Vilas Yadavrao kaklij

Tragedy

3  

Vilas Yadavrao kaklij

Tragedy

सूर्यनारायण

सूर्यनारायण

4 mins
402


मुले मोठे करताना आई-वडिलांनी वाढवलं कष्टाचं चीज झालं वडील आणि आई धन्य झाले नवसाने झालेल बाळ आज लग्नाच्या वयाच झालं त्यांना काळजी वाटू लागली त्याचा संसार सुखाचा व्हावा आपल्या डोळ्या देखत नातवाच तोंड बघाव नातवाला अंगाखांद्यावर खेळवून या पेक्षा जास्त अपेक्षा नव्हती . माझी माय बाप अतिशय भोळवट होती ना त्यांना कोणताही स्वार्थ नव्हता फक्त आनंदाने जगायचं कष्टाने काम करायचं आणि शांतपणे बसायचं बस .

एक दिवस त्यांनी त्यांच्या नात्यातील एका मित्राची ज्या शेतकऱ्यांची पोर सून म्हणून घरि आणण्याचे ठरवले मायबापाच्या शब्दाच्या पुढे काहीही बोलण्याची हिंमत नव्हती त्यांचा शब्द झेलणे आणि कष्ट करणे कसलीही अपेक्षा नसणारे शेवटी त्यांच्या शब्दाखातर मला लग्ना साठी तयार व्हावा लागलं सुखाने संसार सुरू झाला पदरी दोन गोंडस मुलं त्यांना खूप शिकावं खूप मोठा करावे त्यासाठी मी काबाड कष्ट करु लागलो आणि त्यांना शिकवू लागलो शहरात पाठवले तिकडे काबाडकष्ट करून काळया आईचे उपकार माभ न कष्ट करून स्वतःच्या जोरावर पैसा कमवून त्यांना धाडू लागलं माझ्या पदरी चांगले अपत्य होती पोरांना बापाचं प्रेम भेटलं पा गं फेडलं दोन्ही मुलं नोकरीला लागली रग्गड पैसा कमवू लागली हळूहळू त्यांचं गावाकडे येणार बंद झालं तिकडे माझा बाप आई म्हातारपणामुळे देवाघरी गेली माझ्याकडं आता काबाड कष्ट होत नव्हते मुलांची आई ही अंथरुणाला खिळली होती अशा एका दुर्धर आजारांन तिला ग्रासलं होतं रग्गड पैसा मोडला ;शेती गहाण ठेवली पण गुण येत नव्हता वाटत होत पोरांना निरोप धाडला पोरांनी नाही येणार सांगावा धाडला किती पैसा पुरवू म्हातार माणूस : पिकल पान एक दिवस गळून पडणार आहे म्हणून आता पैसा मोडु नका आम्हाला जगू द्या म्हणून पोर टाळू लागली खर्च वाढत गेला सावकाराचे कर्ज वाढलंय त्याने शेतीखरेदी करुन घेतली नंतर घर गहाण टाकल भाड्याच्या घरामध्ये राहायला गेलो तिकडे मुलांनी आपापली लग्न केले बापाला विचारलं नाही बोलावले नाही काय पाप केलं होतं. शेवटी मला दारोदारी हिंडावे लागलं पोटात पाणी घालून ओट्यावर आडव पडलो ; वाटलं पोराकडे जाव म्हातारपणात आधार म्हणून त्याच्या पायरीवर मराव म्हणून एका ओळखीच्या माणसाकडे गेलो त्याच्या मदतीने मुलाच्या शहरात पोचलो मित्रांन त्याच्या घरी पोहोचवलं त्याची बायको दारातच म्हणाली. कोण भिकारी आणला म्हणून मला डावललं मी त्र म्हणाला अग बाई तुझा सासरा आहे त्याच्यामुळे तुझ्या घरामध्ये तू आज उभीआहे .त्याने काबाडकष्ट केलं तुला कळणार नाही त्याच्यामुळेच तुला हा नवरा मिळाला तो त्याचा पोरगा आहे त्याच्या कडे लक्ष दे म्हातारपणी दोन घास खाऊ घाल अस म्हणून गेला घरचा माणूस सध्यांकाळी घरि आला मला बायको बोलली काय उपाद आणली म्हणून? घरात घेणार नाही शेवटी पोरांनी मला अडगळीच्या खोलीत जागा दिली आणि म्हणाला येथेच थांब तुला खायला प्यायला इथेच मिळेल बाहेर या घरांमध्ये येऊ नको . आवाज करू नको असं म्हणून अडगळीच्या खोलीत माझी रवानगी केलीय जेमतेम आठ दहा दिवस झाले. असतील पोराच्या घरामध्ये मित्रांची लोकांची पार्टी होती. त्यामुळे म्हातारा बाहेर येऊ नये म्हणून त्यांनी खोलीला कुलूप लावलं मला खिडकितून खायला दिलं आणि सांगितलं बाहेर यायचं नाही आणि बोंबलायचं नाही मात्र त्या खिडकीत कोणीही मित्रापैंकी बघेल म्हणून खिडकी पण लावली.

पार्टी रात्रीची होती धिंगाणा ऐकायला येत होता पण ? करणार काय एका एका कुत्र्यासारखं जिन जगत होतो स्वतःच्या मुलाच्या घरात एका कुत्र्या वाणी अडगळीच्या खोलीत पडून होतो . अडगळीच्या खोलीत लाईट दिसू नये म्हणून पोरांन लाईट बंद केला आणि त्या अंधारात मला रात्रभर राहावं लागलं बाहेर कोणताही प्रकाश नाही फक्त भिंतीकडे पाहायचं आणि छताकडे वर पाहायचं त्या चार भिंती मध्ये " जिन " सुरू झालं आज वर्ष होत आल असतील आजूबाजूच्या लोकांना अडगळीच्या खोलीत याचा म्हातारा बापआहे आहे हे समजू नये म्हणून बापाला कधी बाहेर येऊ दिलं नाही कारण त्यांची इज्जत जायची ही मोठी लोकं झाली त्यांचा बाप भिकारी एक गावढळ , अडाणी खोली बंद "बाप " म्हणून मारता येईना करण बाप होता गल्लीमध्ये इज्जत जाऊ नये म्हणून मला अंधारात ठेवलं धडमरू देत नव्हता नियती ही मरु देत नव्हती. पोरगा बाहेर जगू देत नव्हता व सुनबाई लवकर मराव यासाठी चांगला खाऊ देत नव्हती. सासरा लवकर मरावा म्हणून रोज टोमणे मात्र नशिबानं कोणत पाप फेडायचं बाकी होतं कोणत पाप केल होतं म्हणून हा बाप जगत होता आज वर्षे झाली असतील एका खोलीमध्ये कधी दिवस पाहिला नाही रात्र पाहिली नाही फक्त अंधार काळ कोठरी काळ कोठारी. कसेतरी दिवस काढत होतो मरावा पण नियती मरू देत नव्हती ज्यासूर्य नारायणाचे दर्शन घेऊन माझे कष्ट सुरू व्हायचे व सूर्यास्ता पूर्वी माझे कष्ट थांबत आज त्या माझ्या देवाचे दर्शनही घेवू शकत नव्हतो काळया मातीत मध्ये राहायचं शेती पिकवायचा मुलांसाठी पैसा कमावायचा व त्यांना पाठवायचा व त्याच मुलांनी माझ्यासाठी फक्त मरणाची वाट पाहायची का? देवा मी सध्या माझ्या सूर्यनारायणाचे दर्शन सुद्धा देऊ शकत नाही . कोणते पाप केले आणि बाप झालो आणि आज या काळ कोठडीत जिवण जगत आहे का ? देवा म्हणतात ना देवाजवळ न्याय आहे .अंधारा नंतर उजेड पडतो . मग माझ्या जीवनात उजडा नंतर अंधार आहे तुझ्यावर विश्वास ठेवू कि नियती वर ठेवू तूच न्यायकर या जिवनात यानंतर मृत्यूचा विजय होउ दे व माझ्या अंधारातील जीवन संपू दे बापाच पाप  संपू दे जगाव कस व मराव कस याच ज्ञान दे देवा. -----------------


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy