ती
ती
आज अचानक वैतागल्या सुरात ग्राहकाने विचारले मावशी काय झाले ते नका विचारू. या लॉकडाऊन काळात व्यवसाय होत नाही. नवरा जाऊन २० वर्ष झाली या संसार गाडा ओढते आहे. आज या भाजीपाला गाड्याचे चाक पंक्चर झाले. लोटत आणलं आज तरी किराणा उधारी देता येईल. नाही मागच्या महिन्यात जावई वारला. तेच दिवस पोरीवर आले. नवरा गेल्यावर काय घडते ते मी उपभोगत आहे. उघडयावर पडलेला संसार झाकला पोरीला लवकर लग्न लावून दिले. मुलगा शिकत आहे. चार पैका कमवून स्त्रीचं जीवन काय असतं ते पोरीला येवू नये. त्यासाठी सगळा पैका देवून चांगलं घर शोधलं मात्र नियतीला पाहावलं नाही. या गाड्यानं माझं डोळं उघडलं. साऱ्या जीवनाचं दर्शन एका चाकानं घडवलं. जीवनातील सारे रंग एका क्षणात कसे पांढरे पडतात, सौभाग्याचं लेणं लाल रंगान नटूनथटून होळीला रंग उधळणारी मी सर्व काही बेरंग झालं. मात्र तेच माझ्या लेकीलाही नियतीने का बेरंग करावं तेच कळत नाही.
काय चुकते मी का जगते नियती परत परत तोच रस्ता का दाखवते तेच कळत नाही. आयुष्यभर उघड्या संसाराला ठिगळे लावत लावत मीच एक नियतीचे ठिगळ का झाले, ते आजही कळत नाही.
