'सुमा' चा संसार.
'सुमा' चा संसार.


एखाद भाकड जनावर पोसायला जड जातंय , आणि त्याची रेखदेख करून सुद्दा उपयोग नसल्यामुळे जसे त्या जनावराची पाठवणी खाटकाकडे केली जाते. अगदी तशीच ' सुमा ' ची भी बोळवण तिच्या गरीब आई बापांनी आज केली होती होती . नुकतीच तारुण्यात पदार्पण केलेली सुमा लग्न ,नवरा , नातीगोती , लेकरुबाळ , संसार या सर्व गोष्टीची कल्पना नसणारी सुमा होती. सुमाची नाजूक काया आता कुठे ठेवणीचा आकार धरत होती. आणि अकल्पित अस तिच्या आयुष्यात एक नवीनच वळण आल .शेजारच्या गावातील एका पस्तीस वर्षे वयाच्या म्हणजे सुमा च्या बापाच्या वयाच्या रामदास चा लग्नाचा प्रस्ताव तिच्या घरी तिच्या आत्याकरवी आला.
दोन महिनेपूर्वी रामदासची पहीली बायको तिच्या सातव्या बाळंतपणाच्या वेळी अतीरक्तस्राव होऊन मरण पावली अशी माहिती होती .पण लोक वेगळच बोलत असे म्हणे
एके दिवशी रामदासने दारूच्या नशेत आपल्या गरोदर बायकोला लाथाबुक्क्याणी तुडवली आणि या मारहाणीतच तिच्या पोटातल गाभरु पोटातच मेल आणि ती बया सुद्दा मेली असे गावातील बायामाणसे खाजगीत कुजबुजत होती.
अश्या रामदासने सुमाच्या गरीब मायबापाकडे लग्नाचा हा प्रस्ताव नुसताच पाठवला नव्हता तर सोबत काही रक्कम सुद्दा देऊ केली होती .शिवाय लग्नाचा सारा खर्च सुद्दा पेलण्याची त्याची तयारी असल्याचे त्याने कळवले होते. वयात येणाऱ्या मुलीच्या बापाला जर कोणती काळजी सतावत असेलच तर ती म्हणजे मुलीच्या लग्नाचीच असते .त्यात ले त्यात घरात जर अठरा विश्वे दलिंदरी असेल तर ताण अजूनही मोठा असतो. म्हणून कुठलाच मागचा पुढचा विचार ना करता सुमा च्या बापाने सदर प्रस्तावाला होकार कळवळा . ठरल्या प्रमाणे सुमाच्या बापाच्याने ही कधी केल्या गेल्या नसत अस थाटात लग्न पार पडल. आणि येथून सुरू झाला सुमा चा संसार...
आई बाबाच्या तोंडून आपल्या लग्नाची चर्चा ऐकून प्रतेक नवयुवती प्रमाणे सुमा सुद्दा मनोमनी हर्षली होती . यौवनात पदार्पण केल्यावर मनःपटलावर जसे रोमांचित गोष्टीचे तुषार उडतात आणि काल्पनिक पावसात जसे मन चिंब चिंब होऊन जाते अगदीच तशीच काहीतरी अनुभूती आता सुमाच्या उमलत्या तारुण्याला येत होती. या मुळे सुमा खुलून आली होती. आता सुमा सुद्दा रोज स्वप्नांत आपल्या भावी नवऱ्याला पाहू लागली होती , भेटू लागली होती , बोलू लागली होती, सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली होती.
