Nilesh Bamne

Inspirational

2.1  

Nilesh Bamne

Inspirational

संकेत

संकेत

6 mins
14.7K


   मी माझ्या कार्यालयाच्या बाहेर उभा होतो माझ्या आजूबाजूला आणखी चार - पाच लोक उभी होती. पण एक छोटा मुलगा नऊ - दहा वर्षाचा असेल, माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला ," दादा १० रुपये द्या ना काहीतरी खायला ? मी त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्या तोंडावर जखमा होत्या. माझ्यातील पत्रकार नेहमी जागा असतो मी त्याला विचारले कोठे राहतोस ? त्याने मला माहीत असणारे ठिकाण सांगितले. वर्षभरापूर्वी त्या भागात मी राहत होतो; कदाचित तो मला ओळखत असावा म्हणून मी त्याला तुझे बाबा ? त्यावर तो ते नाहीत ! असे म्हणाला. मग आई ? आई बाहेर गेली आहे, शाळेत जातोस की नाही ? जातो म्हणाला, त्यांनतर मी इतके प्रश्न विचारतोय हे पाहून त्याच्या चेहऱ्यावर मला एक प्रश्न दिसला की हा मला पैसे देईल की नाही ? मी लगेच त्याला १० रुपये काढून दिले. तो आनंदाने निघून गेला. त्याने त्यावेळी पन्नास रुपये मागितले असते तरी मी दिले असते कारण तेव्हा माझ्याकडे पैसे होते. तो मुलगा नक्कीच कोणी भिकारी नव्हता, तर गरीब होता आम्ही त्या परिस्थितीतून गेलोय म्हणून मी त्याला प्रवचन नाही दिले. आणि उपाशी पोटी कोणी प्रवचन ऐकतही नाही. आज आमच्या घरातील लहान मुले सहज चायनीज भेळ खाण्यासाठी २० रुपये मागून नेतात त्या मुलाने १० रुपयेच मागितले होते पण त्याने इतक्या माणसात माझ्याकडेच का मागितले कदाचित त्याला माझ्यातील चांगुलपणा माहीत असावा. पण माझ्याकडे काहीतरी खाण्यासाठी असे १० - २० रुपये मागणारा हा पहिला मुलगा नव्हता. यापूर्वी मी असे शेकडो मुलांना पैसे दिले आहेत. या मुलांना पाहिलं की मला नेहमी एक प्रश्न पडतो काय भविष्य असेल या मुलांचं ? आपल्या देशात आज आहेत त्याच मुलांचं भविष्य सुरक्षित नसतात ते कुपोषित असताना कोणी तरी भरल्या पोटाचे धर्माच्या नावावर लोकांना जास्त मुलांना जन्म द्यायला सांगतात. धर्म वाढवून माणुसकी नाही वाढत! काही दिवसापूर्वी मी सहज एक देवस्थानात गेलो होतो तेथे मी माझ्या आईसोबत ऊसाचा रस पित होतो तेवढ्यात एक छोटी मुलगी माझ्या जवळ आली. तिच्या होतात बांबूची विणलेली गाडीत लटकवायची छोटी फुलदाणी होती. यावेळी आम्ही आमच्या गाडीतून न येता भाड्याच्या गाडीतून आल्यामुळे ते घेण्यात काही अर्थच नव्हता. मी तिला म्हणालो मला हे नको तू उसाचा रस पी ना ? मी खूप आग्रह करूनही ती उसाचा रस प्यायला तयारच झाली नाही. ती हेच म्हणत राहिली हे विकत घ्या. मी लगेच तिला २० रुपये दिले. तिच्याकडे पैसेच नव्हते मी तिला म्हणालो ठेव तुलाच ! त्यावर तिच्या चेहऱ्यावर जो आंनद दिसला तो शाश्वत आनंद होता. मला तिचा स्वाभिमान आवडला मी भले तिला जास्त पैसे दिले पण ते कशाच्या तरी बदल्यात दिले. मी तिला दिलेला ऊसाचा रस पिणे तिला प्रशस्त वाटले नाही. मला तिचा अभिमान वाटला तिने फक्त मेहनतीचे स्वीकारले. माझ्या चेहऱ्यावर लोकांना जो सतत आंनद दिसतो तो कदाचित त्या मुलांच्या चेहऱ्यावर मी पाहिलेल्या आनंदाची देन असावी बहुतेक ! आज माझा पाय जखमी झाल्यामुळे सुजला होता तो प्रचंड दुखत होता पण त्याची वेदना माझ्या चेहऱ्यावर कोणालाच दिसली नाही. ती कधीच कोणाला दिसत नाही. त्यामुळे कित्येकांना प्रश्न पडतो की मी इतका आनंदी कसा ? तर काहींना वाटते माझे आयुष्य फक्त आनंदाने भरलेले होते. पण तसे नाही; माझे आयुष्य नेहमीच वेदनेने दुःखाने नव्हे ! भरलेले होते. पण माझा चेहरा मात्र आनंदाने भरलेला आहे. घरात खाण्यासाठी अन्नाचा दाणा नसतानाही माझ्यावर कधीच कोणापुढे हात पसरण्याची वेळ आली नाही. का कोण जाणे. मी नेहमीच फक्त आणि फक्त देणाऱ्याच्या भूमिकेत असावे अशी ईश्वरी इच्छा असावी. मी मागितले तर मला द्यायला तयार असणारे आज शेकडो हात आहेत पण माझ्यावर मागण्याची वेळ अजून आली नाही उलट मीच त्यांना वेग वेगळ्या माध्यमातून मदत करत आलोय. माझे वडील आणि माझे भले काही गोष्टीत पटत नसेल पण ते ही त्यांच्या मेहनती पलीकडचे पैसे स्वीकारत नाही आणि मी ही ! माझी आई तिनेही कधीही कोणाकडे एका पैशासाठी हात पसरले नाहीत पण तिच्याकडे जेव्हा - जेव्हा पैसे आले तेव्हा ती देणाऱ्याच्या भूमिकेत होती. मला इतरांचं नुकसान करून पैसे कमावण्याचे मार्ग सांगणारे रोज भेटतात पण आपल्या भौतिक गरजा कमीत - कमी ठेवण्याचा मी सतत प्रयत्न करत आलो. माझ्याकडे देण्यासारखं फार काही नसताना मी देणाऱ्याच्या भूमिकेत आहे पण काही लोकांकडे करोडो रुपये असूनही कोणाला १०० रुपये देताना त्यांचे हात जड होतात. आणि मग ते देवाला दोष देत असतात की देव माझ्या इच्छा का पूर्ण करत नाही ? माझ्या मनात आलेले विचार प्रत्यक्षात येतात आणि मी सहज अनावधानाने बोललेले प्रत्यक्षात होताना मी पहिले आहे. ही माझी अंधश्रद्धा नाही. मी बऱ्याच गोष्टींचे सुक्ष्म निरीक्षण केले आहे.

मी दिल्लीला असताना मी रहात होतो तेथील मोकळ्या जागेत एक विचित्र गोष्ट पहिली होती एक कुत्रा आणि मांजर एकत्र प्रेमाने खेळत होते इतक्यात एक जखमी कबुतर त्यांच्या समोर पडला पण त्या मांजरीने किंवा कुत्र्याने त्याला स्पर्श ही केला नाही उलट ते त्याची तडफड एक टक पहात राहिले आणि त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तो श्रावण महिना होता. श्रावणात मी मच्छी मटण खात नसे पण त्या कबुतराची तडफड माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हती आणि कुत्रा मांजरीचे त्यांच्या स्वभाविरुद्ध वागणे मला विचलित करू लागले आणि त्याच दिवशी मी मांसाहार सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर मला त्यापूर्वी त्रास देणारे पोटाचे विकार जवळ - जवळ नाहीसे झाले. 

माझे एक स्वाध्यायी मित्र मला नेहमी अस्पष्ट सुचवायचे की मांसाहार वर्ज करावा पण ते स्पष्ट सांगत नव्हते. पण त्यांच्यामुळे मला एक गोष्ट कळली होती कोणतीही पवित्रता अंगी निर्माण करायची असेल तर मांसाहार सोडावाच लागेल. माझ्या विरोधात कोणीही काही बोललं तरी ते मला कोणत्या ना कोणत्या मार्गाने कळतंच ! मग ती व्यक्ती माझ्या कुटुंबातील असो अथवा बाहेरची ! मला मिळालेले हे एक दैवी वरदान आहे. ईश्वराने माझ्या स्वप्नातही नसणारी सारी भौतिक सुखे मला दिली पण ती मी त्याच्यात गुंतून राहतो की नाही हे पाहण्यासाठी दिली असावी ! आतापर्यत अनेकांनी मला आपल्या बाजूने खेचण्यासाठी अनेक प्रलोभन दिली पण मी फसलो नाही कारण मी कोणासोबत किती काळ राहावं याचे ईश्वरी संकेत मला मिळतात. प्रत्येक माणसासोबत मी वेगवेगळा वागतो त्याला माझा नाही तर त्या माणसाचा स्वभाव कारणीभूत असतो. मी कधीच कोणाच्या घरी सत्यनारायणाच्या पूजेला सहसा जात नाही, घरातील देवाची कधीच पूजा करत नाही, पण देवाशी संबंधित पुस्तके मी आनंदाने वाचतो. देवाची प्रसाद मी कधीच नाकारत नाही. प्रवासात रस्त्यात शेकडो देवळांचे कळस दिसले तरी मी पाया पडतोच ! अन्नाचा अपमान मी कधीच करत नाही उपवासाच म्हणाल तर मी स्पष्ट म्हणतो ज्यादिवशी मी उपाशी रहावं अशी देवाची इच्छा असेल त्या दिवशी मी नक्कीच उपवास करेंन ! मागच्या काही काळात मला भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचे संकेत मिळू लागले आणि देवावरची माझी श्रद्धा अधिक दृढ झाली आणि त्याच्या साधनेत माझा जास्त वेळ जाऊ लागला. पण माझी एक साधना पूर्ण होऊ नये असे ईश्वरी संकेत होत त्यामुळे मी ती अर्धवट ठेवली; त्याचे कारण मला ज्ञात आहे. असो आता मला कोणतेच मोह माया विचलित करत नाहीत. मी माझ्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट घटनेचा ईश्वरी इच्छा म्हणून स्वीकार करतो. आज मला मला जेथे जायचे होते तेथे न जाण्याचे संकेत मिळत होते आणि मी नाही जाऊ शकलो. ईश्वराने कदाचित त्या मुलाच्या रुपात पुन्हा एकदा माझ्यातील माणूसपणाची परीक्षा घेतली असावी. मला खात्री आहे ईश्वर आता लवकरच माझी एक इच्छा पूर्ण करेल. कित्येक परीक्षा दिल्यावर मला जे ज्ञान प्राप्त झाले ते जगाच्या कल्याणासाठी वापरण्याचे संकेत आता मला मिळू लागले आहेत. आता माझे सहज बोलणेही तत्वज्ञान वाटते लोकांना हे ही त्या ईश्वरी इच्छेमुळेच घडत आहे....


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational