खात्री होती असो ! त्यांना आधार देताना मी मनातल्या मनात म्ह्णतो, मी हवाईसुंदरी कशी असते हे पाहाण्यासाठी विमानाने प्रवास केला होता आणि तुमचा मुलगा सहा हवाईसुंदरीना लग्नासाठी नकार देऊन झालाय आणि अशा मुलाकडून तुंम्ही गावाकडच्या मुलीशी लग्न करण्याची अपेक्षा करताय ! यापेक्षा जगात दुसरा मोठा मुर्खपणा नसेल. मी त्यांना नराहून एक हिताचा सल्ला देतो तुम्ही त्याच्या लग्नाच्या भानगडीत पडू नका फक्त अक्षता टाकायला तयार रहा ! पण हा सल्ला मानेल तो बाप कसला ?

पूर्वी विजय बर्‍यापैकी जाडा होता तेंव्हा कडक्या मुली त्याला भाव देत नसत म्ह्णूनच त्याला सडपातल मुलीशी लग्न करायचे आहे. विजयने दोन – तीन लाख खर्चून वीस किलो वजन कमी केले होते पण आता वजन कमी न होता फक्त पैसेच कमी होता आहेत. वजन कमी झाले मग चेहर्‍यावरील एक छोटासा डाग आणि एक उंचवटा काढायला लाखभर रुपये खर्च केले तरी अजून लग्न काही ठरल नाही. मग त्याला वाटू लागल आपण एम. बी.ए. केल नाही म्ह्णून आपल लग्न जुळत नाही त्यावर मी त्याला म्ह्णालो,’ आमच्याकडे पाचवी पास मुलाने एम.बी.ए. झालेली मुलगी पटवून तिच्याशी लग्न केलं ते ही उच्च कुळातील. माणूस शेवटी कोणाला दोष देतो ? तो आपल्या नशीबाला आणि नशीब कोणाच्या हातात असत ज्योतिषाच्या ! ज्योतिषी तो ही हाय-फाय त्याला म्ह्णाला,’ तुझ्या पत्रिकेत शिक्षणाचे योग नाहीत लग्ना बद्दल काय सांगितले त्याने मला सांगितले नाही पण मला वाटत त्याच्या पत्रिकेत लग्नाचेही योग नाहीत हे ज्योतिषाला बहुदा कळले असावे पण त्याने पैसे काढून याला टाळले असावे याची मला खात्री होती. मध्यंतरी एका मुलीशी विजयचे लग्न जवळ – जवळ पक्के झाले होते पण नंतर त्या मुलीच्या घरच्यांना कळ्ले की विजयची आई त्याच्या वडीलांची दुसरी बायको आहे त्यांचा एक घटस्फोट झालेला आहे आणि सर्वात महत्वाचे विजयची आई आणि त्याचे वडिल यांचा आंतरजातिय विवाह झालेला आहे. त्यामुळे आपले लग्न न ठरायला आपले आई - बाबाच जबाबदार आहेत असेही विजयला वाटू लागले होते. तो राग व्यक्त करण्यासाठी विजयने आईच्या जातीतील चार मुलींना नकार दिला. मध्यंतरी एका लग्न जुळविणार्‍या संकेतस्थळावर त्याला एक मुलगी भेटली ती पूण्याची आणि हा मुंबईचा सारे जुळले तीन महिने चॅटींग मिटींग झाल्यावर ती एक दिवस त्याला म्ह्णाली,’ मला लग्नासाठी तुला हा ! ही नाही म्ह्णता येत आणि नाही ! ही म्ह्णता येत नाही, माझे सर्व मित्र – मैत्रिणी नातेवाईक इकडे आहेत, मला विचार करायला अजून वेळ हवाय ! खरं म्ह्णजे प्रेम विवाह करणे हे माझे स्वप्न होते. खरं म्ह्णजे तिने विजयचा पोपट केला होता पण त्याचा पोपट झालाय हे तो स्वतःच्या तोंडाने कसं सांगणार म्ह्णून तिला शिव्या.

एक मध्यमवर्गीय कुटुंबातील एक मुलगी त्याला लग्नासाठी एका संकेतस्थळावर भेटली होती तिच्याशी प्रत्यक्ष भेट झाल्यावर पत्रिका जुळत नसतानाही ती लग्न करायला तयार असतानाही याने नकार दिला पण मैत्रीचे नाते आबादित ठेवायचे ठरले. कदाचित ! त्या मुर्ख मुलीने असा विचार केला असेल की मी याला माझ्या प्रेमाने वितळविण ! त्यांच्यातील फिरणे - फिरविणे सुरू झाले होते आणि दुसरीकडे दोघेही दुसरे जाडीदारही शोधत होते. एकदा तर तो तिला असं ही म्ह्णाला , की आपली लग्न झाल्यावरही आपण असेच भेटत राहू ! तिला काही कळत नव्ह्ते की सारे कळूनही ती न कळल्यासारखी करत होती. मला तर वाटत ते दोघेही एकमेकांचा फक्त फायदा घेत होते क्षणिक सुखासाठी बस्स ! सारेच अकल्पित ! वास्तवात विजयकडे जगातील सारी सुखे विकत घेण्याची ऐपत होती तरीही त्याला लग्नासाठी एक मुलगी भेटू नये नाहीतर आमच्याकडे मुलांने साधी बाईक घेतली ती ही बापाच्या पैशाने तरी त्याच्या मागे पोरींची रांग लागते. मला लग्नाची फार इच्छा नाही हे माहित असतानाही कोणी न सांगताही माझ्यासाठी मुलगी शोधण्याच्या भानगडीत बरेच जण पडतात पण विजयसाठी पैसे खर्चूनही आता कोणी मुलगी शोधायला तयार नाही.

बर्‍याच लोकांना वाटत माझ्या आयुष्यात कोणी मुलगी आली नाही अथवा माझा प्रेमभंग वैगरे झाला असावा म्ह्णून मी लग्न करत नाही पण वास्तवात मी ठरवल तर एका दिवसात ही मुलगी शोधून लग्न करू शकतो. पण लग्न या भानगडीपासूनच शक्य होईल तितक लांब राहायच आहे कारण लग्न झालेली जोडपी मी फार जवळून पाहिलेली आहेत, त्यांची सुख - दुःखे जाणली आहेत, विजय श्रीमंत होता म्ह्णून त्याचे अनुभवही श्रीमंत होते. त्याने सरळ - सरळ घटस्फोट देणारी माणसे पाहिली होती पण मी बायकोला दुसर्‍याच्या कुशीत पाहूनही गप्प बसणारे नवरे पाहिले होते, नवर्‍याला दुसर्‍या बाई सोबत प्रत्यक्ष पाहूनही फक्त मुलांसाठी आयुष्यभर ओठांना कुलुप लावणारी बायको पाहिली आहे, बायको पतीव्रता असतानाही तिच्या चारीत्र्यावर संशय घेऊन तिला बडवणारे नवरे पाहिले आहेत, नवर्‍याला पाय चेपायला लावणारी बायको पाहिली आहे. नवर्‍याला भिकेला लावणारी बायकोही पाहिली आहे. प्रेम विवाह करणारी जोडवी कशी लग्नानंतर एका वर्षात उरावर बसतात एकमेकांच्या ते ही पाहिले आहे. आपल्या आई - वडिलांच्या मरणाची वाट पाहणारी पोर पाहिली आहेत माझ्या डोळ्यासमोर आपल्या मुर्खपणामुळे अक्क कुटुंब नामशेष होताना पाहिले आहे. या जगात कोणी कोणाचा नसतो सारी नाती क्षणिक असतात हे मला केंव्हाच उमजले होते. गीता वाचून ती जगण्याच्या निर्णयापर्यंत मी पोहचलो होतो. विजय मात्र मोहात गुंतलेला होता त्याचा श्रीमंतीचा अहंकार काही केल्या दूर होत नव्हता. त्याच्या आई- वडिलांनी केलेल्या चूकांची शिक्षा तो भोगत होता. पण त्यांच्या चूकांतून बोध घेण्या ऐवजी तो त्याच चूका पुन्हा करत होता. माझ्या आई - बाबांनी लग्न करून केलेली चूक मी सुधारण्याचा प्रयत्न करणार होतो. माझ्या आई - बाबांनीही प्रेमविवाह केला होता पण दुदैवाने त्यांच्यातील प्रेम मला कधीच दिसले नाही. फक्त माझे ग्रह चांगले होते म्ह्णून त्यांचा विवाह टिकला असेही एका ज्योतिषाने मला सांगितले होते. त्याच ज्योतिषाने मला असेही सांगितले होते की तुझा विवाह टिकणार नाही. मी ते भविष्य फार मनावर घेतले नाही पण का कोणास जाणे मला स्वतःलाही तसे आतून जाणवते. माझ्यावर प्रेम असणार्‍या मुलीशी लग्न करायला मला वय, शिक्षण, जात- धर्म काहीही आडवे येणार नाही पण माझ्या प्रेमात पडलेल्या मुलीची माझ्याशी लग्न करण्याची हिंमत नसते. विजयच्या बाबतीतही मी ज्योतिषी नसतानाही त्याचा विवाह टिकणार नाही असे मला खात्रीने वाटते. माझी एकाकी राहाण्याची मनापासून आणि आनंदाने राहायची तयारी होती पण विजय ते नाईलाजाने स्वीकारणार होता. विजय हा समाजाच व्यवस्थेचा बळी ठरणार होता पण मी त्या समाजव्यवस्थेवर स्वार होणार होतो. विजयचा विवाह झाला तर तो बळी ठरणार होता आणि माझ्यासाठी तो भांडवळ ठरणार होता. आमच्या दोघांमधे आणखी एक महत्वाचा फरक होता तो म्ह्णजे आम्ही एकाच नावेत बसलो असतानाही दोन वेगळ्या दिशानी प्रवास करत होतो कारण विजय एक सामान्य माणूस होता आणि मी एक लेखक होतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance