Read a tale of endurance, will & a daring fight against Covid. Click here for "The Stalwarts" by Soni Shalini.
Read a tale of endurance, will & a daring fight against Covid. Click here for "The Stalwarts" by Soni Shalini.

Prashant Shinde

Action Others

3  

Prashant Shinde

Action Others

तात्या विंचू...

तात्या विंचू...

1 min
420


मराठी चित्रपटात झपाटलेल्या चित्रपटाने चांगलीच कमाई केली. त्यातली कथा ही अमानवीय किंवा भयानक पत्राच्या भोवती फिरते आणि ते पात्र होते तात्या विंचू अर्थात इतकी उच्च भूमिका मराठी चित्रपटात दिलीप प्रभावळरांच्याशिवाय दुसरे कोण वठवणार आणि पात्रास इतक्या हुबेहूब तरी कोण साकार करणार... तात्या विंचू भूमिका एक कापडी बहुलीच्या रूपात अवतरलेले पात्र पण संपूर्ण चित्रपट उचलून धरणारे ठरून गेले. मला त्या पात्राच्या तोंडातून होणारी संवादफेक खूप भावली म्हणून मला तात्या विंचू हे पात्र मला आवडते. रामदास पाध्येंनी हे पात्र हुबेहूब चित्रपटात वठवताना खूप मेहनत घेतल्याचे सोशलपणे जाणवते... सर्वच अर्थांनी हे पात्र भीतीदायक असले तरी तेवढेच करमणूक करते आणि योग्य तो परिणाम साधते यात शंका नाही.


रामदास पाध्येंची किमया सारी

बाहुली होऊनी भेटीस आली

तात्या विंचूच्या रूपाने पडद्यावर येता

धमाल चौफेर उडून गेली...

दिलीप प्रभावळकरांची जोड चांगली

छबी ठसठशीत वठण्यास लाभली

कोठतेची कल्पकबुद्धीही चांगली

परिणाम हवा ती साधून गेली...

भया पोटी प्रेम जन्मते

हे पहाता पहाता जाणवले

चित्रपटाच्या माध्यमातून बाबांनो

तात्या विंचूने मनी घर केले...


Rate this content
Log in

More marathi story from Prashant Shinde

Similar marathi story from Action