सुमा ने आता रामदासच्या घरच माप ओलांडल होत. अर्थातच सुमाला रामदासच्या पूर्व संसाराची अजिबात पूर्व कल्पना नव्हतीच. किवा आपला होणारा नवरा हा आपल्या बापाच्या वयाचा आहे या पासून सुद्दा सुमा अज्ञान होती. ही सर्व हकीकत सुमाला कळली ती थेट लग्नाच्या भरल्या मांडवातच. जेव्हा सुमाला रामदास जी सर्व हकीकत कळली तेव्हा सुमा खूप ओक्साबोक्शी रडली होती . सुमाच्या मनातली घालमेल तिच्या आई बापाला कळत असूनही त्यांचा गरिबी पुढे नाईलाज होता. हे जग टिकून आहे ते धरती माता जगाचा भार सोसते म्हणून आणि जगातले संसार टिकून आहे ते कुटुंबातली महिला दुखः सहन करतते म्हणून . जर प्रतेक मुलीने , महिलेने आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरुध्द बंड केला तर कुठलाच संसार सुखाचा होणार नाही. त्या मुळे सुमाने सुद्दा आज हा विषाचा प्याला रिचवून घेतला होता.
अजून सुमाच्या पिवळ्या अंगाची हळद सुद्दा फिटली नव्हती की तिचा जो नवरा दारूच्या व्यसनापायी पुरता खंगत गेलला होता . त्याला आजाराने गाठले आणि तो आता अंथरुणाला खिळून राहू लागला.आयुष्याच्या ज्या वळणावर नव्या नवरीने नवऱ्यासाठी नटायचे असते , त्याला रिझवण्यासाठी साज शृंगार करायचा असतो , त्या वयात सुमाला आपल्या नवऱ्याचा आजार पेलवणार तरी कसा होता ? तरी ही नियतीने कपट कारस्थान केल आणि लग्नाच्या सहा महिन्यात रामदास ने जगाला रामराम ठोकला.
जेव्हा रामदास सरणावर निवांतपणे निजला होता तेव्हा त्याच बीज सुमाच्या कुशीत अंकुरित होऊन या जगात येण्यासाठी धडपडत होत. रामदास तर या फेऱ्यातून सुटला होता पण सुमा मात्र या संसारात आता पूर्ण पणे बांधली गेली होती . तिला आता हा संसाराचा गाडा रेटायचा होता.अगोदरची सहा लेकरे त्यात कमी की काय म्हणून सुमाच एक आणि या सर्व मोडक्या संसाराचा भार येऊन पडला एकट्या सुमावर.
रामदासच्या नावावर दोन एकर कोरडवाहू जमिनीचा तुकडा होता तो सुद्दा त्यांच्या आजारपणात सावकाराकडे गहाण होता . कसलंच कमाईच साधन उपलब्ध नसतांना सुमाला रोजमजुरी करणे हाच एक पर्याय उपलब्ध होता. रोज कुणाच्या तरी शेतावर कामावर जायचं आणि रुखी सुखी खाऊन दिवस काढायचे असा सुमाचा दिनक्रमच झाला होता.
असे म्हणतात की उकिरड्याचे सुद्दा दिवस फिरतात. आपल्या बापाच आकस्मिक निधन , घरावर आलेली दयनीय अवस्था , टीचभर पोट भरण्यासाठी रोज होणारी दयना आणि संघर्ष पाहत पाहत सुमाची मुले मोठी झाली होती . कळतंनकळत त्यांच्याही कोवळ्या खांद्यावर जबाबदारीचा भार आला होता . सुमाची सातही मुले आता मोठी झाली होती. वेगवेगळ्या व्यवसायात त्यांनी नाव मिळवले होते .
कधीकाळी दयनीय अवस्था सोसणारी सुमा आता समृध्दीच्या धारेत चिंब भिजली होती. पण पाहणाऱ्याला आता फक्त तिची श्रीमती आणि वैभव इतकच दिसत होत पण कोवळ्या वयात पदरात पडलेला जरठ नवरा आणि ऐन तरुणपणी उघड पडलेल कपाळ किवा जबाबदारीच्या तप्त झळाच्या दाह सोसत सोसत करपलेल यौवन कुणाला कुणालाही दिसू शकत नाही.
असाच असतो संसार जसा आहे तसा दिसत नाही किवा आपल्याला तो तसा दाखवावा वाटत नाहीच..