kanchan chabukswar

Tragedy

4.0  

kanchan chabukswar

Tragedy

सी -15

सी -15

7 mins
262


घे भरारी वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर झळकलेल्या बातमीमुळे अखी पंचक्रोशी हळहळली. वाटुर गावातून साताऱ्याकडे आलेल्या एका लहानशा कुटुंबावर जणू वीज कोसळली होती. काय झाले होते बरं!


कालिदास नाट्यगृहात देखील काहीतरी भलतेच घडत होते. बालकनी मधल्या c15 जागेवर कोणीही बसू शकत नव्हता. आता कितीतरी वर्ष या गोष्टीला लोटली होती. सर्व लोक विसरून देखील गेले होते. फिफ्टीनची खुर्ची कायम मिटलेली असायची, पण जसं नाटक सुरू व्हायचं तसं खुर्ची आपोआप उघडायची जसं काही तिच्यावरती कोणी बसल आहे. नाटक संपल्यावर ती परत खुर्ची मिटून जाई. सुरुवातीला लोक घाबरायचे त्याच्यामुळे सी रांगेमधले तिकीट अजिबातच विकले जात नव्हते. असंच एक कुटुंब "ती फुलराणी" नाटक बघायला आलेलं होतं, त्यांच्या तिकिटाचे क्रमांक सी बारा ते 15 होते, नाटक सुरू झाल्यानंतर c-15 वर बसलेल्या मुलीला चक्क खाली ढकलून देण्यात आले. असेच अनुभव बऱ्याच जणांना आले त्याच्यानंतर कालिदासच्या मालकाने सी रांगे मधली तिकीट विकणे बंद केले.


काहीजणांना c-15 वर गुलाबी फ्रॉक घातलेली मुलगी दिसत असे, कितीतरी जणांना रस्ता ओलांडताना गुलाबी फ्रॉक घातलेली मुलगी धावत कालिदासकडे जाताना दिसत असे. कालिदास च्या मोकळ्या कॉरिडॉरमध्ये एक लहान मुलगी गुलाबी फ्रॉक घातलेली नाचत बागडत असलेली बऱ्याच जणांना दिसली होती. एकदा तर 'हिमगौरी" नाटक चालू होतं, जशी हिमगौरी पेटी मध्ये झोपली तशी तिच्या बाजूला गुलाबी फ्रॉक घातलेली मुलगी पण येऊन झोपली. एक भली मोठी किंकाळी फोडून हिमगौरी पेटीच्या बाहेर आली. नंतर सगळ्यांना माहित झालं की गुलाबी फ्रॉक वाली मुलगी कोणालाच काही त्रास देत नाही, तिला हिमगौरी व्हायचं होतं पण.....


घे भरारी वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर झळकलेल्या बातमीमुळे अखी पंचक्रोशी हळहळली. वाटुर गावातून साताऱ्याकडे आलेल्या एका लहानशा कुटुंबावर जणू वीज कोसळली होती. काय झाले होते बरं!


साताऱ्याजवळच्या लहान शाळा वाटुर गावा मध्ये राहणाऱ्या कुटुंबाची ही गोष्ट. वाटूर तसं लहानसं गाव, गावामध्ये दोनच शाळा, एक प्रायमरी आणि एक सेकंडरी. गाव तसं स्वच्छ, गाडगेबाबांचे बक्षीस मिळवलेलं, लोक मेहनती, शेतीवाडी, छोटे व्यवसाय करणारे. रमेश आणि राधिका तिथेच आपली चार एकर शेती आणि त्याला जोडून असलेलं किराणा मालाचे दुकान सांभाळत होते.


