Dinesh Kamble

Tragedy

3.1  

Dinesh Kamble

Tragedy

स्री भ्रूणहत्या..

स्री भ्रूणहत्या..

3 mins
2.3K


_______________________________

*_स्त्री भ्रूणहत्या.._*

____________________:_____ _____

*_उदरात असतांना._*

*_धडधडतो हा उर.._*

*_घोटा बेशक गळा तुम्ही_*

*_आधी सांगा तरी माझा काय कसूर..?_*

गर्भाच्या गाठोड्यात दिवसेदिवस वाढणाऱ्या या बेटीने जर आपल्याच जन्मदात्यांना हा प्रश्न केला तर काय उत्तर असेल त्या निर्लज्ज बापाकडे . त्याही पेक्षा बेशरम त्या आईला कसे जमणार या प्रश्नाला तोंड देणे. तिच्याच रक्तामाशाचा तो गोळा असतो. पण फक्त मुलगी आहे म्हणून आपल्याच कुशीत वाढलेला तो अपरिपक्व असा अंकुर क्षणातच ताटातूट करायला ती धजावतेच तरी कशी ?का करते ती ही कानाडोळा आपल्याच त्या इवल्याशा प्रतिकृतीकडे ? का मुका करते ती हुंदका तिच्याच प्रतिध्वनीचा ? का गडद अंधाराच्या स्वाधीन करते ती आपल्याच शरीराच्या सावलीला ? या आणि अश्या अनेक प्रश्नांचा उहापोह केला तर एका निष्कर्षाला सहजच येऊन ठेपतो आपण आणि तो म्हणजे . तीला सुद्दा कधीकधी स्त्री च्या दुबळेपणावर विश्वास झालेला असतो. स्त्री ही कमकुवत आहे आणि घराचा खरा वारसदार ज्याला म्हणता येईल तो फक्त पुरुषच असू शकतो यावर महिलाच सुद्दा दुमत नसतेच .यांची परिणीती अशी होते की , जन्मला येणारा जीव हा पहिला मुलगाच असावा .

त्यातले त्यात आपल्या सो कॉल्ड समाजात

*मुलगी म्हणजे परक्याच धन* ,

*मुलगी म्हणजे काचेची वस्तू , एकदा टिचली तर टिचलीच.*

*मुलगी म्हणजे बापाच्या जीवाला घोर*

अश्या आशयाचे अलिखित सावधतेचे इशारे जे ऐकून त्या दांपत्याची मुलीबद्दलची विचारसरणी अजूनच विपरीत केली जाते.

जरी काहीनी मुलीना जन्माला घातलेच तरीही त्यांची मुलगा जन्मला घालण्याची अशा काही केल्या कमी होत नाही. मग मुलगा होईल या आशेपायी प्रत्येक सालाबादाप्रमाणे यांचा पाळणा हलतच असतो . कालपरवाची घटना फक्त मुलगा हवा म्हणून आठव्या बाळंतपणात अतीरक्तस्त्राव झाला आणि एक महिला दगावली अशी बातमी होती. अगोदरच त्या मातेने सात मुलीना जन्माला घातले होते. त्या सात बाळंतपणात तिच्या शरीराची किती अहवेलना झाली असेल यांची कल्पना ना केलेली बरी.

चला आपण मानू की स्री जन्मा बद्दल अशिक्षित लोकांमध्ये खूपच गैरसमज आहे . पण एक नवयुगाचा तरुण वर्ग सुद्दा कुठेतरी स्री जन्माबद्दल नकारात्मक आहे. पहीली मुलगी जन्मली म्हणून त्या प्रिय पत्नीला हॉस्पिटल मध्ये पहायला सुद्दा ना जाणारे सासरचे लोक सुद्दा तुम्हांला येथे सापडतील. तिच्या आरोग्याविषयी विचारपूस सुद्दा ना करणारे तिच्या जवळचे नातेवाईक असतात . जेंव्हा त्या नवजात मुलीला आपल्या बाबाचा स्पर्श हवा असतो आणि त्या मरणाच्या दारातून परतलेल्या नवख्या आईला आपल्या जीवनसाथीचा आधार हवा वाटतो तेव्हा हा बहाद्दर एखाद्या देशी दारूच्या गूत्त्यावर किंवा बार मध्ये बसून स्वतःला शोक सागरात बुडवत असतो. मुलगी जन्मली म्हणून यांच्यावर दुखाचा खूपच मोठा डोंगर कोसळलेला असतो .

या आणि अश्या मानसिकता आजही समाजाच्या प्रतेक घटकात तुम्हला पहायला मिळतील . मग तो ग्रामीण भाग असू द्या वा शहरी . मग तो अशिक्षित वर्ग असू द्या वा उच्चशिक्षित.

परिणामी यातून पळवाट म्हणून मधले मार्ग अवलंबले जातात . उदरातला गर्भ मग औषध गोळ्यांच्या साह्याने उकिरड्यावर फेकला जातो. कधीकधी पॉलीथींन मध्ये गुंडाळून डम्पिंगयार्डला टाकला जातो. कधीकधी त्या अर्धमेल्या अर्भकाला कुत्री , मांजरे खाताना दिसतात. इतके हाल त्या एका जीवाचे होत असतात किंबहुना केले जातात . पण का ? यांचे समर्पक अस उत्तर अजूनही कोणीही देऊ शकले नाही.

*डाव सारे नियतीने*

*तिच्यावरच का टाकले.?*

*मुलगी म्हणून जन्मली*

*हेच का तिने पाप केले .?*

*सौंदर्याच प्रतिक आहे हो ती*

*अन त्यागाचीही तिच मूर्ती.*

*मिळेल जेंव्हा जेंव्हा संधी.*

*दशोदिशांना गाजवे ती किर्ती*


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy