Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Adv RaHul RaSve

Comedy Action


3.8  

Adv RaHul RaSve

Comedy Action


थरार

थरार

2 mins 902 2 mins 902

काल राञीचा आयुष्याचा सर्वातथरारक अनुभव

"देव" नावाच्या अदृश्य शक्तीवर विश्वास ठेवायला लावणारा..

देव आहे की नाही मला माहीत नाही आणि मी ते कधी माहित करुन घेण्यात वेळही घालवलेला नाही. पण मला नेहमीच जाणवतं की अदृश्य शक्ती सतत माझ्या सोबत असते माझ्या प्रत्येक संकटात मला मदत करते. तुमचा विश्वास बसणार नाही पण कधीकधी तर असं होतं की मला कळतं की प्राॅब्लेम माझ्यापासुन 10 पावलं दुरंय. मी घाबरत घाबरत 7-8 पावलं टाकतो अन अचानक तो प्राॅब्लेम दुसरंच कोणीतरी सोडवतो!! मग वाटतं 'च्यामारी यही था अभी!इसकौ कौन उठा ले गया??'

आतापर्यंत तीनदा मरणाच्या दारातुन परत आलोय.अन तिन्ही वेळेस मला वाचवणारी ती शक्ती logic च्या बाहेर अनुभवलीय मी...

आता कालचाच अनुभव घ्या ना...

वेळ असेल राञी 11-11.30ची. मी मोटरसायकलनं दौलताबादकडनं औरंगाबादकडं येत होतो. एकटाच, कानात हेडफोन टाकलेले, "सुरज डुबा है यारो' गाणं फुल आवाज, मस्तीत चाललेलो. अचानक एक मोटरसायकल डायरेक आडवीच आली. मी कचकन ब्रेक दाबले. गाडी घासत घासत त्याच्याजवळ जाऊन थांबली. ज्या स्पीडनं गाडी थांबली त्याच स्पीडनं तोंडातुन शिव्या बाहेर पडणारच तेवढ्यात रस्त्याच्या कडेच्या झाडातुन अजून दोघं जण झप्पदिशी बाहेर आले. मेसवरच्या जेवणाचा घास बळंच गिळावा तशा मी शिव्या गिळल्या. कळुन चुकलं 'च्यामारी मॅटर येगळंचंय'. दातखिळी बसणे काय याचं ते जीवंत आणि ज्वलंत प्रात्यक्षिक होतं.

'पुढं काय होणार' याचं चलचिञ 'क्रिश' मधल्या कंपुटरवर दिसावं तसं डोळ्यासमोरून 0.1सेकंदात सर्रकन निघून गेलं. आता चौघांनी मला चारो तरफ से घेरलं होतं. त्यांनी पुढची अॅक्शन घेण्याच्या आत मी मनात महाराजांचं नाव घेतलं अन तशीच गाडी स्टार्ट करुन समोरच्याच्या अंगावर घालायला रेस वाढवला अन तेवढ्यात पाठीवर दण्णकन दंडुक्याचा फटका बसला. मी गार..

एकानं गाडी साइडला ढकलली, दोघांनी मला पॅक धरलं, तिसरा समोर आला. समोर आला की तशाच स्थितीत माझ्या दोन्ही पायांची लाथ त्याच्या छाताडावर बसली.(जीवावर आल्यास उमेश यादव बी सिक्सर मारू शकतो ते मला तिथं कळलं). तो पडला,पण त्याच्या छाताडाची आग बाकी तिघांच्याही मस्तकात गेली अन त्यांची सटकली.

त्या दोघांनी मला नंतर हलूही दिलं नाही. तिसरा समोर आला तो साडेपाच इंची कुकरी घेवूनच.आता म्हटलं 'प्रपोजायचं' राहुनच जाणार , हे माझी शेवटची इच्छा चुकुनपण विचारणार नाहीत. समोर साक्षात यम उभा,माझी बोबडीच नाही तर काय काय वळली होती ते पण नाय सांगता येणार आता...

त्या चाकु इतकिच त्याची नजर खुॅंखार होती.आग न धुपन एकसाथच!! त्यानं रागातच चाकू ऊगारला माझ्यावर, मी जोरात किंचाळलो,डोळे आपोआप मिटले अन् तो पोटात चाकू खुपसणारच अन इतक्यात..

इतक्यात अचानक "धप्प्प." आवाज..

अन मी ताडकन झोपेतून उठलो.

खुर्चीवरुन बॅग खाली पडली होती. का पडली कशी पडली,विचार पण केला नाही. घड्याळात ३.१७ वाजलेले.फक्त दोनच शब्द ,'संपलेल्या टूथपेस्टच्या पॅकमधून बळंच टुथपेस्ट काढावं' तसे बाहेर पडले

"Thank God

आज पुन्हा वाचवलंस"😂


Rate this content
Log in

More marathi story from Adv RaHul RaSve

Similar marathi story from Comedy