घरामध्ये ऐश्वर्या आणि मनोज अशी दोन गोड मुले. ऐश्वर्या पाचवीत तर मनोज तिसरी मध्ये. ऐश्वर्या आणि तिचा भाऊ मनोज दोघांनाही शाळेत सांगण्यात आलं की शेजारच्या शहरांमध्ये आलेल्या हिमगौरी आणि सात बुटके नाटकाला जरूर जा. आपल्या शाळेच्या गॅदरिंग मध्ये आपण तेच नाटक बसवणार आहोत. ऐश्वर्या, एक गोरी गोरी गोड मुलगी अवघ्या पाचवीतली. तिची भूमिका नक्की ठरली होती, हिमगौरी तीच होणार होती. झालं! वाटुर पासून सातारा जवळ जवळ पन्नास किलोमीटर. पन्नास किलोमीटर जाणे आणि परत पन्नास किलोमीटर येणे. मुलं दमून जाणार होती. म्हणून रमेश आणि राधिकाने ठरवलं की शनिवारीच साताऱ्याला जाऊन रात्रीचा हॉटेलमध्ये मुक्काम करायचा, दुसऱ्या दिवशी नाटक बघून परत यायचे. त्याप्रमाणे रमेशने तिकीट पण काढले.


ऐश्वर्या आणि मनोज अतिशय आनंदात होते. एका प्रसिद्ध नाटक कंपनीचे हिमगौरी आणि सात बुटके नाटक फारच प्रसिद्ध होते, फिरता रंगमंच, सात बुटके यांची कामे, सुरेख गोरी गोरी, हिमगौरी. जरी कथा सगळ्यांना माहिती असली तरी नाटक बघण्यातला आनंद वेगळाच होता. साताऱ्याच्या सुप्रसिद्ध कालिदास नाटक गृहामध्ये नाटक जवळजवळ पंधरा दिवस चालू होते. शेवटचा रविवार, खूप धडपड करून तिकीट रमेश ला मिळाली. आणि हो त्याच्यासाठी रमेशला दोनदा साताऱ्याला जावे लागले होते. पण लेकीच्या हट्टासाठी त्याने मान तुकवली.


ऐश्वर्या आणि मनोज न शाळेत सांगून देखील टाकले की ते साताऱ्याला जाऊन नाटक बघणार आहेत. सगळ्या मुला-मुलींना त्यांचा खूप हेवा वाटला, सगळ्यांचे पालक गरीब, साताऱ्याला जाऊन येणं तेदेखील नाटकासाठी, कुठल्याच पालकाला हे परवडणार नव्हतं. त्यातून वाटूर गाव जरा मागासलेलेच. रमेश आणि राधिका दहावी शिकलेली असल्यामुळे त्यांची मुलांच्या प्रगतीच्या साठी कष्ट करायची तयारी होती.

 

त्यातून शाळेच्या गॅदरिंग साठी कोल्हापुरातली कोणीतरी सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री येणार होती. राधिका च्या मनात भलतच काहीतरी होत. जर का त्या अभिनेत्रीला ऐश्वर्या पसंत पडली असती तर ऐश्वर्याचा सिनेसृष्टी मधला प्रवासही सुखकर झाला असता. बघूया म्हणत राधिकाने रमेश ला खूप भरीला पाडून सातारा ला जायचे, तिथे राहायचे, नाटक बघायचे या एवढ्या मोठ्या खर्चासाठी भरीला पाडले होते.

गोऱ्या गालाची, पिंगट डोळ्यांची, कुरळ्या केसांची डोक्यावरती महिरप असलेली ऐश्वर्या अतिशय आनंदात होती.   


कालिदासचा तिकीट दर देखील महागडा होता, समोरची तिकिटे पाचशे रुपये, मधली 300, सर्वात मागची दोनशे आणि बालकणी मात्र पन्नास रुपये होते. रमेश ला चार तिकीट काढायची होती, त्यांनी आपली बाल्कनी तिकीट घेतली. सी12 13 14 15. C15 नावाची सीट कडेला असून, त्याच्यानंतर

पासेज होता. त्याच्यामुळे ऐश्वर्याला नाटक व्यवस्थित बघता येणार होता. तिने ठरवूनच टाकलं होतं कि ती c-15 वर बसणार.


शनिवारी सगळं कुटुंब साताऱ्याला येऊन पोहोचल. रात्री मुलांच्या आवडीची पावभाजी खाऊन त्यांनी हॉटेलमध्ये मुक्काम केला. हॉटेल मधली पावभाजी, तसेच नरम बिछान्यावर चा मुक्काम ऐश्वर्या आणि मनोज ला सगळंच नवीन होतं. राधिका आणि रमेश देखील मुलांच्या आनंदामुळे सुखावले गेले होते. कालिदास नाट्यगृह त्यांच्या हॉटेल पासून पायी जाण्याच्या अंतरावर ती होतं. त्यामुळे नाटकाच्या आधी अर्धा तास सगळं कुटुंब निघालं.

ऐश्वर्याचा आनंद जणू सातव्या आसमानवर्ती होता. वडिलांच्या हाताला लटकत, उड्या मारत ती रस्त्याने चालली होती.


गुलाबी रंगाचा फ्रिल्ल फ्रॉक, तसेच मौजे, आणि डोक्यावर चा बँड. फार गोड दिसत होती ऐश्वर्या. मनोजने पण मस्तपैकी लाल रंगाचा टी-शर्ट आणि ब्राऊन रंगाची जीन्सची पॅंट घातली होती. तो आईच्या हाताला धरून उड्या मारत चालला होता. रमेश आणि राधिकाने देखील मॅचिंग कपडे घातले होते, निळसर झाक असलेला टी-शर्ट आणि खाली मस्त जीन्स पॅन्ट घालून रमेश आयटीत चालत होता. राधिकाने देखील आपल्या ठेवणीतला चिकन कारीगरी असलेला निळ्या रंगाचा सलवार कमीज घातला होता, सगळेच कुटुंब अतिशय आनंदामध्ये बागडत कालिदास नाट्यगृहाच्या दिशेने चालले होते.


जसं समोर नाट्यगृह दिसायला लागलं, तसं ऐश्वर्याच्या आनंदाला उधाण आलं, तिने जोरजोरात उड्या मारून रमेश च्या हातातून आपल्या हात सोडवला आणि कालिदासाच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने धावत सुटली. त्या लेकराला कळत नव्हतं कि मध्ये हमरस्ता होता. रस्त्यावरून वाहनांची ये जा जोरात चालू होती. अचानक डावीकडून एक घोडागाडी आली, घोडागाडी चुकवण्याच्या नादात ऐश्वर्या मागे वळली तर मागे वळून तोल सावरता सावरता खाली पडली, आणि तिच्यावरून त्या बाजूनी येणार एक मोठं ट्रॅक्टर गेलं.


ते लहान लेकरू रस्त्यावरती असं विचित्र पुढेमागे करेल याची कोणाला जाणीव नव्हती. रमेश ला नकळत एका झटक्यात हात सोडून ऐश्वर्या धावली होती, एवढा मोठा धावता रस्ता तिघेजण तिच्या मागे पळाले, पण अवघ्या सेकंदाचा अवकाश आणि त्यांच्यासमोर दुर्घटना घडली. दोष कोणाचाच नव्हता. अतिशय आनंदात नाटकाला आलेली सर्व कुटुंब या दुर्घटनेमुळे स्तब्ध झाली.


रमेश, राधिका जणू वीज कोसळली . मनोज तर बोलेनासा झाला. क्षणार्धात काय झाले, सुखी कुटुंब होत्याचे नव्हते झाले. रस्त्यावरती जखमी अवस्थेत ऐश्वर्या बडबडत होती" हिमगौरी, हिमगौरी ला बघायचा आहे." राधिका सुन्नपणे ऐश्वर्याला आपल्या कुशीत घेऊन बसली होती. येणाऱ्या जाणाऱ्यांनी कोणीतरी ॲम्बुलन्स ला फोन केला, शेजारचा पोलीस देखील धावत आला, रस्त्यावरची गर्दी जमली. मनोज कावराबावरा झाला, आईच्या गळ्याला मिठी मारून तो ओक्साबोक्शी रडू लागला. रमेश राधिका सुन्नपणे ऐश्वर्याकडे बघत राहिले.


डोळे उघडून हळू आवाजात ऐश्वर्याने "हिमगौरी" असे परत म्हटले. कोणीतरी जाऊन कालिदास मध्ये ही माहिती दिली. त्याबरोबर हिमगौरी काम करणारी मधू नावाची मुलगी आपल्या वेशभूषेत , सात बुटके सकट रस्त्यावरती धावली. ऐश्वर्याला आपल्या मांडीवर ती घेऊन तिने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. ऐश्वर्याला हिमगौरी बघायची होती ना. तिच्याकडे बघत बघत, चेहऱ्यावर ती गोड हास्य आणून, ऐश्वर्याची प्राणज्योत मालवली. ही घटना एवढी धक्कादायक होती हिमगौरी तिच्याबरोबर काम करणारे सात बुटके निशब्द झाले. कालिदास समोरचा रस्ता देखील काही काळासाठी सुन्न झाला.

ट्रॅक्टरचा मागच्या चाकाखाली ती आल्यामुळे ड्रायव्हरला दिसलीच नव्हती. घोडा गाडीवाला निघून गेला होता आणि ट्रॅक्टरवाला डोक्याला हात लावून बसला होता. भराभर अँब्युलन्स आली ऐश्वर्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन पण काही उपयोग झाला नाही.


त्या दिवशीचा खेळ रद्द करण्यात आला. कारण खेळ सगळे लहान मुलांसाठी होता, आणि अवघ्या अर्धा तास अगोदर ही दुर्घटना झाली होती.

घे भरारी वर्तमानपत्र पत्राचा रिपोर्टर कालिदास मध्ये चाललेला होता, हिमगौरी आणि सात बुटके नाटकाचा समालोचन त्याला करायचं होतं, पण झालं भलतंच, त्याच्या कॅमेऱ्यांनी ऐश्वर्याचा दुर्दैवी अंत मात्र टिपला.


अतिशय विषण्ण मनाने, राधिका आणि रमेश न आपल्या मुलांना वाटुर गावी आणले. ऐश्वर्याची शेवटची इच्छा म्हणून तिच्या शेवटच्या यात्रेमध्ये मधुनी दिलेला हिमगौरी चा वेश तिच्या अंगावरती चढवण्यात आला. कोण राजकुमार येणार आणि कोण ऐश्वर्या ला उठवणार? रमेश आणि राधिका ची हिमगौरी कायमची झोपली. संपूर्ण वाटुर गाव, शाळा, शिक्षक सगळे अतिशय हळहळले. रमेश ,राधिका जणू वीज कोसळली. मनोज तर बोलेनासा झाला, सुखी कुटुंब होत्याचे नव्हते झाले.


या घटनेला आता पुष्कळ काळ उलटून गेला, मध्यंतरी काहीतरी दुर्घटना झाली आणि कालिदास नाट्यगृहIला आग लागली. आत मधल्या खुर्च्या पडदे विजेचे सामान कॅमेरे सगळे धडाधड जळून गेलं. बरेच वर्ष मालकांनी कालिदास कडे लक्ष दिलं नाही. पण साताऱ्याच्या मध्यवर्ती असणारे कालिदास परत चालू करा म्हणून जनतेने खूप आग्रह धरला, म्हणून कालिदास त नूतनीकरण झालं आणि कालिदास नाट्यगृह परत सुरू झालं.


म्हाताऱ्या मालकाला ऐश्वर्याची गोष्ट माहिती होती आणि c-15 ची देखील. त्यांनी आपल्या मुलांना सांगून ठेवलं होतं कि सी 15 चे तिकीट कोणालाच विकायचं नाही. पण नवीन पिढी नवीन राज्य आता मुलगा कारभार बघत होता. त्याला वाटलं कालिदास नुतनीकरण झालेला आहे आता कुठे ऐश्वर्या येणार आणि आता कुठे हिमगौरी परत चालू होणार?


उद्घाटनाच्या दिवशी हिमगौरी आणि सात बुटकेचा खेळ लावलेला होता, आणि पाहतात तो काय गुलाबी फ्रॉकवाली मुलगी नेहमीप्रमाणे c-15 वर येऊन बसलेली होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy